सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन !
सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन ! नासिक::- दि.३१ आक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त ग्रामपंचायत पिंप्री सय्यद ता.व जि. नाशिक येथे एकता दौड कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंद पिंगळे, उपमुकाअ (ग्रापं) रविंद्र परदेशी, तसेच गटस्थरावरील सर्व खातेप्रमुख मा.सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामस्थ, माध्यमिक शाळेतील विध्यार्थी, गांवपातळीवरील सर्व कर्मचारी सहभागी होते, कार्यक्रम प्रसंगी ४ किमी. एकता दौड करण्यात आली, सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी प्रतीमा पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व एकात्मतेची शपथ घेण्यात आली, तसेच ग्रामस्थांच्या एकजुटी बाबत व सर्वधर्म समभाव बाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल यांनी समाधान व्यक्त केले.