सामाजिक न्यायासाठी शासन व प्रशासन कटिबध्द- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे. चर्चेअंती लेखणी बंद आंदोलन मागे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
सामाजिक न्यायासाठी शासन व प्रशासन कटिबध्द- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ----------------------------------- सामाजिक न्यायासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. मंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २८ जानेवारी २१ रोजी समाज कल्याण कर्मचारी संघटना गट क, महाराष्ट्र राज्य पुणे यांची बैठक झाली. सदर बैठकीत प्रधान सचिव शाम तागडे व डॉ प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण म. रा. पुणे हे उपस्थित होते. यावेळी कर्मचारी संघटनेच्या विविध प्रश्नांबाबत आढावा घेत असताना मुंडे यांनी सांगितले की, संघटनेच्या रास्त मागण्यासांठी सामाजिक न्याय विभाग हा संघटनेच्या पाठिशी आहे, परंतू कामाच्या कार्यक्षमतेबाबत (work accountability) कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सामाजिक न्याय विभागामध्ये शिस्तप्रिय पध्दतीने चाललेले कामकाज कौतुकास्पद असून सदर कामाकाजाच्या अनुषंगाने प्रत्येक कर्मचा-याने स्वत:ची कौशल्य व कार्यक्षमता वाढवून प्रत्येक नागरिक व लाभार्थ्याला न्याय देणे आवश्यक आहे. रिक्त पद, कामाचा बोजा हा सर्वच विभागांमध्ये आहे त्यामुळे ज्यावेळेस पद...