पोस्ट्स

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला !      सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती                नासिक (प्रतिनिधी )::- प्रेक्षकांच्या उत्सुकतेचं कारण बनलेला मराठी चित्रपट 'गुलाबी' उद्या २२ नोव्हेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. अभ्यंग कुवळेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला आणि व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत हा चित्रपट मैत्री, स्वप्नं, आणि स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास रंगवतो. यात प्रमुख भूमिकांमध्ये अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे या तीन अभिनेत्रींच्या अभिनयाचा खास नजराणा प्रेक्षकांना पाहायला मिळेल असे आज झालेल्या पत्रकार परिषदेत अभ्यंग कुवळेकर यांनी सांगितले.                      'गुलाबी' चित्रपट जयपूर या गुलाबी नगरीत तीन स्त्रियांच्या अनोख्या प्रवासाची कहाणी सांगतो. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील या तिघींच्या आयुष्यातील मैत्री, स्...

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

इमेज
स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४   नाशिक  ( जिमाका वृत्तसेवा ):     महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्तीत संख्येने मतदान करावे यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजता  ‘ वोटोथॉन’ चे आयोजन केले आहे. या ‘वोटोथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्येक नागरिकांनी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.                जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात काल सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ.गेडाम बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालि...

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

इमेज
मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात  आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही              नाशिक ( प्रतिनिधी )  समाजातील सर्व घटकांसाठी काम केलेल्या मध्य नाशिक विधानसभेतील आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांचा विजय निश्चित‌ होणार. अशी ग्वाही मंगळवार ( दि.१२) सकाळ- सायंकाळच्या सत्रात भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली.     भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या  ‌‌पस्थितीत प्रभाग क्र.१२ मधील गायकवाड नगर, प्रथमेश नगर, मातोश्री नगर व गणेश कॉलनी या परिसरात  घरोघरी प्रचार संपर्क साधला. मध्य नाशिक विधानसभेतील महायुतीच्या उमेदवार प्रा. सौ. देवयानीताई फरांदे यांना आपले बहुमुल्य मत देऊन विजयी करावे असे आवाहन करण्यात आले. परिसरातील रहिवाशी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व आपले अमूल्य मत विकासपर्वाला असेल असे निक्षून सांगितले.    घरोघरी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते अभय छल्लाणी, नंदकुमार देसाई, नरेंद्र सोनवणे, प्रदीप पाटी...

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल

इमेज
'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन !  उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी  'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल      नाशिक(२६):- आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस माणसापासून दूर चालला आहे. नव्या माध्यमांमुळे वाचन कमी होऊ लागलं आहे. अशा काळात वाचकांना आवडेल आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा संवेदनशील साहित्याचा वसा 'लोकराजा दिवाळी अंका'ने प्राणपणाने जपला आहे, असे उद्गार नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी काढले.      साप्ताहिक न्यूज मसालाच्या १३ वी आवृत्ती 'लोकराजा दिवाळी विशेषांका' चे प्रकाशन साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरमध्ये ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, डॉ. चौधरी, ज्येष्ठ पत्रकार आणि नाशिक पुढारी आवृत्तीचे संपादक मिलिंद सजगुरे, कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले, ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे संपादक नरेंद्र पाटील यांच्या प्र...

ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिन्यानिमित्त एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर आयोजित पिंक मेलाया महिन्यात ९०% कमी खर्चात होणार मॅमोग्राफ चाचणी, पॅप स्मीअर आणि मोफत सल्ला

इमेज
ब्रेस्ट   कॅन्सर   जनजागृती   महिन्यानिमित्त   एचसीजी   मानवता   कॅन्सर   सेंटर   आयोजित   पिंक   मेला या   महिन्यात  ९०%  कमी   खर्चात   होणार   मॅमोग्राफ   चाचणी ,   पॅप   स्मीअर    आणि   मोफत   सल्ला   नाशिक(२२)::नाशिक शहरातील प्रमुख कर्करोग विशेषता रुग्णालय एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरने कर्करोग जागरूकता महिन्यातील उपक्रमांचा भाग म्हणून २६ ऑक्टोंबर २०२४ रोजी पिंक मेला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्तन कर्करोगाच्या वाढत्या प्रकरणाबद्दल जागरूकता वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून या कार्यक्रमात २० वर्षांवरील महिलांना दिग्गज डॉक्टरांकडून मोफत सल्ला ही देण्यात येणार आहे.  यावेळी तज्ञ डॉक्ट...

