पायोनिअर हार्ट हॉंस्पिटलला ‘सीजीएचएस’ मान्यता
पायोनिअर हार्ट हॉंस्पिटलला ‘सीजीएचएस’ मान्यता ! नाशिक (प्रतिनिधी) : येथील पायोनिअर हार्ट हॉस्पिटलला सेंटर गव्हर्नमेंट हेल्थ स्किम (सीजीएचएस)ची मान्यता मिळाली आहे. हॉस्पिटलला सीजीएचएसची मान्यता मिळाल्यामुळे आता केंद्र सरकारच्या सेवेत सध्या कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्त कर्मचार्यांचे मोफत उपचार पायोनिअर हार्ट हॉस्पिटलमध्ये होणार आहेत. पायोनिअर हार्ट हॉस्पिटल नाशिकमधील अग्रगण्य असून गेल्या ३ वर्षांपासून हृदयरोगावरील उत्कृष्ट सेवा देणारे हॉस्पिटल म्हणून नावलौकिक मिळवला आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णास इमर्जन्सी उपचार, एन्जीओप्लास्टी तसेच बायपास(सिएबीजी)शस्त्रक्रिया येथे यशस्वीपणे केल्या जातात. डॉ. सुरेश सूर्यवंशी या हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभागाचे प्रमुख असून हृदययावरील उपचाराचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. डॉ. ललित लवणकर हे उत्तर महराष्ट्रातील एकमेव बालहृदयरोग तज्ज्ञ आहेत. नवजात शिशू मधील हृदयरोगावरील विविध उपचार करण्यात ते निपुण आहेत. हॉस्पिटलमधील अवघ्या ९५० ग्रॅम वजनाच्या बाळाची यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांनी या गोंडस शिशूला नवजीवन दिले आहे. बाळांच...