माथी मुकुट, हाती कलश !मुखातून शत शत नमन !!महामस्तकाभिषेक सोहळा १० जुलै पर्यंत वाढवला...!
माथी मुकुट, हाती कलश ! मुखातून शत शत नमन !! महामस्तकाभिषेक सोहळा १० जुलै पर्यंत वाढवला...! ऋषभदेवपुरम- मांगीतुंगी(प्रतिनिधी) गुरुवारी (दि.३०) प्रत्येक अभिषेककर्त्याच्या माथ्यावर मुकुट, हाती कलश आणि मुखामध्ये शत शत नमनचा जयघोष असे प्रसन्नता वाढवणारे चित्र दिसत होते. सलग १६ दिवस सुरू असलेल्या महामस्तकाभिषेक महोत्सवात गुरुवारी (दि.३०) आनंदमय वातावरणात भाविकांनी ऋषभदेव व सर्व तीर्थंकरांच्या नावांनी जयघोष केला. उपस्थित सर्व श्रावक- श्राविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा व रत्नवृष्टीचा सात्विक आनंदही मिळवला. यावेळी पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामींनी असंख्य भाविकांच्या मागणीनुसार दि. १० जुलैपर्यंत सोहळा सुरू राहील अशी भाविकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात घोषणा केली. गुरुवारी (दि.३०) पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथून ऋषभगीरीवर जाण्यासाठी रीघ लागली होती. सकाळपासून पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक झाला. प्रथम कलशाचा मान मुंबईचे सुनील गंगवाल, मेरठ येथून आले...