शिलापूर रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाचे खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते भूमिपुजन. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
शिलापूर रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाचे खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते भूमिपुजन माडसांगवी वार्ताहर : शिलापूर येथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग व्हावा या खा. हेमंत गोडसे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. काही महिन्यांपूर्वीच रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या शिलापूर येथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाचे आज रविवारी सकाळी खा. गोडसे यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले. गेल्या चाळीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने शिलापूर, विंचूर गवळी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. या भुयारी मार्गाचे काम येत्या चार महिन्यात पूर्ण होणार असून या भुयारी मार्गामुळे शिलापूर, विंचूर गवळी या दोन मोठ्या गावांचा थेट संपर्क होणार आहे. या भुयारी मार्गामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आपला शेतीमालाची वाहतूक करणे अगदीच सहज सोपे होणार आहे. शिलापूर परिसरातून मध्य रेल्वेचा लोहमार्ग जात असल्याने शिलापूर आणि विंचूर गवळी या दोन मोठ्या गावांचा थेट संपर्क होत नव्हता. येथील नागरिकांना औरंगाबाद रोड महामार्ग आणि शिलापूर येथे जाण्यासाठी माडसांगवी किंवा आडगाव मार्गे जावे लागत अस...