‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत : सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम ! ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार ! नाशिक(प्रतिनिधी)::- मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाने गेल्या दोन वर्षांत ठेवी ७९ कोटींवरून १२४ कोटींपर्यंत वाढविल्या आहेत. म्हणजेच ४५ कोटींची वाढ झाली आहे. ३८ कोटी ३५ लाख कर्जपरतफेड केली आहे. याबरोबरच विनाअनुदानित तत्वावरील सेवकांना चालू वर्षात ३० कोटी रुपयांची पगारवाढ दिली आहे. ३१ कोटी ९३ लाख रुपये संस्थेच्या विविध शाखांतील इमारतींच्या बांधकामावर खर्च केले आहे. अशा पद्धतीने संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सरचिटणीस ॲड. डॉ. नितीन ठाकरे यांनी केले. मविप्र संस्थेच्या कै. तुकारामजी रौंदळ सभागृहात रविवारी (दि.०१) पार पडलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ११० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ...