,,,,,,,,,,,,२९ भावंडांचा जीव धोक्यात ?,,,,,,,,,,,,,,,. हॅशटॅग चिपको चळवळ महाराष्ट्रासह पोहचली गोव्यात !! मी बोलू, बघू, ऐकू शकत नसलो तरीही तुमच्यासारख्याच भावना मलाही आहेत !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!
न्यूज मसाला सर्विसेस नासिक 7387333801 ********************************** माझा आवाज झाली आहे 'हॅशटॅग चिपको' चळवळ ! मी बोलू ,बघू ,ऐकू शकत नाही. तरीही मला तुमच्या सारख्याच भावना आहेत.मी वर्षानुवर्षे ताठपणे उभा राहून अनेक पावसाळे अनुभवले आहेत. भूमाता माझे लालनपालन करते तर वरुणदेवाच्या आशीर्वादाने मी बहरतो. फुले, फळे देतो. स्वतः कार्बन डायऑक्साईड घेऊन हवेत प्राणवायू सोडतो. अनेक पक्षी माझ्या अंगाखांद्यावर खेळतात, रात्री विसावतात पण तुमच्यासारखी माणसे मात्र माझ्या मुळावर उठतात ! आताच नाशिकमधील माझ्या २९ भावंडांचा जीव धोक्यात आल्याने काही संवेदनशील पर्यावरणप्रेमी त्यांच्या बचावासाठी तातडीने धावून गेले. त्यातून 'हॅशटॅग चिपको' ही चळवळ जन्माला आली. बघता बघता ती राज्यात सर्वत्र पसरली व थेट गोव्यापर्यंत जाऊन पोहोचली. ही चळवळ आता माझे डोळे, कान आणि मुख्य म्हणजे आवाज बनली आहे.त्यामुळेच हा मनमोकळा संवाद... उत्तुंग झेप फाउंडेशनचे संस्थापक तसंच सामाजिक कार्यकर्ते रोहन देशपांडे व सहकाऱ्यांनी हॅशटॅग चिपको,नाशिक ही चळवळ तळमळीने उभी केली. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुंदरला