प्राजक्ता चौधरी ठरल्या 'नारी तू नारायणी रत्न' पुरस्कार विजेत्या ! साहित्यिक पत्रकारांचा विशेष सन्मान !!
प्राजक्ता चौधरी ठरल्या 'नारी तू नारायणी रत्न' पुरस्कार विजेत्या साहित्यिक पत्रकारांचा विशेष सन्मान मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : 'नारी तू नारायणी’ पर्व दोनच्या निमित्ताने सौंदर्यवतींचा शोध घेणारा शानदार सोहळा ठाणे यथील समारंभ लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. हेमा भट यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या शो टॉपर ठरल्या डॉ. सुमाया रेश्मा तर फॅशन विश्वातील कल्पक आणि प्रयोगशीलतेसाठी लौकिक असलेल्या धनश्री शेंड्ये यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली. 'नारी तू नारायणी’ रत्न प्राजक्ता चौधरी यांना प्रदान करण्यात आले तर, लाझरीन, विणू पाठक, प्रिया दर्शनी कलाल, सुमिता दहाड उपविजेत्या ठरल्या. फॅशनबीझ आणि फिरोझ लेबलच्या माध्यमातून फॅशनविश्वात कल्पक आणि प्रयोगशील म्हणून ओळख असलेल्या तसेच भारतीय आणि पाश्चात्य शैलीच्या वस्त्रनिर्मितीत कार्यरत असलेल्या धनश्री शेंड्ये यांची उत्तम नृत्यांगना आणि कलावंत म्हणूनदेखील ओळख आहे. कार्यक्रमाच्या विशेष निमंत्रित म्हणून त्यांनी यावेळी स्पर्धकांच्या कौशल्य...