पोस्ट्स

माजी आमदार यांच्या 'वळणवाट' काव्यसंग्रहाचे रविवारी (दि.१रोजी) प्रकाशन !

इमेज
माजी आमदार यांच्या 'वळणवाट' काव्यसंग्रहाचे   रविवारी (दि.१रोजी) प्रकाशन       नाशिक :- माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित 'वळणवाट' या त्यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवारी (दि.१जानेवारी रोजी) सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे.      सावानाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. आमदार डॉ.सुधीर तांबे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे, मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, टीडीएफचे जिल्हाध्यक्ष प्रा.रवींद्र मोरे, ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले, प्रकाशक विलास पोतदार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कवी रवींद्र मालुंजकर हे सूत्रसंचालन करणार आहेत.      सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन वैशाली प्रकाशन संस्थेने केले आहे.

खासदाराच्या अटकेसाठी शासकीय कर्मचार्‍यांची तीव्र निदर्शने ! कारवाई न झाल्यास सर्व शासकीय कार्यलयांमध्ये संप करण्याचा इशारा !

इमेज
खासदाराच्या अटकेसाठी शासकीय कर्मचार्‍यांची तीव्र निदर्शने ! कारवाई न झाल्यास सर्व शासकीय कार्यलयांमध्ये संप करण्याचा इशारा !         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांचे नेते आणि दी महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला तसेच सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद चव्हाण यांचा गळा दाबून ठार करण्याचा कट करणारे व वरिष्ठ महिला अधिकारी यांना लज्जा वाटेल अशा शब्दांत शिवीगाळ व अपशब्द वापरल्याप्रकरणी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये तृतीयश्रेणी, चतुर्थश्रेणी व परिचारिका वर्गातील कर्मचार्‍यांनी दुपारी तीव्र निदर्शने केली. यानंतरही कारवाई न झाल्यास मात्र सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संप करून कामकाज बंद करण्याचा आणि त्याची सर्व जबाबदारी शासनाची राहिल, असा इशाराही कर्मचार्‍यांनी दिला आहे.  राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने मुंबईत कामा रुग्णालयात ही निदर्शने करण्यात आली तर ...

वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बाळासाहेब सोनवणे सन्मानित !

इमेज
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बाळासाहेब सोनवणे सन्मानित !          नाशिक - वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीतर्फे समाजाचे पहिले एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि. २५) रावसाहेब थोरात सहभागृहात पार पडले. त्यावेळी राज्य दिव्यांग अधिकारी व कर्मचारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संमेलन अध्यक्ष प्रा.वा. ना.आंधळे. समवेत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, स्वागताध्यक्ष प्रशांत आंधळे, संमेलन उद्घघाटक ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे, तसेच डॉ. लक्षराज सानप, मुंबई येथील डॉ. विजय दहिफळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आदी उपस्थित होते.

प्रवाशांची प्रीमियम प्रवासाला पसंती !आजपासून (रविवार २५ डिसेंबर) आणखी तीन मार्गावर सेवा, लोकेश चंद्र यांची माहिती

इमेज
प्रवाशांची प्रीमियम प्रवासाला पसंती ! आजपासून (रविवार २५ डिसेंबर) आणखी तीन मार्गावर सेवा, लोकेश चंद्र यांची माहिती            मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सेवेत ई- वातानुकूलित प्रीमियम बसेस आणल्या आहेत. १२ डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या प्रीमियम बसने रोज ३०० प्रवासी लक्झरी प्रवास करत असून, ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान प्रीमियम बसेसना प्रवासी पसंती देत असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. दरम्यान, प्रीमियम बस सेवेला पसंती बघता २५ डिसेंबरपासून आणखी तीन मार्गांवर सेवा सुरू करण्यात येत असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.          ओला-उबेरपेक्षा स्वस्त, आरामदायी, गारेगार प्रवास करता यावा म्हणून बेस्ट उपक्रमाने प्रीमियम बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत. ठाणे ते बीकेसी व वांद्रे स्थानक पूर्व ते बोकेसी दरम्यान, १२ डिसेंबरपासून प्रीमियम बससेवा प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावू लागली आहे. १...

शेकोटी संमेलनातून होणार लोककलेचा जागर- डॉ. शंकर बोऱ्हाडे

इमेज
शेकोटी संमेलनातून होणार लोककलेचा जागर- डॉ. शंकर बोऱ्हाडे              नाशिक (प्रतिनिधी) साहित्य आणि संस्कृतीचा नाशिकला जसा वारसा आहे तसाच तो लोककलेचाही आहे.नाशिकने जसे साहित्याला साहित्यिक दिले तसेच शाहीर आणि लोककलावंतही दिलेत. बदलत्या काळात मात्र लोककला हळूहळू लोप पावतील की काय अशी भीती वाटत असते पण गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी यासाठी अनोखे पाऊल उचलले आहे. आपल्या नियोजनबद्ध आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या गिरणा गौरव प्रतिष्ठानने नाशिकमध्ये आगळ्या वेगळ्या शेकोटी संमेलनाचे आयोजन केले असून या संमेलनातून लोककलांचा जागर होणार आहे. या पहिल्या वहिल्या साहित्यसंमेलनाचा मी अध्यक्ष असल्याचा मला नक्कीच अभिमान वाटतो असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी केले. ते भावबंधन मंगल कार्यालयात शेकोटी संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्याच्या प्रित्यर्थ आयोजित सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना बोलत होते. मंचावर शेकोटी साहित्य संमेलनाचे निमंत्रक आर्कि. बाळासाहेब मगर, सावाना चे पदाधिकारी जयप्रकाश जातेगावकर, संजय ...

