पोस्ट्स

१७ जूनला कसा असेल "अॅसिड व्हिक्टीम" "आठवा रंग प्रेमाचा" !

इमेज
१७ जूनला कसा असेल "अॅसिड व्हिक्टीम" "आठवा रंग प्रेमाचा"  चित्रपटातील रिंकूचा वेगळा लूक बघायला मिळणार ! - १७ जूनला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला  काळ कितीही आधुनिक झाला, तरी स्त्रियांवरील अत्याचार हा सामाजिक प्रश्न आजही कायम आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचा प्रश्नाबरोबरच एका प्रेमकहाणीवर आधारित 'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. १७ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरूनं अॅसिड व्हिक्टिमची भूमिका करत पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअप केला आहे.             अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी  "आठवा रंग प्रेमाचा" या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव, राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद समीर कर्णिक यांचे असून यांनी "क्युं हो गया ना.." या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर "यमला प...

पितापुत्र रंगवतात सुरेख वारली चित्रे ! वडिलांप्रमाणे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड परदेशवारी साठी मुलाचीही इच्छा !!

इमेज
पितापुत्र रंगवतात सुरेख वारली चित्रे !    वारली चित्रशैली जशी कलावंतांच्या मनाला आनंद देते, तशीच ती त्यांच्या पोटाला घासही देते. डहाणू तालुक्यातील रायतळी या पाड्यावर राहाणारे नथू सुतार उत्तम वारली कलाकार आहेत. अनेक वर्षांपासून शेती कसतानाच ते सुंदर वारली चित्रे रंगवतात. त्यांचा मुलगा सुभाष त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन वारली चित्रे रेखाटतो. तो म्हणतो, "चारपाच महिने शेतीचे काम असते. उरलेल्या दिवसांमध्ये वडील व मी वारली चित्रे रंगवतो. त्यावर वर्षभर आमचा उत्तम उदरनिर्वाह होतो."   आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यातर्फे दि.२७ ते ३१ मे दरम्यान नाशिकला आदि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आदिवासींच्या कलात्मक वस्तूंची दालने मांडण्यात आली. सहभागी होण्यासाठी वारली कलाकारांनाही निमंत्रित करण्यात आले. सुभाष सुतार आपली सुंदर वारली चित्रे घेऊन आला होता. ५० रुपयांच्या ग्रीटिंग कार्डपासून ५ हजार रुपयांच्या भव्य वारली पेंटिंगपर्यंत अनेक चित्रे त्याच्या दालनात सजली होती. सुभाषशी संवाद साधला असता तो म्हणाला, "१८ वर्षांपूर्वी मी वडिलांकडे वारली चित्रकला शिकलो. त्य...

३५ वर्षांनंतर १५० पोलिस अधिकारी जेव्हा एकमेकांना भेटतात ! खालील लिंकवर क्लिक करून कुठे भेटलेत ? वाचा सविस्तर

इमेज
महाराष्ट्र पोलिस अकॅडमीत  भेटले ३५ वर्षांपूर्वीचे सहकारी नाशिक ( प्रतिनिधी ) - १९८७ बॅचचे पोलिस अधिकारी ३५ वर्षांनंतर एकमेकांना भेटले. यावेळी आठवणी जागवतानाच सोनेरी क्षणांना उजाळा देण्यात आला. त्यासाठी निवृत्त अधिकारी विनोद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगले नियोजन केले. त्यामुळे १५० जणांना महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथे आयोजित स्नेहसंमेलनात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यात सुमारे १० महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. सारेजण या सोहळ्यात हरखून गेले. सेवानिवृत्त झालेल्या किंवा त्या उंबरठ्यावर असणाऱ्या सर्वांनाच आपण अजूनही तरुण असल्याचा आनंद मिळाला.   १५ जून १९८७ ते ३१ मे १९८८ या वर्षभरात नाशिकच्या तत्कालीन पीटीसीमध्ये महाराष्ट्रातील ३०० व गोव्यातील २८ युवकांनी कठोर प्रशिक्षण घेतले. त्यात ३० युवतींचीही त्यावर्षी प्रथमच एमपीएससीद्वारा निवड झाली होती. त्या साऱ्यांना एकत्र आणून नाशिकला दोन दिवसांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. विनोद सावंत यांच्या मूळ संकल्पनेला अनेकांनी साथ दिली. दरम्यानच्या काळात बहुतेकजण सेवानिवृत्त झाले. ४६ जण दिवंगत झाले. मात्र महिला अधिकाऱ्यांसह...

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला ! डाॅक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांची "लिजेंड आॅफ इंडिया" पुरस्कारासाठी निवड !

