पोस्ट्स

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ आणि आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाणकार !       सिक:- महावितरण कार्यालय वाडीवऱ्हे येथील वरिष्ठ तंत्रज्ञ आलोसे नागेश्वर रघुनाथ पेंढार, व शुभम रामहरी जाधववाडीवऱ्हे, ता. इगतपुरुषाला स्वीकारताना लाचलुत प्रतिबंधक विभागाकडून त्यांना अधिकार प्राप्त झाले.           तक्रारदार मागणी वाडीवर्हे गावातील कमर्शियल, व एक दोन मीटर बसवुन बक्षीस म्हणून १२०००/- रु. ची महिला करून तडजोडी अंती०००/- रु. स्विकारणे स्वीकारणे स्वीकारणे आमदार दोषी इसम यांच्याकडे मलस सांगीतले व सदर सदस्य ईसमाकड करण्यात आला आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.             सापळा अधिकारी पाटील पाटील, पोलिस निरीक्षक, सापळा कार्यान्वित व मदत विश्व पोना/अजय गवाली, पोना/प्रभाकर गवळी, मपोशि/शितल सुर्यवंशी, श्रीमती शर्म घारगे-वालावलकर पोलिस अधीक्षक, माधव रेड्डी अपर पोलिस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलिस उपअधीक्षक , लाप्र.वि , नाशिकक्षेत्र , नाशिकच्या मार्गदर्शन परिधी .

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

इमेज
आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव  न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801        नासिक (सातपूर)::- समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येवून उत्सव साजरे करावेत या उद्देशाने लाेकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू केले. या उत्सवाचे निमित्ताने सातपूर येथील महिला ‘आनंद मेळावा’ साजरा करतात. अशा उत्सवांमुळे टिळकांचा उद्देश सफल हाेत असल्याचे प्रतिपादन सातपूर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी केले.            सातपूर काॅलनीतील श्रीराम हाइट्स साेसायटीतील गणराज मित्र मंडळाच्या वतीने आनंद मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. या मेळाव्याचे उद्घाटन वरिष्ठ निरीक्षक भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याच्या निमित्ताने महिलांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टाॅल लावत खवैयांना मेजवानी उपलब्ध करून दिली. प्रत्येक महिलेने जीभेवर चव रेंगाळत राहावी असे पदार्थ तयार केले हाेते.   साेसायटीतील सर्वांनी एकत्र येऊन खाद्यपदार्थांची चव चाखावी यासाठी अतिशय नाममात्र दरा...

राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय प्रदेश प्रतिनिधी पदी उमेश येवले यांची निवड !

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय प्रदेश प्रतिनिधी पदी उमेश येवले यांची निवड !          मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय प्रदेश प्रतिनिधी पदी उमेश येवले यांची निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक रविंद्र पवार, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष राखीताई जाधव, राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दिकी तसेच जिल्हा अध्यक्ष रुपेश खांडगे उपस्थित होते. 

महिला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
महिला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !       नासिक::- आलोसे स्नेहल सुनील ठाकुर, व्यवसाय अधिकारी, व्यवसाय कर अधिकारी कार्यालय, क्रुषी औद्योगिक संघ ली. इमारत क्र. ३, द्वारका नाशिक यांनी तक्रारदाराकडे ५००० रुपयांची लाच मागितली होती, तडजोडीअंती ४००० रुपयांची लाच पंचांसमक्ष स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या वतीने ताब्यात घेण्यात आले.             तक्रारदार यांनी त्यांचे कल्पदीप इंडस्ट्रीयल सेक्यूरिटी सर्व्हिसेस ही कंपनी दोन वर्ष पासुन बंद असल्याने तिचा व्यवसाय कर रद्द व्हावा यासाठी दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी व्यावसाय कर अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. सदर व्यवसाय कर रद्द करून देण्याच्या बदल्यात लोक सेविका स्नेहल ठाकुर यांनी तक्रारदार यांचेकडे पंचांसमक्ष लाच मागितली व ती स्विकारताना पंचासमक्ष स्विकारल्याने  त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.                  सापळा अधिकारी, विश्वजीत पांडुरंग जाधव, पोलीस उपाधिकारी, सापळा गाव पो. ह .प्रकाशे, पो. ना. प्रणय इंगळे, म. पो. शि. शितल ...

