१ मे १९२३ ला पहिल्या कामगार दिनाचे आयोजन सिंगरवेल्लू चेत्तीअर यांनी मद्रास इथे केले, लालबावटा ही निशाणी होती. लेखक अंकुश शिंगाडे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
कामगार दिन की राजकारण आज १ मे जागतिक कामगार दिन. देशात नाही तर जगात मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. महाराष्ट्रात तर याचा संबंध महाराष्ट्र दिनाशी जोडून १मे १९६० ला महाराष्ट्र दिवशी राज्याची निर्मीती करण्यात आली. नव्हे तर कामगार दिनाला महाराष्ट्र दिनाचं नवं नाव देवून नवीन राजकारण निर्माण करण्यात आलं. १मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. का साजरा करण्यात येतो. त्याही पाठीमागे कारणं आहे. जागतिक दर्जाचे इग्लंड, डच, पोर्तुगीज या देशांनी उद्योगाचे महत्व लक्षात घेवून आपआपल्या देशात उद्योग उभारणी केली. याचं मुळ कारण तेथील ज्ञानाचा प्रसार व संशोधन. अठराव्या शतकात या युरोपीयन लोकांनी नवनवे शोध लावले. त्या शोधाच्या आधारानं वस्तूंचं उत्पादन जास्त झालं. शिवाय जागतिक बाजारपेठेत ह्या वस्तू विक्रमी स्वरुपात झाल्यानं तो पैसा गुंतविण्यासाठी त्यांना वेगळ्या बाजारपेठा शोधणे भाग होते. त्यातच या देशांनी आपला पैसा उद्योगाच्या रुपात पैसा दुस-या देशात गुंतवला. जे अविकसित देश होते. यात कारण होतं, पैसा जास्तीत जास...