पोस्ट्स

राधिका फाउंडेशन आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या विद्यमाने आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा निकाल जाहीर !

इमेज
राधिका फाउंडेशन आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या विद्यमाने आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा निकाल जाहीर !        नासिक(प्रतिनिधी)::- राधिका फाउंडेशन आणि महावीर इंटरनॅशनल त्यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली, त्याचा निकाल काल १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता झूम बैठकीत ठेवण्यात आला होता. शाकद्वीपय महिला मंडळ च्या उपाध्यक्षा बबिता शर्मा यांनी विजेत्यांची निवड केली. त्यावेळी चेतना सेवक यांनी राधिका फाउंडेशन ची विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी अनिल नहार, सुधीर शर्मा उपस्थित होते. १८ ते ३५ आणि ३६ ते ५५ या दोन गटात ही स्पर्धा  ठेवण्यात आली होती. स्पर्धेचे गट नंबर १ च्या विजेत्या प्रथम जयश्री चौधरी, द्वितीय सायली बागमार, तृतीय निकिता जोशी तर गट नंबर २ च्या विजेत्या प्रथम धनश्री उत्पात, द्वितीय साधना जैन, तृतीय सुवर्णा वाडेकर ठरल्या. सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद

सेन्सेक्स अाजही हिरवा

इमेज
सेन्सेक्स अाजही हिरवा मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : १० मार्च रोजी सलग तिसऱ्या दिवशी बाजार उच्च पातळीवर बंद झाला. सर्व क्षेत्रांतील खरेदीमुळे मदत झाली. पाच राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू झाल्यामुळे आणि युक्रेन-रशिया चर्चेतील सकारात्मक निकालाच्या आशेवर, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात वाढ झाली. ही खरेदी मोठ्या प्रमाणावर व्यापक आधारावर होती, केवळ धातू क्षेत्रावर दबाव होता. एचयूएल, टाटा स्टील, ग्रासिम इंडस्ट्रीज, जेएसडब्लू स्टील आणि एसबीआय हे निफ्टी वाढवणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये होते. दुसरीकडे, कोल इंडिया, टेक महिंद्रा, डॉ. रेड्डीज लॅब्स, ओएनजीसी आणि टीसीएस यांची सर्वाधिक घसरण झाली. ऑटो, मेटल, एफएमसीजी, पॉवर, कॅपिटल गुड्स, पीएसयू बँक आणि रिअल्टी निर्देशांकांमध्ये १-२ टक्क्यांची भर पडली. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. निफ्टी १६,५०० च्या वर; तर ऑटो, मेटल, एफएमसीजी, पॉवर, कॅपिटल गुड्स, पीएसयू बँक आणि रिअल्टी यांच्या नेतृत्वाखाली सेन्सेक्सने ८०० अंकांनी जोरदार उसळी घेत...

सुखदा शेवाळे हिंस नॅशनल स्टार पर्सनॅलिटी अॅवार्ड !

इमेज
सुखदा शेवाळे हिंस नॅशनल स्टार पर्सनॅलिटी अॅवार्ड ! रत्नागिरी(प्रतिनिधी)::- येथे जय मल्हार सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नाशिक मधील गायिका सुखदा शेवाळेला नॅशनल स्टार पर्सनॅलिटी अवॉर्ड गौरविण्यात आले. काल झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री व झिटिव्ही फेम किशोरी आंबीये हिच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास बी.एन.खरात, आखाडे सर, सुप्रसिद्ध गायिका व निवेदिका रेखा महाजन, आदी मान्यवर व पुरस्कारर्थी मोठया संख्येने उपस्थित होते.           पुरस्कार प्राप्त झाल्याने सुखदाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या महिलांना ‘प्रबोधन’ तर्फे शिष्यवृत्ती !

