मुख्याध्यापकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
नंदुरबार जिल्ह्यातील माध्य. शाळांतील मुख्याध्यापकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ! नंदुरबार :- मुख्याध्यापकांना शैक्षणिक कामकाज करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.मुख्याध्यापकांचे प्रशासकीय कामकाज सुलभ होण्यासाठी, नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर प्रथमतः माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी "शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिका सन २०२१-२२" ची निर्मिती करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांचे संक्षिप्त कार्यभार, वर्षभराचे नियोजन, शाळा पातळीवरील विविध समित्या व त्यांचे कामकाज,शालेय अभिलेख, इयत्ता निहाय तासिका वाटप नियोजन, इ.५ वी ते इ.१० वी वर्गांचे मूल्यमापन तक्ते, रजेचे प्रकार, मुख्याध्यापकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके अशा विविधांगी विषयांचे एकत्रित संकलन करून नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, नंदुरबार यांच्या संयोजनाद्वारे श्री.आप्पासो.आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता. जि.नंदुरबार विद्यालयाचे मुख्याध्...