पोस्ट्स

दीपालीनगर येथे उद्या आरोग्यशिबिराचे आयोजन !

इमेज
दीपालीनगर येथे उद्या आरोग्यशिबिराचे आयोजन ! नाशिक : श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, विनयनगर परिसर ज्येष्ठ नागरिक मंच, सीतावल्लभ बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (सोमवारी ) हृदयरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कै. जयप्रकाश छाजेड उद्यान, दीपालीनगर, शर्मा मंगल कार्यालयासमोर, हॉटेल छान मागे येथे सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत होणाऱ्या या शिबिरात हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची विनामूल्य तपासणी करतील व साखर, ईसीजी इ. तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.        यावेळी माजी महापौर सतीश कुलकर्णी, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, नगरसेवक यशवन्त निकुळे, पंडितराव नेरे, साहेबराव सोनवणे, संजय गिते, ओंकार जगळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ संपन्न होत असून नागरिकांनी शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. सुनील औंधकर, डॉ. प्रतिभा औंधकर आणि रेडक्रॉस कार्यकारिणीने केले आहे. अधिक माहितीसाठी तुषार जाधव यांच्याशी ८२०८७८३४६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

‘जेएनपीए’ कडून मविप्रला ३८ लाखांचे अर्थसहाय्य..!

इमेज
‘जेएनपीए’ कडून मविप्रला ३८ लाखांचे अर्थसहाय्य..! नाशिक :  जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी (जेएनपीए) यांच्यातर्फे नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला आर्थिक बळ देण्यात आले आहे. सीएसआर निधीतून मविप्र संस्थेला नुकताच ३८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. जेएनपीएच्या अधिकारी वर्गाकडून मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. मविप्र संस्थेच्या पाच शाळांमधील मुलींच्या प्रसाधनगृहांच्या दुरुस्ती करण्यासाठी ‘जेएनपीए’ तर्फे सामाजिक दायित्व निधीतून ही आर्थिक मदत देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या   आरोग्याचा संभाव्य धोका टळण्यास मदत होणार आहे.   मविप्र आणि जेएनपीए यांच्यातील करारामुळे संस्थेचे काम अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी   मदत होणार असल्याचे यावेळी  ' मविप्र ' चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले. जेएनपीएचे संचालक उन्मेष वाघ   हे मविप्र संस्थेच्या सटाणा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून ,  संस्थेबद्दलची आत्मीयता आणि सामाजिक दायित्व म्हणून मदतनिधीसाठी वाघ यांनी प्रयत्न केल्याचेही ॲड. ठाकरे यांनी सांगितले.

अभिमानास्पद - मविप्र केबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला स्वायत्त दर्जा प्राप्त : ॲड. नितीन ठाकरे. शैक्षणिक, प्रशासकीय बाबतीत स्वतंत्रपणे काम करण्याची संधी

इमेज
मविप्र केबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला स्वायत्त दर्जा प्राप्त : ॲड. नितीन ठाकरे शैक्षणिक, प्रशासकीय बाबतीत स्वतंत्रपणे काम करण्याची संधी           नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राज्य शासनाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला असून, संस्थेसाठी ही एक अभिमानाची बाब आहे. महाविद्यालयाच्या भविष्यासाठी देखील ही एक महत्त्वपूर्ण वाटचाल आहे. स्वायत्ततेच्या प्राप्तीमुळे महाविद्यालयाला शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबतीत स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये गुरुवारी (दि.८) पार पडलेल्या पत्रकार परिषदेस मविप्रचे पदाधिकारी, संचालक व प्राध्यापकवृंद उपस्थित होते. महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळावा, यासाठी संस्थेकडून विद्यापीठ व शासनाकडे पत्रव्यवहार सुरु होता. अखेर गुरुवारी (दि.८) दुपारी मविप्र संस्थेकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याचे पत्

सेवानिवृत्त अधिकारी व त्यांच्या पत्नी वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