इमेज
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या महिलांना ‘प्रबोधन’ तर्फे शिष्यवृत्ती ! महिला दिनानिमित्त अभियान : महिलांच्या पंखांना मिळणार बळ ! नाशिक(प्रतिनिधी)::- महिलांना प्रशासनात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. एमपीएससी, यूपीएससी, बँक भरती, सरळसेवा भरती परीक्षा सारख्या स्पर्धा परिक्षांच्या माध्यमांतून अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये महिला तसेच विद्यार्थीनी आपले करिअर घडवू शकतात. मात्र योग्य मार्गदर्शन अन् बिकट आर्थिक परिस्थितीमुळे गुणवत्ता असून सुद्धा अनेक महिला, विद्यार्थीनी करिअरपासून वंचित राहतात. अशा महिला तसेच विद्यार्थीनींना प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत ‘रेडिओ एमपीएससी गुरु’ च्या वतीने १०० टक्के शिष्यवृत्ती योजना अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अभियानाबाबत सांगताना सुनील पाटील म्हणाले की, ‘महिला दिनाचे औचित्य साधून या अभियानास प्रारंभ करण्यात येणार असून, या अभियानाअंतर्गत एमपीएससी, युपीएससी या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, विषयांचा अभ्यास कसा करावा, परीक्षांच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत अभ्...

सुर्यवंशी यांची मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड !

इमेज
राजेंद्र नामदेवराव (नाना ) सुर्यवंशी यांची देवळा मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! कसमादे परीसरांतील देवळा तालुका जाहीर होण्यापूर्वीच कळवण, सटाणा, मालेगाव या व्यापारी (मर्चंट) बॅकांनी आपले बस्तान बसविले असताना देवळा मर्चंट बॅंकेपुढे मोठं आव्हान होतं. यावर मात करत देवळा मर्चंट बॅंकेची वाटचाल अल्पावधीतच लोकप्रिय व सर्वसमावेशक विकास या ध्येयाने सुरू आहे. राजेंद्र सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड बॅंकेच्या उज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास सभासदांकडून व्यक्त होत आहे.

न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील यांचा सन्मान !

इमेज
न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील यांचा सन्मान !       नासिक::- साप्ताहिक न्यूज मसालाच्या ११ व्या व www.newsmasala.in या न्यूज पोर्टल च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त प्रजापिता ब्रम्हकुमारी नासिक च्या प्रभुप्रसाद केंद्रात आज झालेल्या कार्यक्रमात वासंती दिदि यांच्या हस्ते शुभेच्छा व प्रभूप्रसाद स्विकारताना संपादक नरेंद्र पाटील.        यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (आयएएस), सकाळ माध्यम चे तनिष्क चे संपादक विजय इंगळे, नासिक परीसरचे संपादक दिलीप बोरसे,  स्वराज्य फाउंडेशन च्या अध्यक्षा ममता छाजेड, मिस इंडिया शिल्पी अवस्थी, मिसेस इंडिया कुंदा शिंदे, पुनम दिदि, पुष्पा दिदि, सोनवणे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

आज आपले आभार मानण्याचा दिवस !! अकरा वर्षे प्रगतीची, विकासाची !

इमेज
अकरा वर्षे प्रगतीची, विकासाची !    सन २०१२ मध्ये न्यूज मसाला या साप्ताहिकाला प्रारंभ झाला. काही उद्दिष्टे व पथ्ये ठरवून, नेटाने पाळून वाटचाल करण्यात आली. गेल्यावर्षी दशकपूर्ती साजरी करून आता अकरा वर्षे पूर्ण करतांना राजकीय उलथापालथ, सामाजिक स्थित्यंतरांचा अनुभव आपण घेतला. जागतिक महामारी कोरोना सारख्या संकटाला तोंड देत आपली सर्वांची वाटचाल कधी सुखाचे क्षण तर कधी दु:खाचे चटके देत, आयुष्यातील जगण्याचे निकष बदलून गेली हे नमूद करताना मनाच्या संमिश्र भावनांचा सर्वसामान्यांसोबत परामर्श घेत आलो. एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस हा त्याच्या आयुष्यातील आनंदाचा ठेवा असतो.  सिंहावलोकन करण्याचा क्षण असतो. त्याचबरोबरीने जीवनात काय कमावले ? काय गमावले याचा ताळमेळ जमवण्याचाही प्रयत्न केला जातो. पुढील संकल्प देखील केले जातात. त्याचवेळी आयुष्यातील एक वर्ष संपल्याची हुरहूर देखील असते. यंदा ६ तारखेला आपला वर्धापनदिन साजरा करतांना वाचकांशी हितगूज करतांना विशेष समाधान आहे ते सर्वांच्या आशीर्वादाचे, सहकार्याचे आणि आपुलकीच्या स्नेहसुगंध दरवळत रहाण्याचे !    संस्था असो वा वृत्तपत्र ! वर्धा...

