पोस्ट्स

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा...     जवळपास सारे जग  वेठीस धरणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे, यंदा मार्च महिन्यात नाशिकला होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ९ महिने लांबणीवर पडले. आता ते ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणार आहे. भुजबळ नॉलेज सिटीच्या परिसरात होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ व विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर आहेत. यापूर्वी नाशिकला १९४२ साली ऑक्टोबर महिन्यात २७ वे व २००५ साली जानेवारी महिन्यात ७८ वे  अशी दोन संमेलने झाली होती. नाशिकला समृद्ध अशी साहित्यिक, सांस्कृतिक परंपरा आहे. नाशिक ही मंत्रभूमी, देवभूमी, धर्मभूमी, कर्मभूमी, स्वातंत्र्य चळवळीतील शौर्यभूमी, साहित्य क्षेत्रातील सारस्वतांची भूमी, मोक्षभूमी तसेच आधुनिक काळातील तंत्रभूमी म्हणून ओळखली जाते. नाशिक हे जनस्थान म्हणजे साधकांसाठी सिद्धस्थान आहे. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही तपोभूमी आहे. येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो; तशीच सारस्वतांची मांदियाळी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस जमणार आहे.   नाशिकला साहित्य, संस्कृतीची दीर्घ व समृद्...

नव्या पिढ्यांमध्ये कलापरंपरा  रुजवणारे संपत ठाणकर !  लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नव्या पिढ्यांमध्ये कलापरंपरा  रुजवणारे संपत ठाणकर  (उत्तरार्ध)   अभ्यासू आदिवासी वारली चित्रकार संपत ठाणकर सातत्याने कलेच्या  प्रसारासाठी प्रयत्नशील आहेत. स्वतः चित्रे रेखाटण्याबरोबरच जमातीतील इतर प्रज्ञावंत कलावंत, लेखक, कवी यांचा ते शोध घेतात. त्यांना प्रोत्साहन देण्याचेही काम करतात. हाडाचे शिक्षक असल्याने स्वस्थ न बसता नोकरीव्यतिरिक्त त्यांनी असंख्य आदिवासी मुलांना वारली चित्रकला शिकवली आहे. त्यातील अनेकजण पारंगत होऊन कलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करीत आहेत. कुडाच्या भिंतीवरची ही कला जगभरात पोहोचली. मात्र वारल्यांच्या नव्या पिढ्यांनी आपली परंपरा, संस्कृती विसरु नये ही संपत यांची तळमळ आहे. त्यासाठी वारली चित्रकलेवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या तिन्ही भागात तपशीलवार, सचित्र मार्गदर्शन केले आहे.    'वारली चित्रकला' या पुस्तकाच्या पहिल्या भागात ही कला ठिपके, रेषा व सोप्या-मूलभूत आकारांवर आधारित आहे हे संपत यांनी सोदाहरण सांगितले आहे. रेखाटनाचा सराव कसा करावा हे देखील ते सांगतात. त्रिकोण, वर्तुळ व चौकोन या प्राथमिक भौगोलिक आकारांचा वापर करून मानवी आ...

त्र्यंबकनगरीत २२ नोव्हेंबरपासून रंगणार राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा ! पिंच्याक सिलॅट खेळाविषयी थोडक्यात जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
त्र्यंबकनगरीत २२ नोव्हेंबरपासून रंगणार राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा !           नाशिक : महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन आयोजित ११ व्या राज्यस्तरीय पिंक्याच सिलॅट स्पर्धा २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान त्र्यंबकेश्‍वर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती इंडियन पिंच्याक फेडरेशनचे अध्यक्ष तथा महा. पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे महासचिव किशोर येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.           त्र्यंबकेश्‍वर येथील ओम जगद्गुरू जनार्दन स्वामी, मौनगिरी महाराज आश्रमात होणाऱ्या पिंच्याक सिलॅट स्पर्धा सर्व वयोगटातील महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी खुल्या आहेत. स्पर्धेत राज्यभरातील ३४ जिल्ह्यातील सुमारे ७०० खेळाडू यामध्ये सहभागी होणार असून पहिल्या दिवशी (दि.२२) १० ते १४ वयोगटातील २३० खेळाडू खेळणार आहेत. मंगळवार (दि.२३) १४ ते १७  वयोगटातील २४० तर तिसऱ्या दिवशी (दि.२४) १७ ते ४५ वयोगटातील २३० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती येवले यांनी दिली. स्पर्धेचे उद्घाटन दुपारी दोन वाजता खासदार हेमंत गोडसे, किशोर येवले...

