वरिष्ठ तंत्रज्ञ व खाजगी इसम यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले !
वरिष्ठ तंत्रज्ञ व खाजगी इसम यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले ! नासिक::- फत्तेपूर जि. जळगाव येथील म.रा.वि.वि.कंपनी चा वरिष्ठ तंत्रज्ञ (सिनियर टेक्निशियन) विनोद उत्तम पवार, वय-३२ वर्ष, (वर्ग३) व खाजगी इसम कलिम सलीम तडवी, वय-२७ वर्ष, रा.देऊळगाव, ता.जामनेर यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. यातील तक्रारदार जळगाव येथे वास्तव्यास आहेत. हे तोरनाळे ता.जामनेर येथील मुळ रहीवासी असून ते सध्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुळगावी तोरनाळे ता. जामनेर ग्रामपंचायतीच्या त्यांच्या वडीलांच्या नावे असलेल्या बखळ जागी त्यांनी तयार केलेल्या पत्र्यांच्या शेडमध्ये विज मीटरचे नविन कनेक्शन घ्यायचे होते. म्हणून तक्रारदार म.रा.वि.वि.कंपनी लि.फत्तेपूर कार्यालयात जावून विज मीटरचे नविन कनेक्शन मिळणेसाठी विचारपुस केली असता सदर कार्यालयातील कर्मचारी सिनीयर टेक्नीशियन विनोद पवार व खाजगी इसम कलीम तडवी यांनी तक्रारदार यांना विज मीटरचे नविन कनेक्शन मिळणेसाठी ज्यांच्...