४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत पूर्ण !
४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत पूर्ण ! पिंपळगाव बसवन्त येथील व्यंकटेश बालाजी मंदिर श्री बालाजी हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो. मनापासून प्रार्थना केली तर भगवान बालाजी नक्कीच इच्छापूर्ती करतो, अशी भाविकांची श्रद्धा असते. त्याचेच प्रत्यंतर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवन्त येथील बालाजी भक्तांना आले. ४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले मंदिर उभारणीचे स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत त्यांच्याच पुढच्या पिढीच्या हातून पूर्ण झाले. हा चमत्कार बालाजीच्या कृपेनेच घडला, यात शंका नसल्याची भावना महेशनगरवासीयांची आहे. पिंपळगाव बसवन्त हे नाशिक जिल्ह्यातील संपन्न गाव. बागायतदार शेतकरी द्राक्ष, कांदा पिकवतात. अनेक जातिधर्मांचे नागरिक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. येथील माहेश्वरी समाजातील काही जणांनी गावात भगवान बालाजीचे मंदिर असावे अशी संकल्पना मांडली. कारण तिरुपती बालाजीवर श्रध्दा असली तरी सर्वसामान्य भाविकांना लांबचा प्रवास करून तेथे जाणे शक्य होतेच असे नाही. म्हणून त...