१७ लाखांची शिष्यवृत्ती मिळवत वाबळेवाडी शाळेतील तब्बल २२ विद्यार्थी एनएमएमएस मध्ये चमकले !
१७ लाखांची शिष्यवृत्ती मिळवत वाबळेवाडी शाळेतील तब्बल २२ विद्यार्थी एनएमएमएस मध्ये चमकले ! - शिष्यवृत्ती तज्ञ तुषार सिनलकर यांचे दैदिप्यमान यश ता.२८ (प्रतिनिधी)::- महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आदर्श शाळा वाबळेवाडीतील तब्बल २२ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये निवड झाली असून शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या परीक्षेला शाळेचे एकूण ३३ विद्यार्थी बसले होते. यातील सर्व ३३ विद्यार्थी पास झाले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तज्ञ तुषार सिनलकर यांनी मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये वर्षभर कसलाही खंड न पडू देता अविरत शिक्षण चालू ठेवणाऱ्या तुषार सिनलकर यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. निकाल जाहीर होताच ग्रामस्थांनी मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीने शिक्रापूर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर साहेब यांच्या हस्ते विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान केला. ...