पोस्ट्स

म्युनिच इथे झालेल्या ‘इंटर सोलर युरोप, २०२३’ ह्या प्रदर्शनात इरडाचा सहभाग; शाश्वत भविष्यासाठी ऊर्जा संक्रमणाच्या मोहिमेत जागतिक हितसंबंधियांशी चर्चा !

इमेज
म्युनिच इथे झालेल्या ‘इंटर सोलर युरोप, २०२३’ ह्या प्रदर्शनात इरडाचा सहभाग;  शाश्वत भविष्यासाठी ऊर्जा संक्रमणाच्या मोहिमेत जागतिक हितसंबंधियांशी चर्चा !                    इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी– इरेडा (IREDA) ने जर्मनीतील म्युनिच इथे झालेल्या ‘इंटरसोलर युरोप २०२३’ ह्या  तीन दिवसीय प्रदर्शनात  सहभाग घेतला. १४ ते १६ जून २०२३ ह्या काळात हे प्रदर्शन झाले. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील, इरडा ही मिनी रत्न श्रेणीतील, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना असून, ह्या प्रदर्शनात त्यांनी एक पॅव्हेलियन स्थापन करुन आपल्या संघटनेबद्दल, प्रदर्शनात येणाऱ्या लोकांना माहिती दिली, अक्षय ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करणे, ऊर्जा क्षमतेला प्रोत्साहन देणे आणि भारतात अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या वृद्धीला पाठबळ देणे, अशा कामात इरडाच्या भूमिकेची माहिती प्रदर्शनाला येणाऱ्या लोकांना झाली. इरडाचे नेटवर्क वाढवणे आणि इरडासोबत व्यवसायाच्या संभाव्य संधी शोधण्यासाठी देखील हे पॅव्हेलियन एक मंच म्हणून उपयुक्त ठरले. विशेषतः आज जेव्हा ऊर्जा संक्रमणासाठीचा महत्वाचा काळ असून इरडा इनिशिय

'निसर्गस्पर्श' प्रदर्शनात प्रेक्षकांच्या भेटींनी खुलले जलरंग चित्रण !

इमेज
'निसर्गस्पर्श' प्रदर्शनात प्रेक्षकांच्या भेटींनी खुलले जलरंग चित्रण ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, 7387333801.          नाशिक ( प्रतिनिधी ) - अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कलाशिक्षक असलेल्या चित्रकार संतोष कर्डक यांच्या 'निसर्गस्पर्श' या चित्रप्रदर्शनाचे उदघाट्न काल रविवारी ( दि.१८ ) नाशिकरोडच्या पु. ना. गाडगीळ कलादालनात झाले. उदघाट्क म्हणून ज्येष्ठ चित्रकार प्रा. संजय साबळे उपस्थित होते. ते म्हणाले, माझा विद्यार्थी उत्तम चित्रकार झाल्याचे समाधान वाटते. या प्रदर्शनात जलरंगातील निसर्गचित्रण खुलले आहे. पावसाळ्याने ओढ दिलेली असतांना सर्वजण वरुणराजाची‌ प्रतीक्षा करीत आहेत. अशातच चित्रातील हिरवाईने नटलेला ग्रामीण भाग बघणाऱ्यांना प्रसन्न अनुभूती देतो. आल्हाददायक रंगसंगतीने ही चित्रे नटली आहेत.    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सुभाष चासकर, संगमनेरचे उद्योजक कैलास शेळके, डॉ. सुधाकर जगताप, कलासमीक्षक संजय देवधर, पी. एन.जी. च्या व्यवस्थापिका प्रविणा दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी कर्डक यांच्या कलेचे भरभरून कौतुक केले. मनोगताद्वारे संतोष कर्डक यांनी आपला क

श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान राज्यस्तरीय पुरस्काराने डी.डी. साळुंके सन्मानित !

इमेज
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान राज्यस्तरीय पुरस्काराने डी.डी. साळुंके सन्मानित ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, 7387333801.                नंदुरबार :- जागतिक पर्यावरण दिन ५ जूनच्या निमित्ताने व महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त, निसर्ग मित्र समितीचा वर्धापन दिनाचे औचित्य साधून पद्मश्री टॉवर हॉल विजय पोलीस कॉलनी, वाडीभोकर रोड, देवपूर धुळे येथे दिमाखदार सोहळा संपन्न झाला. धुळे शहराच्या महापौर, प्रतिभाताई चौधरी, धुळे जि.प.अध्यक्ष आकीॅटेक अश्विनीताई पवार, मुख्य वन संरक्षक धुळे, डिगंबर पवार यांच्या हस्ते डी.डी.साळुंके यांना शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन २०२२-२३ चा श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.           मागील दोन दशकापासून डी. डी.साळुंके हे श्री. आप्पासो.आ.ध. देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता.जि.नंदुरबार विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.                       सामाजिक, शैक्षणिक, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण, वृक्ष लागवड व संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन या क्षेत

