पंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी ग्रामपंचायतींना रुपये ६५ कोटी वितरीत – बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद. निधी तत्काळ ग्रामपंचायत स्तरावर वितरीत करून जनहिताचे कामे विहित मुदतीत करणार- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नासिक. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
पंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी ग्रामपंचायतींना रुपये ६५ कोटी वितरीत – बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक नाशिक (नरेंद्र पाटील)::- जिल्हा परिषदेस पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत निधी प्राप्त झाालेला आाहे. प्राप्त निधीतुन ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना तर जिल्हा परिषद १० टक्के व पंचायत समित्यांना १० टक्के निधी वितरीत करण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून पहिल्या हप्त्यापोटी रुपये ८२ कोटी ४ लाख ३७ हजार रुपये प्राप्त झालेले आहेत. नाशिक जिल्हयातील १३८५ ग्रामपंचायतींना शासन निर्देशानुसार रुपये ६५ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची असणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे कृती आराखड्यातील मंजुर असलेली विकास कामे सुरु करण्यास विलंब होत होता. नाशिक जिल्ह्यात माहे मार्च २०२० पासुन...