वारली चित्रशैलीवर विश्वविक्रमांची मोहोर ! कलागुरूच्या स्मृतींना दोन विश्वविक्रम अर्पण !! विश्वविक्रमच्या अमी छेडा यांच्या हस्ते संजय देवधर यांचा प्रमाणपत्रासह सन्मान !! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!
वारली चित्रशैलीवर विश्वविक्रमांची मोहोर कलागुरु पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्या स्मृतीला मी दोन विश्वविक्रम अर्पण केले. या निमित्ताने आयोजित केलेल्या वारली चित्रस्पर्धेतील सर्वाधिक सहभागाची 'वंडरबुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल'मध्ये नोंद झाली. यावेळी वारली चित्रांच्या माध्यमातून सामाजिक जागृती करण्यात आली. त्याची दखलही 'जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने घेतली व एकाच उपक्रमात माझे दोन विश्वविक्रम साध्य झाले. नाशिकमधील आर.पी.विद्यालयात झालेल्या या सोहळ्याला लायन्स क्लब ऑफ कॉर्पोरेट, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर, पंचवटी एज्युकेशन सोसायटी आणि जैन सोशल ग्रुप यांचे प्रायोजकत्व व सहकार्य लाभले. त्यामुळेच आदिवासी वारली चित्रशैलीवर विश्वविक्रमांची मोहोर उमटली. वारली चित्रशैलीद्वारे गुरुवर्य पद्मश्री जिव्या सोमा मशे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी भव्य 'ऑन द स्पॉट वारली चित्रस्पर्धे'चे आयोजन केले. २२ ऑगस्ट २०१८ रोजी पंचवटीतील आर.पी. विद्यालयात सकाळपासून सायंकाळपर्यंत ही स्पर्धा रंगली.सुरुवातीला साधारणपणे १ हजार स्पर्धक सहभागी होतील असे ठरविण्...