१५ नोव्हेंबर महाराष्ट्राचे ख्यातनाम संख्याशास्त्रज्ञ, संख्याशास्त्राचे प्रसारक, डॉ.वसंत शंकर हुजुरबाजार यांचा स्मृतिदिन ! प्रा. कोष्टी यांनी घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
                                                                     . १ ५ (नोव्हेंबर )  महाराष्ट्राचे ख्यातनाम संख्याशास्त्रज्ञ ,  संख्याशास्त्राचे   प्रसार क ,  डॉ . वसंत शंकर  हुजुरबाजार  यांचा स्मृतिदिन. मूळ गणिताचे विद्यार्थी असलेल्या  हुजुरबाजार   यांनी  संख्याशास्त्रा मध्ये संशोधन करून संभाव्यता सिद्धांतामध्ये मौलिक योगदान दिले.  संभाव्यता सिद्धान्तातील अलौकिक कामगिरी साठी अ‍ॅडम्स पारितोषिक (१९६०) ,  पद्माभूषण पुरस्कार (१९७४) ,  सर जेफ्रीज यांनी एका निष्पत्तीला दिलेले  ‘ हुजुरबाजारांचा अपरिवर्तनीय घटक (इनव्हेरिअंट) ’  हे नाव (१९७६) ,  इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटतर्फे गौरवग्रंथ (१९७९) अशा अनेक सन्मानांनी गौरविलेल्या हुजुरबाजार यांचे संख्याशास्त्रातील योगदान निश्चीतच स्फू...

लोकप्रिय व्यंगचित्रकार अनंत दराडे यांचे निधन ! साप्ताहिक न्यूज मसाला व लोकराजा दिवाळी विशेषांक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली !!

इमेज
लोकप्रिय व्यंगचित्रकार अनंत दराडे यांचे निधन ! नाशिक ( प्रतिनिधी ) लोकप्रिय व्यंगचित्रकार अनंत दराडे यांचे काल ( दि.१३) अल्प आजाराने निधन झाले. ते विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक होते. सातत्याने व्यंगचित्रे रेखाटून त्यांनी रसिकांची मने जिंकली होती. व्यंगचित्रांच्या माध्यमातून ते सातत्याने समाजप्रबोधन करीत. राजकीय व्यंगचित्रांद्वारे हसवता हसवता त्यांनी वाचकांना नेहमीच अंतर्मुख केले. मृत्यूसमयी ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच वृध्द आईवडील, एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. त्यांचे स्नेही व्यंगचित्रकार अवि जाधव यांनी अनंत दराडे यांचे कॅरिकेचर रेखाटून अर्पण केलेली ही श्रद्धांजली.

बालदिन- बालकांना ज्ञानदानाबरोबर वारली चित्रशैली ची पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या संपत यांची कला हीच संपत्ती !! लेखाचा पूर्वार्ध सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कला हीच संपत यांची संपत्ती !            ( पूर्वार्ध )   "वारली चित्रकला हा आम्हा आदिवासींच्या जीवनमूल्यांचा गाभा आहे. आदिवासींचे लोकजीवन व कलासंस्कृती वेगळ्या करता येणार नाहीत. वारली चित्रशैली सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. 'वरलाट' या प्रदेशात राहणारे म्हणून 'वारली' हे नाव आमच्या जमातीला मिळाले. मी आमच्या संस्कृतीला, परंपरेला, वारली चित्रकलेला संपत्ती मानतो", असे उद्गार आहेत आदिवासी कलाकार संपत ठाणकर यांचे. ते सातत्याने ध्यासपूर्वक लेखन, चित्रांकनातून साहित्यसेवा करतात.आज (दि.१४) बालदिन आहे. संपत यांनी बालकांना ज्ञानदान केलेच त्याचबरोबरीने वारली चित्रशैली त्यांच्यात रुजवण्यासाठी पुस्तके लिहिली.             तलासरीच्या ज्ञानमाता सदन शाळेतील शिक्षक संपत देवजी ठाणकर अलीकडेच सेवानिवृत्त झाले. ते डहाणू तालुक्यातील जीतगाव येथे रहातात. अभ्यासू वृत्तीच्या संपत यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. २००८ साली त्यांचे वारली चित्रकलेवरील पहिले पुस्तक प्रकाशित झाले. त...

संशोधक वृत्तीचा कलासंस्कृती रक्षक मधुकर वाडू संशोधक कलावंत; अभ्यासू साहित्यिक. यशोगाथेचा परीपाठ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!   (उत्तरार्ध)

इमेज
संशोधक वृत्तीचा कलासंस्कृती रक्षक                       (उत्तरार्ध)          आदिवासी वारली जमातीच्या लग्नचौकात साखळीसारखे आकार रेखाटले जातात. तशाच स्वरुपाचे रेखाटन फ्रान्समधील एका पुरातन गुहेत दगडावर कोरलेले आढळले. या 'मेगालिथिक' संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी  महाराष्ट्रातील मनोरजवळच्या कोंढाण येथील मधुकर वाडू फ्रान्सला गेले. तेथील मानव्यविद्येवर संशोधन करणाऱ्या सुप्रसिद्ध 'ब्रिटनी' या संस्थेने त्यांना निमंत्रित केले होते. संशोधक वृत्तीच्या कलासंस्कृती रक्षक मधुकर यांनी आदानप्रदान करून फ्रेंच व वारली कलेतील साम्यस्थळांवर प्रकाश टाकला.          फ्रान्स दौऱ्यात त्यांना तेथील अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्याने देण्यासाठी निमंत्रण मिळाले. तेथे मधुकर वाडू यांनी भारतीय संस्कृतीसह आदिवासी वारली कलासंस्कृती समजावून दिली. तेथील माध्यमिक शाळांमध्ये भेटी देऊन वारली कलेचा प्रसार - प्रचारही केला. तेव्हाचे अनुभव सांगताना मधुकर म्हणतात, "परदेशातील छोट्या व...

पुढच्या पिढीला "वैभवशाली" इतिहास सांगताना,,,,,,,,. काॅग्रेस कमिटी कार्यालय !!

इमेज
    नासिक::- शहर व जिल्ह्यातील राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी एकेकाळी सतत गजबजलेले,  एमजी रोडवरील काॅंग्रेस भवनाची आजची विदारक परिस्थिती. कार्यालय बंद, बाकावर कुणीतरी वामकुक्षी घेत आहे, युवक काँग्रेस चा फलक, गवताने पेव्हर ब्लाॅकमधून आपले अस्तित्व दाखवून देण्याचा केलेला प्रयत्न शहर व जिल्हा कमिटीलाच संदेश देत असावा. पक्षाच्या झेंड्याखाली येत याच भवनातून मंत्रीपद, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्यत्व मिळाले, त्याच मातृसंस्थेची दुरावस्था बघताना कुणालाही दखल घ्यावीशी वाटू नये ही खेदजनक बाब म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. शहरातील महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी असलेले भवन ! राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाची अशी अवस्था बघून सर्वसामान्यांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर कोण देईल ? याच भवनातून मिळालेल्या जहागिरीला आता जागण्याची वेळ आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाचे हायटेक कार्यालये, सत्तेत आल्यावर शिवसेनेच्या ही कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले आणि वर्षानुवर्षे जिल्ह्याच्या राजकारणा...

कागदावरच निर्बंध शिथिल, जाच मात्र कायम केशव डिंगोरे : जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन उठवणार आवाज ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
कागदावरच निर्बंध शिथिल, जाच मात्र कायम केशव डिंगोरे : जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन उठवणार आवाज !      नाशिक : शासनाने निर्बंध शिथिल केल्याचे सांगितले जाते, मात्र हे निर्बंध कागदावरच शिथिल असून, मंडप डेकोेरेटर्स व या व्यवसायाशी निगडीत इतरांना जाच कायम आहे. त्यामुळे शासनाच्या या धोरणाविरोधात असोसिएशनच्या व्यासपीठावरून आवाज उठविला जाणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. असोसिएशनच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केशव डिंगोरे म्हणाले की, ‘गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मंडप डेकोरेशन, बॅण्डपथक, लॉन्स धारक व या व्यवसायाशी निगडीत इतर लोकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता शासनाने निर्बंध शिथिल केल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र निर्बंध अजून कायम आहेत. लॉन्सधारकांना अजूनही स्थानिक प्रशासनाचा जाच आहे. अधिकाऱ्यांच्या श्रेयवादाच्या लढाईत आमचे मरण होत आहे. पालकमंत्र्यांना भेटल्यास अधिकारी दुखावले जात आहेत. तर पालकमंत्री आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटण्य...

अंतराचा अक्षरोच्चार म्हणजे कविता – संतोष हुदलीकर सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
अंतराचा अक्षरोच्चार म्हणजे कविता – संतोष हुदलीकर        नाशिक दि. - कवितेमध्ये तांत्रिकता महत्वाची नसते आणि तसा हट्टही नसावा. कारण तंत्रशुद्ध कविताच कविता असतात आणि इतर कविता या कविता नसतात का? असा मुलभूत प्रश्न निर्माण होतो. कवितेमध्ये भावगर्भता असावी, रचनेमध्ये सुलभता असावी. कवीने अथवा लेखकाने सातत्याने लिहित जावे. कवीला हुकमी लिहिता यायलाच हवे याबरोबरच कवितेमध्ये उत्स्फूर्तता असावी, शब्द लालित्य असावे. असे प्रतिपादन कवी संतोष हुदलीकर यांनी केले ते नाशिक कवीच्या काव्यकोजागरी निमित्ताने आयोजित  कवी, कविता आणि काव्यसंस्था या विषयावर बोलत होते. यावेळी नाशिक कवीचे कार्यवाह सुभाष सबनीस यांनी कवी आणि काव्यसंस्था याविषयी बोलतांना कवीने एखाद्या कवितेत अडकून पडू नये तसेच नवोदितांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांशी आपली नाळ तुटू देवू नये असे सांगितले. प्रमुख पाहुणे आर्किटेक्ट कवी प्रवीण पगार म्हणाले मी कवी असल्याचा मला अभिमान आहे असाच अभिमान प्रत्येक कवीने आपल्या मनी बाळगला पाहिजे. कार्यक्रमाचे आणि  ‘नाशिक कवी’ चे अध्यक्ष इंजी.बाळासाहेब मगर यांनी आपल्याला काह...