पोस्ट्स

अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !

इमेज
अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !            नासिक::- नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान कोट्यवधी रुपये निधी मंजूर होऊन खर्च करण्यात आला परंतु तिथे अद्यापही पूर्णपणे सुविधा जॉगर्स धारकांना मिळत नाहीत. पुर्वी ज्या समस्या होत्या त्या अजूनही जशाच्या तशा कायम आहेत. मैदान विकसीत होऊन समस्या मिटतील असे वाटत होते. परंतु त्या समस्या तत्पूकाळ सुटण्याऐवजी हळूहळू पूर्व पदावर येत आहेत मग मैदान विकसित करून मिळवले काय हा प्रश्न कायम आहे, आज मैदानात झाडांना पाणी मारले जात नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. हिरवळ तयार करून हिरवाईचा हिरवा रंग राहिला नाही, संध्याकाळी मैदानात वाहने येतात अन जातात  यावर कुठलेही निर्बंध नाही. मैदानात रात्री टवाळखोरांची मनसोक्त सोय होते, प्रेमीगुलांचा तर प्रेमाचे अड्डे निर्माण झाले आहेत. मग या मैदानाला सुसज्ज कसे म्हणता येईल. मैदान विकसित केले तरी मैदानाची देखभाल होत नाही. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मैदानाची अशी अवस्था असेल तर बाकीच्या मैदांनाचे काय ? या सर्व बाबीकडे प्रशासनाकडू...

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युके कडून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर सन्मानित !

इमेज
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युके कडून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर सन्मानित !        छत्रपती संभाजीनगर::- येथील प्रथितयश लेखिका, प्रेरक व्याख्यात्या तथा उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांना रविवार दिनांक दहा मार्च रोजी शिर्डी येथे एका समारंभात लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् (युनायटेड किंगडम) या संस्थेचे अध्यक्ष संतोष शुक्ला यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले. समाजातील सर्व स्तरातून अंजली धानोरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

इमेज
सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !        नासिक::-  दिनांक ७ मार्च २०२४ रोजी जिल्हा परिषद नाशिक मधील अनिल गीते व अनिल सानप यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी मधून सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच वरिष्ठ सहाय्यक श्रीमती छाया सोनवणे, राजेंद्र येवला, धनराज पवार, दिलीप पाटील, विलास ननावरे, मंगेश चव्हाण, ओम प्रकाश पाटोळे, किरण माळवे, चंद्रकांत पगारे यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. गजेंद्र घाडगे व जीवन पारधी यांना कनिष्ठ सहाय्यक पदावरून वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आली.       पदोन्नती चार प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता आज हा प्रश्न मार्गी लागल्याने लिपिक वर्गीय कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. सदरच्या पदोन्नती पारदर्शकपणे राबविल्याने व कर्मचाऱ्यांची गैरसोय न झाल्याने कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करत परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी...

सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेषमोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम, पंधरवड्यात १ लाख शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट !

इमेज
सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम पंधरवड्यात १ लाख     शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट               मुंबई  :    राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दि. १९ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२४ दरम्यान राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे.    या कालावधीत १ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.    शासकीय रुग्णालय ,  मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा ,  असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.           या मोहिमेंतर्गत १ लाख शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिका...

प्रेरणादायी गोष्टींमधून विशेष बालकांनी अनुभवले छत्रपती शिवाजी महाराज !

इमेज
प्रेरणादायी गोष्टींमधून विशेष बालकांनी  अनुभवले छत्रपती शिवाजी महाराज !         नाशिक ( प्रतिनिधी ) निरागस विशेष  बालकांनी शिवचरित्र समजून घेत स्वराज्य संस्थापक शिवरायांच्या गोष्टींमधून नवे स्वप्न बघितले. स्वतःतील न्यूनगंड दूर करून प्रगती करण्याची प्रेरणा घेतली. प्रेरणादायी गोष्टींमधून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले.     रायझिंग चाईल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंग सेंटरतर्फे आज ( दि. १८ ) शिवजयंतीच्या औचित्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गतीमंद विशेष बालकांच्या या प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका मोनिका गोडबोले - यशोद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या प्रेरक कथा सांगितल्या. मुलांनी मावळ्यांचा वेष परिधान करून शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.‌ शिवरायांचा‌ जयजयकार केला. मुलांनी कुतुहलाने अनेक प्रश्न विचारले. त्यांची समर्पक उत्तरे मिळाल्याने त्यांचे समाधान झाले. यावेळी अनुष्का यशोद, ऋतुजा ढोरे, लीना काळे, मयूर कारंडे यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पालकांनीही सहभाग नोंदवला.

'Maharashtra MSME Defence Expo' to be held in Pune from Feb 24

इमेज
'Maharashtra MSME Defence Expo' to be held in Pune from Feb 24 Mumbai, Feb 17: In order to further strengthen the progress of self-reliant India in the sector of defence production and to promote the micro, small and medium industries producing defence materials in Maharashtra through the Industries Department of the State Government, a 3-days 'Maharashtra MSME Defence Expo' has been organized in Pune from 24th to 26th February 2024. Notably, this is the first of its kind Defence Expo in Maharashtra to enable the Micro, Small and Medium Enterprises (MSMEs) of the state to contribute significantly to the defence manufacturing sector and is being held at the International Exhibition and Convention Center in Pune.        All the three armed forces namely navy, army and air force are going to play an important role in this with the aim of promoting the coordination of industries with advanced technology and expertise in the sector of defence production. More than two hun...