उपविभागीय अभियंता ४ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
उपविभागीय अभियंता ४ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !     नासिक/ जळगाव::- ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते, उपविभागीय अभियंता, वर्ग-१, बांधकाम उपविभाग चाळीसगाव, यांस ४ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.            तक्रारदार यांनी डॉ. शामा प्रसाद मुखर्जी रुरबन' या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग, ता. चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा ता. चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते.सदर कामाची ४ कोटी ८२ लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात  तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात लाचेची मागणी करून ४ लाख रुपये लाचेची  रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा.             सापळा अधिकारी स्वप्निल राजपूत, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. ना. प्रभाकर गवळी, पो. ना. संदीप हांडगे, पो. ना. किरण धुळे, पो. ना. अविनाश पवार, पो. ना. सुरेश चव्हाण यांनी श्रीमती शर्मिष्ठा घा...

‘क्षितिज’ अंकाचे अभिनव पद्धतीने प्रकाशन संपन्न !

इमेज
‘क्षितिज’ अंकाचे अभिनव पद्धतीने प्रकाशन संपन्न ! दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईच्या ‘क्षितिज’ अंकाचे अभिनव पद्धतीने प्रकाशन संपन्न !          नाशिक (प्रतिनिधी) : पुस्तक प्रकाशने, दिवाळी अंकाची प्रकाशने ही प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मात्र नाशिक येथे सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या हातून दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईच्या ‘क्षितिज’ या अंकाचे प्रकाशन झाले. पुस्तक प्रकाशनाचा अनुभव प्रत्येकाला निश्‍चितच सुखावणारा होता.  असोसिएशनतर्फे नागरी सहकारी बँकांच्या गुणवत्तापुर्ण व्यवस्थापन तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांना सन्मानित केले. ‘गुरूदक्षिणा’, गोखले एज्युकेशन सोसायटी प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी विद्यानगर कॉलेजरोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ‘क्षितिज’ अंकाचे प्रकाशन अभिनव पद्धतीने करण्यात आले.               या समारंभासाठी महाराष्ट्रातून कानाकोपर्‍यातून आलेल्या उपस्थितांची संख्या ९०० हून अधिक...

कनिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
कनिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !      नासिक::- कनिष्ठ लिपिक दिगंबर अर्जुन साळवे, शिक्षण उप संचालक कार्यालय, नासिक, वर्ग ३ यांस ५०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.             तक्रारदार हे नाशिक शहरातील एका खासगी शाळेत दि. १३ डिसेंबर २०१९ पासून ते ३१ डिसेंबर २०२२ पावेतो शिक्षण सेवक म्हणून नोकरीस होते व त्यानंतर  शिपाई या पदासाठी त्यांची मान्यता आल्यानंतर ते दिनांक १ जानेवारी २०२३ पासून ते आज पावतो सदर शाळेत शिपाई या पदावर कार्यरत आहेत. त्यांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारे वेतन मिळालेले नाही. सदर वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी शाळेच्या मार्फतीने शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवला आहे. सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथील आलोसे, कनिष्ठ लिपिक यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष  ५००००/-  रुपये लाचेची मागणी करून ती आज दि. १३ रोजी पंचासमक्ष नासिक शिक्षण उप संचालक कार्यालयात स्वीकारल...

पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !        नासिक/जळगाव::- पोलिस उपनिरीक्षक जयंवत प्रल्हाद पाटील, नेम. पारोळा पोलीस स्टेशन जि. जळगाव. वर्ग-२ यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           तक्रारदार यांचेवर व त्यांचे नातेवाईकावर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर ३४४/२०२३ भादवि कलम ३२४, ३२३, ३४१, ३४२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे १२ ऑगस्ट २३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील तकारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी तसेच मा. न्यायालयात दोषारोप पत्र लवकरात लवकर पाठविण्यासाठी यातील तक्रारदार यांचे कडेस ३००००/ रुपयांची मागणी करून या अगोदर २००००/ रुपये घेतले व उर्वरित १००००/ रुपये नंतर घेवून या असे सांगितले. त्यानंतर आज दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी यातील आलोसे यांनी पंचा समक्ष १०००/हजाराची मागणी करून तडजोडअंती ८०००/ स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.         ...

बाबाज् थिएटर्स आयोजित सांस्कृतिक सोहळा २०२३, रसिकांना विनामूल्य सोहळ्याची पर्वणी !!

इमेज
बाबाज् थिएटर्स आयोजित सांस्कृतिक सोहळा २०२३, रसिकांना विनामूल्य सोहळ्याची पर्वणी !!        नासिक (प्रतिनिधी)::- बाबाज् थिएटर्स ही संस्था गेल्या २३ वर्षांपासून महाराष्ट्रभर सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. १७ सप्टेंबर २००० रोजी संस्थेची स्थापना झाली. त्यानिमित्ताने यावर्षी होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्याचा शुभारंभ बुधवार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक ०६:०० वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे कथक नृत्यांगना निकिता सिंग (दिल्ली) यांचे एकल कथक नृत्याचे सादरीकरण होणार आहे, त्यांना या सादरीकरणात नाशिक मधील तबलावादक कुणाल काळे, गायक पुष्कराज भागवत व सितार वादक प्रतीक पंडित साथसंगत करतील. या कार्यक्रमाची सुरुवात सितार वादक प्रतीक पंडित यांच्या एकल वादनाने होईल, त्यांना नाशिक मधील उभरते तबला वादक अद्वय पवार साथ संगत करतील.        सर्व रसिक श्रोत्यांनी या अलौकिक व विनामूल्य अशा दर्जेदार कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन बाबाज् थिएटर्स तर्फे प्रशांत जुन्नरे, अमोल पाळेकर, कैलास पाटील, डॉ. प्रमोद शिंदे, नारायण गायकवाड, एन. सी. देशपांडे, योगिता पाट...

आधाराश्रमाला देणग्यांचा आधार महत्वाचावार्षिक सर्वसाधारण सभेतला सूर !

इमेज
आधाराश्रमाला देणग्यांचा आधार महत्वाचा वार्षिक सर्वसाधारण सभेतला सूर !            नाशिक ( प्रतिनिधी ) आधाराश्रम या सेवाभावी संस्थेला देणगीदारांचा नेहमीच भक्कम आधार असतो. बदलत्या काळानुसार जनरेटर ही गरज झाली आहे. एका देणगीदारांनी नुकताच एक जनरेटर व सीसीटीव्ही कॅमेरे संस्थेला देणगी स्वरूपात दिले आहेत. संस्थेला शासनाचे मिळणारे अनुदान तुटपुंजे असते व विलंबाने मिळते त्यामुळे देणग्यांवरच विसंबून रहावे लागते. अधिकाधिक देणगीदारांनी पुढे यावे असा सूर वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटला.      अनाथ व परित्यक्त बालकांचे घर असलेल्या आधाराश्रम असलेल्या संस्थेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल (दि.१०) झाली. घारपुरे घाटावरील संस्थेच्या वास्तूत झालेल्या या सभेच्या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष विजय दातार, कार्यवाह हेमंत पाठक व सुनीता परांजपे  उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. २०२२ - २३ या वर्षातील वार्षिक अहवाल व ऑडीटेड स्टेटमेंट यांना मंजुरी देण्यात आली. अंदाजपत्रकातील कमीअधिक खर्च मंजूर झाले. ज्या देणग...