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी रथाची यात्रेदरम्यान दररोज ताज्या सुवासिक फुलांची सजावट ! Santshreshta Nivrutti Maharaj Palakhi Ceremony, Trimbakeshwar to Pandharpur

इमेज
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी रथाची यात्रेदरम्यान दररोज ताज्या सुवासिक फुलांची सजावट ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, 7387333801         माडसांगवी (बिडवे)::- आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर येथून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी रथाची दररोज ताज्या सुवासिक आणि निरनिराळ्या जातीच्या फुलांनी सजावट करण्याची परंपरा असून आज दि.१८ रोजी घोगरगाव जि. अहमदगर येथे माडसांगवीच्या मित्र मंडळाने अतिशय सुबक सजावट केली.                  माडसांगवी येथील वैकुंठवासी शिवाजी महाराज पेखळे यांच्या प्रेरणेने ही रथ सजावट परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून निरनिराळ्या गावातील मित्रमंडळी, सामाजिक संस्था, वारकरी आणि गावकरी तरुण यांच्या माध्यमातून रथाच्या मुक्कामाच्या ठिकाणी भल्या पहाटेच दररोज रथ सजावटीसाठी लगबग सुरू होते. उत्साहाने निरनिराळ्या डिझाईन आणि हार, फुले, तोरणे, बुके यांच्या माध्यमातून रथ सजावट केली जाते. सुवासिक आणि आकर्षक फुलांनी रथासह नाथ महाराजांच्या पालखीची ही सजावट पहाटे पाच ते सात या वेळेत पूर्ण करून रथ सजावटकार मंडळींच्या माध्यमातून

A numerical scientist who falsely confesses the oiler: Dr. Raj Chandra Bose. ऑयलर चे अनुमान खोटे ठरविणारे संख्याशास्रज्ञ : डॉ. राज चंद्र बोस ! १९ जून, जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!

इमेज
ऑयलर चे अनुमान खोटे ठरविणारे संख्याशास्रज्ञ : डॉ. राज चंद्र बोस   ! १९ जून, जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! A numerical scientist who falsely confesses the oiler: Dr. Raj Chandra Bose.             डॉ. राज चंद्र बोस तथा आर. सी. बोस हे अमेरिकेत काम करणारे भारतीय गणितज्ञ आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ होते. डिझाईन थिअरी, मर्यादित भूमिती आणि एरर-करेक्टिंग कोडच्या सिद्धांतामधील त्यांचे संशोधन कार्य प्रसिद्ध आहे. १७८२ साली लिओनार्द ऑयलर या स्विस गणितज्ञाने काटकोनी लॅटिन चौरसा (ओर्थोगोनल लेटीन स्क्वेअर) विषयी मांडलेले अनुमान रचनात्मक सिद्धतेसह सपशेल खोटे ठरविणाऱ्या त्रिमूर्तीपैकी एक असणारे आर. सी. बोस यांचा १९ जून हा जन्मदिन. त्यानिमित्ताने,,,,,,,                 डॉ. राज चंद्र बोस यांचा जन्म मध्यप्रदेश मधील होशंगाबाद या गावी १९ जून १९०१ रोजी झाला होता. तथापि, त्यांचे बालपण हरियाणा राज्यातील रोहतक या शहरात गेले. त्यांचे वडील प्रताप चंद्र बोस यांनी रोहतक शहरात डॉक्टर होण्यापूर्वी ब्रिटिश सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले होते. राज चंद्र हे त्यांच्या पालकांच्या चार अपत्यांपैकी सर्वात मोठे. त्यांचे वडील आपल

शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक::- पंचायत समिती येवला येथील शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक आलोसे संजय रामदास पाटील यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले      तक्रारदार हे उपशिक्षक असून त्यांची आणि त्यांची पत्नी यांचे अंतिम वेतन देयक तयार करून देण्यासाठी आलोसे संजय रामदास पाटील वरिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग पंचायत समिती येवला जिल्हा नाशिक यानी २०००/-रुपयाची मागणी करून तक्रारदार यांचे कडून येवला पोस्ट ऑफिस समोर पंच साक्षीदार समक्ष स्विकारताना त्यांस रंगेहात पकडण्यात आले असुन याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.           सापळा अधिकारी साधना भोये, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. ह. चंद्रशेखर मोरे, पो. ना. दीपक पवार यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय , ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. 

'निसर्गस्पर्श' चित्रप्रदर्शनाचे रविवारी उदघाट्न !