इमेज
सेवानिवृत्त अधिकारी व त्यांच्या पत्नी वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ! नासिक ::-तक्रारदार नितीन नारायण पाटील, पोलीस निरीक्षक, नेमणुक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी केलेल्या तक्रारीवरून सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी, महानगरपालिका, नासिक चे अनिल चुडामान महाजन व त्यांच्या पत्नी श्रीमती निशा अनिल महाजन यांच्या कडे असलेली अपसंपदा रक्कम  १,३१,४२,८६९/-रुपये  (एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये) कायदेशीर उत्पन्नापेक्षा ४२% इतकी अपसंपदा केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.             आलोसे अनिल चुडामान महाजन सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी महानगर पालिका नाशिक यांनी अग्निशमन महानगर पालिका येथे कार्यरत असतांना दिनांक २२/१०/१९८६ ते दिनांक ३१/०५/२०१८ दरम्यान सेवा कालावधीत कायदेशीर उत्पन्ना पेक्षा १,३१,४२,८६९/- (एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये ) कायदेशीर उत्पन्ना पेक्षा ४२% एवढी अपसंपदा केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याने, तसेच सदर अपसंपदा संपादित करणे कामी त्यांची पत्नी आरोपी यांनी प

किरण डोंगरदिवे साहित्य अकादमीच्या विचारपीठावर !

इमेज
किरण डोंगरदिवे साहित्य अकादमीच्या विचारपीठावर ! मेहकर (दि ७ ऑगस्ट)::- मेहकरचे सुप्रसिद्ध साहित्यिक किरण शिवहर डोंगरदिवे हे आपल्या आशयघन आणि वैविध्यपूर्ण साहित्यासाठी ओळखले जातात. समीक्षणाच्या दालनात त्यांनी केलेले भरीव कार्य काव्यप्रदेशातील स्त्री, कविता आली सामोरी, समकालीन साहित्यावलोकन या ग्रंथाशिवाय साहित्यातील शिक्षण अशा स्तंभ लेखनातून महाराष्ट्रभर पोहोचले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतीय साहित्य अकादमी तर्फे क. जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय विद्याविहार मुंबई येथे दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी होऊ घातलेल्या परिसंवादात शांता शेळके व्यक्ती आणि साहित्य ह्या परिसंवादात शांता शेळके ह्यांचे अनुवादकार्य ह्या विषयावर भाष्य करण्यासाठी निमंत्रित केले असून ह्या परिसंवाद सत्राचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक अशोक बागवे हे असून ह्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पानिपतकार विश्वास पाटील, उद्घाटक म्हणून प्रवीण दवणे, ह्यांच्यासह साहित्य अकादमीचे सचिव के श्रीनिवासराव, साहित्य अकादमीचे केंद्रीय कार्यकारी सदस्य प्रा. नरेंद्र पाठक ह्यांच्यासह मुंबई साहित्य अकादमीचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश न

शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या काव्यसंग्रहाचे अनोखे प्रकाशन !

इमेज
शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या काव्यसंग्रहाचे अनोखे प्रकाशन ! सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी हर्षा हिरा पाटील यांचा "हर्षधारा" पहिला काव्यसंग्रह !        पालघर (गुरुदत्त वाकदेकर) : सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी हर्षा हिरा पाटील पंचायत समिती पालघर यांच्या "हर्षधारा" ह्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे अनोख्या पद्घतीने प्रकाशन करण्यात आले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कु. मोनिका कोदे, विशेष अतिथी निवेदिका कलाकार कवयित्री शिल्पा परुळेकर, कविवर्य संजय पाटील, हिरा जनार्दन पाटील तसेच मनिष पाटील यांच्यासोबत स्वत: हर्षा हिरा पाटील आदी उपस्थित होते. "हर्षधारा" ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आश्रमशाळा पडघे येथील मोनिका कोदे ह्या विद्यार्थिनीच्या हस्ते करण्यात आले.                या अनोख्या प्रकाशन सोहळ्याबाबत हर्षा पाटील म्हणाल्या की, शिक्षण क्षेत्रात ४० वर्ष योगदान दिले, त्यावेळी आलेल्या शैक्षणिक, कौटुंबिक अडचणी, अनेक चांगले वाईट अनुभव यांचे प्रतिबिंब हर्षधारात शब्दबद्ध झाले आहे. माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचा हा क्षण विद्यार्थी अन् शिक्षकांसोब

शेतकऱ्यांना मर्यादित अनुदानावर ट्रॅक्टर, रोटॅव्हेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंपसंच या साहित्याचा लाभ देण्यासाठी योजना.

इमेज
जिल्हा परिषद सेस योजना सन २०२४-२५ अंतर्गत ५०% किंवा मर्यादित अनुदानावर ट्रॅक्टर, रोटॅव्हेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंपसंच या साहित्याचा लाभ देण्यासाठी योजना.                जिल्हयातील शेतक-यांनी पंचायत समिती येथे वेळेत अर्ज देणेबाबत आवाहन - श्रीमती माधुरी गायकवाड,  कृषी विकास अधिकारी जि.प.नाशिक               नासिक::- सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्हा परिषद सेस योजना सन २०२४-२५ अंतर्गत ५०% किंवा मर्यादित अनुदानावर ट्रॅक्टर, रोटॅव्हेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंपसंच या साहित्याचा लाभ देण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. लाभार्थी निवडीसाठी तालुकास्तरावर लॉटरी काढण्यात येणार आहे. सदर योजनेबाबतचे बाब निहाय निकष खालील प्रमाणे आहे.  १). ट्रॅक्टर:-  सदरची योजना ०८-७० पी.टी.ओ.एच.पी.पर्यंत सर्व ट्रॅक्टरसाठी लागू असेल. ट्रॅक्टर हे BIS/ISI केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या संस्थेव्दारे प्रमाणित असावे. ट्रॅक्टरच्या उत्पादकाचा टेस्ट रिपोर्ट सादर करणे आवश्यक राहील. महत्तम अनुदानाची मर्यादा अनु.जाती, अनु. जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला लाभ

विराज लोंढे च्या सुरेख आवाजात गायलेली "गुरू" कविता सादर, उपस्थितांची उस्फुर्त दाद मिळवत प्रथम क्रमांक पटकावला !

इमेज
             नाशिक कवी आयोजित कै.प्रा.डॉ.सुरेश मेणे काव्यसंग्रह पुरस्कार आणि काव्यलेखन पुरस्कार सोहळ्यात कु. विराज अतुल लोंढे या विद्यार्थ्याने "गुरू" ही कविता सादर करुन गुरुं प्रती भावना व्यक्त केल्या त्या एकदा ऐकायला हव्या ...!         रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या अभ्यंकर सभागृहात सदर कार्यक्रम पार पडला यावेळी नाशिक कवीचे अध्यक्ष बाळासाहेब मगर, तसेच पदाधिकार नंदकिशोर ठोंबरे, किरण मेतकर, बाळासाहेब गिरी, गोरख पालवे सौ. अलका कुलकर्णी, सौ स्मिता बनकर, सौ. भारती देव तसेच लेखक, कवी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !      नासिक(नंदुरबार)::- गट विकास अधिकारी (वर्ग १) विजय लोंढे व सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र सुखदेव लाडे पंचायत समिती अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.          दोन्ही आलोसेे यांची एकुण २६०००/- रु. अशी लाचेची मागणी आलोसे लाडे यांनी केली. गटविकास अधिकारी लोंढे साठी १८०००/- रुपये व सहाय्यक लेखाधिकारी लाडे यांनी स्वतः साठी ८०००/- रु. लाचेची मागणी केली होती .           तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा  व  ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. नमुद तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम  ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी सहाय्यक लेखाधिकारी यांना वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही. यानंतरही तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता, आलोसे यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे  बिल २४६८५०/- रु.  ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदार यां

एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !

इमेज
ख्यातनाम कवयित्री फरझाना इकबाल यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या कवितेला गायक रमेश गुजर यांनी दिलेली चाल आणि त्यांच्याच सुमधुर आवाजात गायिलेल्या कवितेच्या ओळींनी विठ्ठल प्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे. सध्या पंढरीच्या वारीची लगबग सुरू आहे. वारक-यांचे अनेक विडीओ बघून मन प्रसन्न होते. मात्र या कवितेने विठ्ठल वारी साहित्यात नवीन भर टाकली आहे असे कवयित्री फरझाना इकबाल यांनी सांगितले. गायक रमेश गुजर यांचे आभार मानत विठ्ठल चरणी आपली सेवा रूजू झाली अशा भावना व्यक्त केल्या.  सर्वांनी सदर रचना एकदा ऐकायला हवी !