१७ जूनला कसा असेल "अॅसिड व्हिक्टीम" "आठवा रंग प्रेमाचा" !
१७ जूनला कसा असेल "अॅसिड व्हिक्टीम" "आठवा रंग प्रेमाचा" चित्रपटातील रिंकूचा वेगळा लूक बघायला मिळणार ! - १७ जूनला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला काळ कितीही आधुनिक झाला, तरी स्त्रियांवरील अत्याचार हा सामाजिक प्रश्न आजही कायम आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचा प्रश्नाबरोबरच एका प्रेमकहाणीवर आधारित 'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. १७ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरूनं अॅसिड व्हिक्टिमची भूमिका करत पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअप केला आहे. अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी "आठवा रंग प्रेमाचा" या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव, राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद समीर कर्णिक यांचे असून यांनी "क्युं हो गया ना.." या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर "यमला प...