इमेज
'निसर्गस्पर्श' चित्रप्रदर्शनाचे रविवारी उदघाट्न !       नाशिक ( प्रतिनिधी ) - अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कलाशिक्षक असलेल्या चित्रकार संतोष कर्डक यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ' निसर्गस्पर्श ' या जलरंगातील  प्रदर्शनाचे उदघाट्न रविवारी ( दि.१८ ) सायंकाळी ५ वाजता नाशिकरोडच्या पु. ना. गाडगीळ कलादालनात होईल. उदघाट्क म्हणून ज्येष्ठ चित्रकार प्रा. संजय साबळे उपस्थित रहाणार आहेत.    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. किरण लहामटे,  मुख्याध्यापक सुभाष चासकर, संगमनेरचे उद्योजक कैलास शेळके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. सुधाकर जगताप उपस्थित राहतील. संतोष कर्डक यांनी आर्ट टीचर्स डिप्लोमा, आर्ट मास्टर व इंटेरिअर डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. अकोले तालुक्यातील साकिरवाडी येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात कलाशिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांना कलेचे मार्गदर्शन करतात. आपली नोकरी सांभाळून त्यांची सातत्याने कलासाधना सुरु असते. जलरंग हे त्यांचे आवडते रंगमाध्यम असून निसर्गदृश्ये रंगवण्यात ते रंगून जातात. त्यातीलच अलीकडे रंगवलेली सुमारे ५० चित्रे प्रदर्शन

एलन नाशिकच्या आशिष भराडिया याने दिव्यांग गटात मिळविली ऑल इंडिया रँक-१ ७ विद्यार्थींनी मिळविले ६०० पेक्षा जास्त गुण !

इमेज
एलन नाशिकच्या आशिष भराडिया याने दिव्यांग गटात मिळविली ऑल इंडिया रँक-१  ७ विद्यार्थींनी मिळविले ६०० पेक्षा जास्त गुण !     नाशिक::- नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मंगळवारी रात्री उशिरा देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG चा निकाल जाहीर केला.          एलनचे उपाध्यक्ष अमित मोहन अग्रवाल म्हणाले की, एलनच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली उत्कृष्टता सिद्ध केली आहे. नाशिकच्या आशिष भराडिया याने दिव्यांग गटात ऑल इंडिया रँक-१ मिळवला आहे, आशिषला ७२० पैकी ६९० गुण मिळाले आहेत. यासोबतच एलन नाशिकच्या आणखी ७ विद्यार्थ्यांनीही ६०० हून अधिक गुण मिळवले आहेत. आशिष भराडीयाशिवाय यशराज सदाफळला ६७०, अश्मित चोरडियाला ६६५, सार्थक पगारला ६४१, ओजस  सावकरे ६४०, अनन्या देसाईला ६३९ आणि मानसी नाथेला ६०५ गुण मिळाले आहेत. एलन नाशिकचे केंद्रप्रमुख शशी शंकर सिंग यांनी सांगितले की, राष्ट्रीय निकालात  एलनच्या पार्थ खंडेलवालने ७१५ गुण मिळवून अखिल भारतीय रँक-१० आला आहे. यासह पार्थने राजस्थानमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. शशांक कुमारने ७१५ गुण मिळवून अखिल भारतीय रँक १४ मिळवला आणि बिहार राज्यात अव्वल ठरला आहे. शुभ

फौजदारी संकलन शाखेत कार्यरत महसूल सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
फौजदारी संकलन शाखेत कार्यरत महसूल सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !         नासिक ::- शेवगाव जि. अहमदनगर येथील फौजदारी संकलन शाखेत कार्यरत महसूल सहाय्यक आलोसे संतोष सहदेव गर्जे यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.                तक्रारदार यांची दोन मुले व भाचा यास सब जेलमधून सोडण्याची मदत केल्याच्या मोबदल्यात तसेच तहसील कार्यालयात त्यांचेविरूद्ध येणा-या चाप्टर केसमध्ये मदत करण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदारा  कडे आज तडजोडी अंती पंचासमक्ष ४०००/- रुपयेची लाचेची मागणी करून सदर ४०००/- रुपये लाचेची रक्कम तहसील कार्यालय येथे पंच साक्षीदार समक्ष स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.            सापळा अधिकारी मिरा आदमाने, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. ना. प्रकाश महाजन, पो. ना. प्रवीण महाजन, चालक हवा संतोष गांगुर्डे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई

कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकाने निरिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकाने निरिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !     नासिक::- उपायुक्त कार्यालयातील दुकाने निरिक्षक आलोसे निशा बाळासाहेब आढाव यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           तक्रारदार हे हॉटेल व्यवसायी असून ते नासिक येथे चालवीत असलेल्या हॉटेल मध्ये बालकामगार नोकरीस असल्याची बतावणी करून त्याबद्दल आलोसे यांनी केलेल्या तपासणी दरम्यान त्यांचा नीरंक अहवाल पाठवून त्यांच्यावर बाल कामगार असल्यासंदर्भात गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात आढाव यांनी तक्रारदारा कडे पंचासमक्ष ५०००/-रुपये ची लाचेची मागणी करून सदर ५०००/- रुपये लाचेची रक्कम कामगार उपायुक्त कार्यालय, नासिक येथे पंच साक्षीदार समक्ष स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .            सापळा अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस उप अधिक्षक, सापळा पथक पो. ना. मनोज पाटील, पो. ना. अजय गरुड, म.पो.शि. शितल सूर्यवंशी यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअ