क्रांती कांबळेला विद्यापीठ स्तरीय सुवर्णपदक जाहीर ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
क्रांती कांबळेला सुवर्णपदक जाहीर ------------------------------------------------- उस्मानाबाद (२९)::- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्याशाखेत विद्यापीठ स्तरावर दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकासाठी उस्मानाबाद येथील क्रांती पंडित कांबळे ही पात्र ठरल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. क्रांती कांबळे ही विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय( वनामकृवि) लातूर येथून बीएससी ऍग्री बायोटेक्नॉलॉजी( कृषी जैवतंत्रज्ञान) शाखेतून उत्तीर्ण झाली आहे. ती चारही वर्षे महाविद्यालयातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे .एकूण गुण( सीजीपीए) ८. ९४ घेऊन ती प्रथम श्रेणी विशेष प्रावीण्यासह विद्यापीठातून प्रथम आली आहे. तिला सुवर्णपदक (सुवर्ण मुलामित ) व गुणवत्ता प्रमाणपत्र २३ व्या दीक्षांत समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. असे विद्यापीठाचे कुलगुरू यांनी कळविले आहे. क्रां...