जिल्हा परिषद "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद !
जिल्हा परिषद "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद ! नाशिक (प्रतिनिधी)::- जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक इतिवृत्त पुस्तक रुपात प्रसिद्ध करण्याची संकल्पना नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागात मुख्य औषध निर्माण अधिकारी म्हणुन कार्यरत असणारे जी.पी. खैरनार यांनी तात्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती पत्राद्वारे केली होती. नाशिक जिल्हा परिषदेने या वैविध्यपूर्ण उपक्रमास नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नियमित विषय घेऊन अभिनंदनासह मान्यता दिली होती. नाशिक जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपादकीय जबाबदारी घेऊन नाशिक जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त उपलब्ध करुन दिले होते. जी. पी.खैरनार यांनी सदर इतिवृत्त संकलित करुन जिल्हा परिषद नाशिक "ग्रामविकासाची शाळा" हे शीर्षक घेऊन पुस्तकाची बांधणी केली होती. प्रस्तुत पुस्तकाचे प्रकाशन नाशिक जिल्हा परिषदेने नाशिक जिल्हा परिषदेच्या दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ च्या सर्वसाधारण सभेत केले होते. ना...