इमेज
नाशिक::- येधील साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अॅण्ड रिसर्च सेंटर चे संस्थापक,  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांची भारतातील अग्रगण्य EOCONOMIC TIMES ने दखल घेत त्यांची मानाचा  'LEGEND OF INDIA '   (FOR CARDIOLOGY) २०२२ साठी निवड केली. इकाॅनामिक्स टाईम्स च्या पाचव्या डाॅक्टर्स डे बैठक २०२२ च्या कार्यक्रमात त्यांना विशेष निमंत्रित केले आहे.        सदर पुरस्कार प्रदान कार्यक्रम ३० जुन रोजी हाॅटेल हयात रिजन्सी, नवी दिल्ली (Hyatt Regency New Delhi) येथे देशभरातील निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.      " लिजण्ड आॅफ इंडिया" बहुमानाबद्दल डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.                   मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था, साप्ताहिक न्यूज मसाला, लोकराजा दिवाळी विशेषांक परिवारातर्फे डॉक्टरांचे अभिनंदन व पुढील वाटचिलीस हार्दिक शुभेच्छा !

श्री राधिका फाऊंडेशने १००० बांबूचे झाडे लावत साजरा केला जागतिक पर्यावरण दिवस !

इमेज
श्री राधिका फाऊंडेशने १००० बांबूचे झाडे लावत साजरा केला जागतिक पर्यावरण दिवस ! 🌳 हरित नाशिक 🌳 🌳 सुंदर नाशिक 🌳      नासिक::- हरित नाशिक- सुंदर नाशिक संकल्पना राबविण्यासाठी ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत "आपली संवर्धन संस्था", "श्री राधिका फौडेशन बहुद्देशीय संस्था", व दैनिक गांवकरी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेचे आयोजन "देवराई" नाशिक येथे केले होते. या प्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रमात १००० बांबूची झाडे लावून सहभाग नोंदवत श्रमदान करीत, वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे आयोजन शेखर गायकवाड यांनी केले होते. यावेळी राधिका फाउंडेशन च्या सर्व सदस्यांनी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला होता असे चेतनाताई सेवक यांनी सांगितले.       वृक्षारोपणासाठी आलेल्यांना राधिका फौंडेशन कडून प्रमाणपत्र देण्यात आले. राधिका फौंडेशनच्या संस्थापिका चेतना ताई,  सदस्य सौ. गवांदे यांनी रक्तदान शिबीरात भाग घेऊन रक्तदान करीत सामाजिक भान जपले. अध्यक्षा कल्पना सोनार, सचिव जावेद शेख, अनिल नहार निकिता जोशी, संजय देशमुख, प्राची राव, अंतोष धात्रक, तनविर राजे, खुशब...

संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना डेटा सायन्स मध्ये प्रचंड संधी : डॉ. सर्जेराव पोवार !

इमेज
संख्याशास्त्राच्या  विद्यार्थ्यांना डेटा सायन्स मध्ये प्रचंड संधी : डॉ. सर्जेराव पोवार ! पी.व्ही.पी. महाविद्यालयात संख्याशास्त्राचे अतिथी व्याख्यान  कवठेमहांकाळ ( प्रतिनिधी)::- येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील बी.एस्सी. शाखेकडील अंतिम वर्षाच्या संख्याशास्त्र  विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच महाविद्यालयामध्ये अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिथी व्याख्याते म्हणून श्रीमती कस्तुरबा महाविद्यालय सांगली येथील संख्याशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. सर्जेराव पोवार उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना  डॉ. पोवार यांनी आय. टी. क्षेत्रातील डेटा सायन्स चे वाढते महत्व स्पष्ट करुन सोफ्टवेअर इंडस्ट्री मधील संख्याशास्त्राच्या उपयुक्ततेविषयी आणि नोकरीच्या संधींविषयी विस्तृत माहिती दिली. त्यांनी संख्याशास्त्रामधील विविध क्षेत्रातील रोजगारांच्या  संधी सांगताना सरकारी तसेच खासगी क्षेत्रांमध्ये संख्याशास्त्रामधील पदवी तसेच पदव्युत्तर पदवी धारकांना प्रचंड मागणी असल्याचे स्पष्ट केले. व्याख्यानानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या विविध शंका प्र...

जिल्हास्तरीय भव्य भित्तीचित्रे स्पर्धेचे आयोजन !

इमेज
    जिल्हास्तरीय भव्य भित्तीचित्रे स्पर्धेचे आयोजन !           नासिक::-पर्यावरण जनजागृती व संवर्धन करण्यासाठी प्रबोधन व्हावे यादृष्टीने विद्या सहयोग सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य भित्तीचित्र स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेच्या घोषणापत्राचे अनावरण शिवराज्याभिषेक सोहळा व जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने आज दि.०६ जून रोजी शिवारांयांचे पूजन करून शिवस्मारक आडगाव या ठिकाणी अनावरण करण्यात आले. पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीबाबत लहानांपासून मोठ्यांपर्यंत जनजागृती करणे व होणाऱ्या दुष्परिणामांना वाचा फोडण्यासाठी भित्तिचित्र स्पर्धेच्या माध्यमातून हा एक आगळा वेगळा उपक्रम नाशिक जिल्हा स्तरावर राबवण्यात येत आहे. १५ जून २०२२ पर्यंत सर्व स्पर्धकांनी आप आपले चित्र तयार करून "श्रीसाई कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट", आडगाव. ४२२००३ या ठिकाणी पोस्टाद्वारे किंवा स्वतः आणून द्यावयाचे आहे. या स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आलेले आहेत. दोन्ही गटाला सारखेच बक्षीस देण्यात येणार आहे. पहिला गट - शालेय गट (पाचवी ते दहावी )  दुसरा गट- खुल...