मगनलाल बागमार यांना फुलोरा साहित्यरत्न पुरस्कार प्रदान !

इमेज
मगनलाल बागमार  'दृष्टिकोन' फुलोरा साहित्य रत्नाने सन्मानित ! नाशिक(प्रतिनिधी)::- नाशिकचे जेष्ठ कवी, साहित्यिक, नाशिक मर्चंट बँकेचे माजी सरव्यवस्थापक मगनलाल बागमार यांच्या दृष्टिकोन या चारोळी काव्य संग्रहाला फुलोरा साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.          संगमनेर येथील फुलोरा कलेचे माहेरघर या संस्थेच्या वतीने, मराठी राजभाषा दिन आणि कवी कुसूमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन सत्यशीव हॉल, संगमनेर येथे १२ वे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी नाशिकचे  साहित्यीक  मगनलाल बागमार यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.            हास्य पंचमीकार  बंडा जोशी, साहित्यीक भगवान जोशी आणि प्राचार्य सौ. आशालता काळे यांच्या हस्ते 'दृष्टीकोन’ या चारोळी संग्रहासाठी बागमार यांना फुलोरा साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी आयोजित काव्य संमेलनात त्यांनी त्यांची स्वरचित कविता ‘लेक’ सादर केली. रसीकांनी त्यांच्या कवितेला भरभरून दाद दिली. या कार्यक्रमा...

"महाराष्ट्र स्वाभिमान गौरव" पुरस्कारांचं वितरण ! खास. अरविंद सावंत, अभिनेत्री दिपाली सय्यद, पत्रकार अनिल थत्ते,चारूशिला देशमुख, कामगार नेते अभिजित राणे,या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, ७३८७३३३८०१ "महाराष्ट्र स्वाभिमान गौरव" पुरस्कारांचं वितरण मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : 'जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ' आयोजित मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्कार वितरण सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात पार पडला. माजी केंद्रीय मंत्री खासदार कामगार नेते अरविंद सावंत, अभिनेत्री दिपाली सय्यद, गगनभेदी पत्रकार अनिल थत्ते, राष्ट्रसंत गाडगे महाराज आश्रम शाळेच्या संचालिका चारूशिला देशमुख, कामगार नेते संपादक अभिजित राणे, होप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण निचत, जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव तसेच मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून खास निमंत्रितांचं कवी संमेलन आयोजित करण्यात अाले होते. मकरंद वांगणेकर, श्रद्धा पौडवाल, रिया पवार,  विलास खानोलकर आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी सहज सुंदर कविता सादर करून मराठी भाषेप्रती आपली सेवा दिली आणि उपस्थितांची दाद मिळवली.       ...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सचिन बेंडभर यांचा विशेष सन्मान करुन गौरविण्यात आले !

इमेज
"मराठी भाषा गौरव दिनानिमित्त युवा लेखक सचिन बेंडभर यांचा सन्मान ! पुणे,२८,प्रतिनिधी::- पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूर आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने साई गार्डन मंगल कार्यालय येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुणे जिल्हा मनसेचे उपाध्यक्ष, महिबूब सय्यद यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप होते. यावेळी शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, जनहित कक्ष मनसेचे अध्यक्ष रवी लेंडे, विधी कक्ष मनसेचे तालुका अध्यक्ष ॲड. आदित्य मैड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.               पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांचे मराठी साहित्यात विपूल लेखन आहे. आजपर्यंत त्यांची ४८ पुस्तके प्रकाशित आहेत. यात बालसाहित्य, कथासंग्रह, कवितासंग्रह कादंबरी आणि अनुवाद असे त्यांचे विविधांगी लेखन आहे.           बेंडभर...