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !

इमेज
मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !         मुंबई (प्रतिनिधी)::- दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार, प्रादेशिक संचालनालय, मुंबई विभाग व श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना महाराष्ट्र राज्य (रजि) यांच्या संयुक्त विद्यमाने 'मूर्तिकार कारागीर कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा' पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.            कार्यक्रमाचे उद्घाटक संदीप सिद्धे गुरुजी तसेच श्रमिक बोर्डाचे राष्ट्रीय सदस्य सुधाकर अपराज, सल्लागार समितीचे अध्यक्ष रवींद्र पुरोहित, स्वावलंबी भारत अभियानाचे संदीप देशपांडे. कौशल्य विकास तज्ञ विनायक जोगळेकर तसेच संघटनेच्या पदाधिकारी आणि सर्व उपस्थितांच्या साक्षीने झाले.           कार्यक्रमाची सुरुवात संदीप सिद्धे गुरुजी यांच्या मनोगताने झाली. शास्त्रशुद्ध पद्धतीने गणेश मूर्ती कशी घडवावी याबद्दल त्यांनी माहिती दिली. विभागीय संचालक चंद्रसेन जगताप यांनी लघ...

राज्यस्तरीय गझल लेखन महास्पर्धेच्या चौथ्या पर्वाला जानेवारीपासून प्रारंभ !

इमेज
राज्यस्तरीय गझल लेखन महास्पर्धेच्या चौथ्या पर्वाला जानेवारीपासून प्रारंभ !        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : उभ्या महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या गझल मंथन साहित्य संस्थेच्या राज्यस्तरीय गझल लेखन महास्पर्धेच्या चौथ्या पर्वाला जानेवारी २०२३ महिन्यापासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्हाने गौरविण्यात येणार आहे.         लिहित्या हातांना प्रोत्साहन देण्यासाठी व नवोदित गझलकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, ह्या उदात्त हेतूने गझल मंथन साहित्य संस्था दरवर्षी गझल लेखन महास्पर्धेचे आयोजन करते. या स्पर्धेच्या माध्यमातून संस्थेने आजपर्यंत अनेक गझलकारांना नावारूपास आणले आहे. हा उपक्रम पुढे निरंतर सुरू राहावा म्हणून संस्थेतर्फे चौथ्या पर्वाला जानेवारी महिन्यापासून प्रारंभ करण्यात येत आहे. ही स्पर्धा व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून ऑनलाईन घेतली जाणार आहे. महास्पर्धेचे नियम असे आहेत. दर महिन्याच्या ३० तारखेला स्पर्धा घेण्यात येईल. एकूण बारा फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक महिन्याला वेगळे...

शासकीय यंत्रणेतर्फे नागरिकांना सुविधा पुरवण्याचे निर्देश ! मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्यात भेट !

इमेज
शासकीय यंत्रणेतर्फे नागरिकांना सुविधा पुरवण्याचे निर्देश ! मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्यात भेट !         नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी (१४ रोजी ) सुरगाणा तालुक्याला भेट देत पंचायत समिती सुरगाणा येथे आढावा बैठक घेतली. पंचायत समिती सुरगाणाच्या वतीने यावेळी सरपंच संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रवींद्र परदेशी, गट विकास अधिकारी दीपक पाटील यांच्या तालुक्यातील सर्व सरपंच, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.          सुरगाणा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयांनी नागरिकांना सर्व सुविधा पुरवाव्यात, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणेसह नागरिकांनी देखील पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासकीय यंत्रणा सुरगाणा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असेही त्यांनी सांगितले.       उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी या सरपंच संवाद कार्यक्रमात ग्रामपंचायतीच...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान; सामूहिक व वैयक्तिक शेततळ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत- मोहन वाघ

इमेज
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान;  सामूहिक व वैयक्तिक शेततळ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत- मोहन वाघ                                      नाशिक १४,(जिमाका वृत्तसेवा)::- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचन व दुष्काळी भागात फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने सामूहिक शेततळे व वैयक्तिक शेततळे देण्यात येते. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.         या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना २०२२-२३ अंतर्गत पाण्याचा साठा निर्माण करणे व साठवलेले पाणी झिरपून वाया जावू नये तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग होण्याच्या उद्देशाने वैयक्तिक शे...

आरोग्य विभागाच्या हिवाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !

इमेज
आरोग्य विभागाच्या हिवाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !        नाशिक: (दि. 12) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र - २०२२ अभ्यासक्रमाच्या परीक्षेस दि. १३ डिसेंबर २०२२ पासून प्रारंभ होत आहे.          विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, हिवाळी सत्र - २०२२ मधील परीक्षा राज्यातील एकूण १७१ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी सुमारे ४६००० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. यानुसार सदर परीक्षा ३० डिसेंबर २०२२ पर्यंत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.          हिवाळी सत्र - २०२२ परीक्षेत पदवी अभ्यासक्रमाचे  First Year MBBS (Old) Supplementary, BDS, BAMS, BUMS, BHMS, BPTh, BOTh,  P.B.B.Sc ., Basic B.Sc., B.P.O., BASLP, व PG - DM, MCh, M.D.S., Diploma Dentistry, MD/MS Ayurveda & Unani, MD Homoeopathy, Diploma Ayurveda, MOTh, MASLP, M.Sc. (Aud.), M.Sc. (SLP),...