जागतिक पर्यावरणदिनी मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्या वतीने वाडीव-हे पोलिस ठाणे प्रांगणात वृक्षारोपण !

इमेज
जागतिक पर्यावरणदिनी वाडीव-हे पोलिस स्टेशन प्रांगणात वृक्षारोपण !      नासिक (वाडीव-हे) ::- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्या वतीने वाडीव-हे पोलिस स्टेशनच्या प्रांगणात विविध औषधि वनस्पती असलेल्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.      मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून आणि वाडीव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाडीव-हे पोलिस स्टेशन आवारात औषधि वनस्पतीची रोपण केले. आणि ग्लोबल वार्मिंग च्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करावी जेणेकरून भविष्यात ग्लोबल वार्मिंगची दाहकता कमी होईल.त्यासाठी प्रत्येकाने एक झाड़ लावून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटिल, उपाध्यक्ष सुभाष सबनीस, संस्थेचे खजिंनदार नरेंद्र सूर्यवंशी, सचिव प्रकाश उखाडे, विश्वस्त जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, संजय देवधर, राजीव शहा, हिरामण शिंदे, वाडीव-हे पोलिस स्टेशनचे प्रवीण काकड़, नीलेश मराठे, प्रवी...

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी वारली चित्रशैली ! आदिवासी औद्योगिक क्लस्टर व्हावे लवकरच कार्यान्वित... !!

इमेज
पर्यावरण संवर्धनाचा संदेश  देणारी वारली चित्रशैली !           आज ५ जून, जागतिक पर्यावरण दिन आहे. आदिवासी वारली चित्रशैली पर्यावरणाशी समतोल साधते. निसर्गाच्या लयतत्त्वाशी इमान  राखते. आकारांच्या सुलभीकरणामुळे ती जगभरात लोकप्रिय ठरली आहे. या वारली चित्रसृष्टीने सह्याद्रीचा पायथा समृद्ध केला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात एकरूप झालेल्या आदिवासींच्या जीवनशैलीत पर्यावरण जतन, रक्षण आणि संवर्धन समाविष्ट आहेच. सभोवतालच्या निसर्ग - जीवसृष्टीसोबत परस्परांना पूरक असे एकात्मिक जीवन ते जगतात. त्याचा कोणताही गाजावाजा न करता ते पर्यावरण दिन दररोजच आपल्या कृतीतून साजरा करीत असतात. वारली कलाकार पर्यावरण रक्षण, संवर्धनाचा कलेद्वारे संदेश देतात.         बारा कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात एक कोटींपेक्षा अधिक आदिवासी बांधव आहेत. त्यांच्या चालीरीती, संस्कृतीला राज्याच्या सांस्कृतिक नकाशावर महत्त्वाचे स्थान आहे. आधुनिक काळात निसर्गाचा तोल सांभाळून आदिवासी समाज कलाक्षेत्रात लक्षणीय योगदान देतो आहे. आदिवासी वारली चित्र रेखाटनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात ...

एकल वापरातले प्लास्टीक (एसयूपी) बंद करण्यासाठी केंद्राचे राज्यांना पत्र,,,,,, गृहनिर्माण आणि शहरी व्‍यवहार मंत्रालयाच्‍यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त "स्वच्छ आणि हरित" मोहीम सुरू !

इमेज
एकल वापरातले प्लास्टीक (एसयूपी) बंद करण्यासाठी केंद्राचे राज्यांना पत्र,,,,,,             गृहनिर्माण आणि शहरी व्‍यवहार मंत्रालयाच्‍यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त "स्वच्छ आणि हरित" मोहीम सुरू             ५ जून, या - जागतिक पर्यावरण दिनी – राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्‍यावतीने देशभरामध्‍ये "स्वच्छ आणि हरित" मोहीम सुरू करण्‍यात येणार आहे.  देशाला एकल वापराच्या प्लास्टिक (एसयूपी) मुक्त करण्यासाठी, तसेच पर्यावरण सुधारण्यास हातभार लावण्यासाठी  हे आंदोलन सुरू करण्‍यात  येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  २९ मे २०२२ रोजी ‘मन की बात’ मधून देशवासियांबरोबर संवाद साधताना ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागरिकांना एकत्र येऊन स्वच्छता आणि वृक्ष लागवडीसाठी काही प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.             जागतिक पर्यावरण दिन आणि ३० जून २०२२ पर्यंत एकल वापराच्‍या प्लास्टिकवर बंदी घालण्याची भारताची वचनबद्धता लक्षात घेवून , गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रा...