'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल
'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल नाशिक(२६):- आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस माणसापासून दूर चालला आहे. नव्या माध्यमांमुळे वाचन कमी होऊ लागलं आहे. अशा काळात वाचकांना आवडेल आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा संवेदनशील साहित्याचा वसा 'लोकराजा दिवाळी अंका'ने प्राणपणाने जपला आहे, असे उद्गार नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी काढले. साप्ताहिक न्यूज मसालाच्या १३ वी आवृत्ती 'लोकराजा दिवाळी विशेषांका' चे प्रकाशन साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरमध्ये ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, डॉ. चौधरी, ज्येष्ठ पत्रकार आणि नाशिक पुढारी आवृत्तीचे संपादक मिलिंद सजगुरे, कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले, ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे संपादक नरेंद्र पाटील यांच्या प्र...