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

इमेज
सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !          नासिक::- किरण रंगनाथ दराडे, कनिष्ठ लेखाधिकारी, वित्त विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, नाशिक, व सचिन प्रभाकर पाटील, कनिष्ठ सहाय्यक, (लेखा )वित्त विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांना ११०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.               यातील तक्रारदार हे शिक्षक असून त्यांचे व इतर १७ शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्याकरिता तक्रारदार यांनी त्यांच्या सेवा पुस्तकासह एकूण १८ सेवा पुस्तके लोकसेवक किरण दराडे यांच्याकडे जमा केली होते. सदर १८ शिक्षकांची वेतन पडताळणी करून सेवा पुस्तके लेखाधिकारी यांच्याकडे सादर करून त्यांच्याकडून  वेतन पडताळणी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पंच साक्षीदार यांच्या समक्ष सुरुवातीला प्रत्येक सेवा पुस्तकाचे ७००/-रुपये याप्रमाणे १८ सेवा पुस्तकांचे १२६००/- रुपयांची मागणी करून,  तडजोडीअंती  ११००...

विधानसभा निवडणुक आढावा - केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन !

इमेज
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि  शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन   मुंबई::-   महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा  आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे  मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या  शिष्टमंडळाचे रात्री  ८  वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले.  महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन  स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी ,  अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय जाधव उपस्थित होते.            भारत निवडणूक आयोगाच्या या शिष्टमंडळात वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धमेंद्र शर्मा ,  वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश व्यास ,  वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग ,  उपनिवडणूक आयुक्त हिर्देश कुमार ,  उपनिवडणूक आयुक्त अजित कुमार ,  ...

१०० खाटांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण ! महिला व बाल रुग्णालयात आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणार-पालकमंत्री दादाजी भुसे

इमेज
महिला व बाल रुग्णालयात आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणार-पालकमंत्री दादाजी भुसे मालेगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण नाशिक : मालेगाव शहरातील कॅम्प भागात महिला व बालकांसाठी १०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात महिला आणि १२ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांवर अत्याधुनिक पध्दतीने उपचार केले जातील. त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले             मालेगाव, जि. नाशिक येथे आज दुपारी १०० खाटांच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्ट. जन. डॉ. माधुरी कानिटकर, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, मुख्यमंत्री जनकल्याण विभागाच्या समन्वयक डॉ. ज्योती वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे आदी उपस्थित होते.  पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले की, मालेगाव शहरासाठी सुरुवातीला ४० खाटांच...

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

इमेज
सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, अध्यक्षपदी खासदार भास्कर भगरे तर कार्याध्यक्षपदी के.के अहिरे यांची निवड               नाशिक( प्रतिनिधी)::- शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटना एकत्र करून समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून खासदार भास्करराव भगरे तर कार्याध्यक्षपदी के.के.अहिरे यांची निवड करण्यात आली असून कार्यवाहपदी अरुण पवार यांची निवड करण्यात आली. या समितीचे मार्गदर्शक ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे, बाळासाहेब सूर्यवंशी, रविंद्र मोरे, दौलतराव मोगल, साहेबराव कुटे, संजय चव्हाण, एस.के.शिंदे, अशोक दुधारे, यांची निवड करण्यात आली. तसेच सर्व संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून पुढीलप्रमाणे समन्वय समिती कार्यकारिणी ठरवण्यात आली. यात समन्वय समितीचे अध्यक्षपदी खासदार भास्कर भगरे  यांनी स्वीकारावं, अशी विनंती सर्वानुमते करण्यात आली. त्यांनी सर्वांच्या विनंतीला मान देवून अध्यक्षपद स्वीकारले त्यांनी त्यांच्या ...

भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सवाचे ४ व ५ सप्टेंबर रोजी आयोजन...!

इमेज
भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सवाचे ४ व ५ सप्टेंबर रोजी म्हाळसाकोरे येथे आयोजन...!        नाशिक ( प्रतिनिधी )::-  अखिल भारतीय महानुभाव परिषद पुरस्कृत नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सव सोहळा दि. ४ व ५ सप्टेंबर रोजी म्हाळसाकोरे (ता. निफाड ) येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच याच दरम्यान श्री दत्त मंदिर हिवरगाव येथील दत्त मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे.               भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सव यावर्षीपासून शासकीय स्तरावर देखील साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक (जीआर ) महाराष्ट्र शासनाने सर्व सरकारी कार्यालयांना जारी केला आहे. त्याचप्रमाणे भगवान श्री चक्रधर स्वामी (अवतार दिन ) जयंती उत्सव दि. ४ व ५  रोजी जय शिवशंकर गार्डन रिसॉर्ट (सिन्नर रोड ) म्हाळसाकोरे येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.        बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय विद्याल...