मत प्रदर्शन -(४) कोमल फलके, आष्टी, नागपूर, स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !
मत प्रदर्शन -(४) कोमल फलके, आष्टी, नागपूर, स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" ! १) स्त्रिया उच्चशिक्षित असतील किंवा कोणीही उच्चशिक्षित असला म्हणजे त्याने नोकरी करायलाच पाहिजे असा त्या उच्च शिक्षणाचा अर्थ होत नाही किंबहुना उच्चशिक्षित सोबतच ज्याचे फंडामेंटल आणि कन्सेप्टस परिपूर्णपणे क्लियर असतात ते लोक नोकरीकडे न जाता स्वतः चा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ डॉक्टर, जे डॉक्टर्स स्वतःला परिपूर्ण समजतात ते स्वतःचा दवाखाना थाटून रोग्यांची सेवा करतात व नंतर तज्ञ डॉक्टर म्हणून उदयास येतात परंतु त्यांच्या इतकी शैक्षणिक योग्यता असलेले लोक हे मेडिकल ऑफिसर वगैरे सारखे पदांवरती कार्यरत असतात २) घरची परिस्थिती चांगली असेल तर त्या विचाराप्रमाणे नोकरी करायची गरज नाही परंतु फायनान्शियल स्टेटस आणि नोकरी या भिन्न बाबी आहेत, धंदा उद्योग व्यवसाय सर्वांनाच करणे जमत नाही आणि नोकरीमध्ये एक ठराविक वेळ सकाळी जाणे आणि सायंकाळी परत घरी येणे इतका वेळ...