अभियंता महेश व डॉ.नरेश बागूल यांच्या मातोश्री निलादेवी यांचे निधन !

इमेज
अभियंता महेश व डॉ.नरेश बागूल  यांच्या मातोश्री निलादेवी यांचे निधन !        नासिक::- रा. भालेर ह.मु. नासिक येथील पर्यटन विभागाचे विभागीय अभियंता महेश बागूल यांच्या मातोश्री, बागूल कुटुंबियांचा आधारवड स्व.निलादेवी शिवाजीराव बागुल (ताई) यांना आज दि.१६ शुक्रवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास देवाज्ञा झाली.            डॉक्टर नरेश शिवाजीराव बागुल वैद्यकीय अधिकारी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पुणे, व महेश बागूल, विभागीय अभियंता पर्यटन विभाग, नाशिक यांच्या त्या मातोश्री.     स्व.ताईंचा अंत्यविधी उद्या दि.१७/२/२०२४ शनिवार रोजी दुपारी १२ वा नाशिक पंचवटी अमरधाम येथे आहे.

अश्विन अघोर यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला : सुधीर मुनगंटीवार

इमेज
अश्विन अघोर यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला : सुधीर मुनगंटीवार   चंद्रपूर/मुंबई::-" राष्ट्र प्रथम" हा विचार प्रखरपणे मांडणारे पत्रकार श्री अश्विन अघोर यांचे अकाली निधन धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार आपण गमावला आहे ,  अशा शब्दात सांस्कृतिक कार्य ,  वने व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिवंगत पत्रकार श्री अश्विन अघोर यांच्या निधनाबद्दल आपले दुःख व्यक्त केले आहे.        ते पुढे म्हणाले की त्यांच्या स्वभावात वैदर्भीय दिलखुलासपणा आणि मिश्किलपणा ठासून भरला होता. जीवनात यश मिळवतांना अनेक संकटांना त्यांनी खिलाडूपणे हसतमुखाने तोंड दिले. अनेक वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेल्समधील यशस्वी कारकिर्दीनंतर आपल्या "घनघौर" या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलवरून खऱ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या सत्याचा शोध अव्याहतपणे मांडणाऱ्या अश्विनजींच्या अकाली जाण्याने तयार झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील. आपल्या लिखाणातून आणि व्हिडियो वार्तापत्रातून मांडलेल्या विश्लेषणातून त्यांनी जनजागृतीचे मोठे कार्य सातत्याने केले....

बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले १००० दिवस महत्वाचे !

इमेज
बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी  पहिले १००० दिवस महत्वाचे !         नाशिक ( प्रतिनिधी) - माता गर्भवती राहिल्यापासून ते जन्मलेले बाळ दोन वर्षांचे‌ होईपर्यंतच्या काळात बाळाच्या‌ मेंदूची ७५ टक्के वाढ पूर्ण होते. बाळ गर्भावस्थेत असल्यापासून पहिले १००० दिवस त्याच्या‌ सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचे असतात. या काळात बाळाला योग्य पोषण, माया देऊन त्याचे उत्तम संगोपन केले तरच मेंदूची पूर्णपणे वाढ होते. मेंदूतील अनेक केंद्रांची जोडणी होऊन बाळाची आकलन शक्ती, समाजिक कौशल्ये विकसित होते. त्याचा योग्य दिशेने संज्ञात्मक‌ व गुणात्मक विकास होतो. हा विकासाचा अतिआवश्यक टप्पा असून बाळाला स्पर्श, प्रेम आणि पोषणाची जरुरी असते. आई देखील सशक्त, निरोगी व आनंदी असणेही महत्वाचे आहे.  मुलाच्या वाढीसाठी आवश्यक सर्व गोष्टी त्याला वेळच्यावेळी मिळणे हा त्याचा अधिकार आहे. युनिसेफ व सर्वजणी महिला उत्कर्ष संस्थेच्या कार्यशाळेत अशी माहिती देण्यात आली.       प्रारंभी सुजाता शिर्के यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, या संदर्भात  पत्रकारांची भूमिका महत्वाच...

जिल्हा परिषदेतील ५१ परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती !

इमेज
जिल्हा परिषदेतील ५१ परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती !        नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत ५१ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कै.रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नती प्रक्रिया पार पडली. यामध्ये परिचर या पदावरून कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषद अधिनस्त सर्व विभागांनी पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश दिले होते, यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या तत्परतेने मागील महिन्यात अनुकंपा कर्मचारी गट ड मधून गट क संवर्गात समुपदेशनाचे समायोजन करण्यात आले. यानंतर आज सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने परिचर संवर्गातुन पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली. परिचर संवर्गातून ४९ तर वाहन चालक संवर्गातून २ कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली.          दि. ८ फेब्रुवारी रोजी सामान्य प्रशासन विभागां...