पोस्ट्स

पाणदेव "अर्जुनांचा" वारसदार विकास कामांचे राज-नीतिकार "नितिन" पवार ! जी.पी.खैरनारांच्या लेखनीतून न्यूज मसालाचा खास रिपोर्ट !! न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील यांनी नितीन पवारांचा सत्कार केला त्याप्रसंगी चर्चेदरम्यान "मतदारसंघाबाबत वडीलांचा वारसा पुढे चालवत राहणार" !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
पाणदेव "अर्जुनांचा" वारसदार विकास कामांचे राज-नीतिकार "नितिन" पवार ! ******************************        नाशिक::- जिल्ह्यातील आदिवासींचे नेते म्हणुन ज्यांनी साठ वर्षे राजकारण केले असे स्वर्गीय ए. टी. पवार साहेब यांचे वारसदार म्हणुन कळवण - सुरगाणा विधानसभा मतदार संघातून आमदार नितीन पवार निवडुन आले आहेत.            नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पन्नास टक्के आदिवासी बहुल क्षेत्र असे आहे. कळवण, सुरगाणा, पेठ, इगतपुरी, त्रिंबकेश्वर, दिंडोरी हे तालुके पुर्णतः आदिवासी बहुल व डोंगराळ, दुर्गम - अतिदुर्गम अशी भौगोलिक स्थिती. बागलाण, देवळा, नाशिक हे तालुके अंशतः आदिवासी क्षेत्र अशी भौगोलिक स्थिती नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागाची आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजातील जनतेस मुलभूत  आरोग्य सुविधा, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणे हा दूर दृष्टिकोन स्वर्गवासी अर्जुन तुळशीराम पवार साहेब तथा ए. टी. पवार साहेब यांनी ठेवला होता. हा दूर दृष्टिकोन ठेऊनच कळवण तालुक्यातील सर्व आदिवासी जनतेच्या जिरायती क्षेत्र हे बा...

हिटलरच्या पंख छाटलेल्या कोंबडी सारखी अवस्था करून घेऊ नका !!! मतदान करूया-सशक्त महाराष्ट्राला ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!;

इमेज
चला मतदानाला चला;मतदान करा जरा समजून         "एकवीस  तारीख " , सर्वांना मतदान टाकण्याचे वेध लागले  आहेत. सर्वच पक्षांनी आपल्याला समजावून सांगितले आहे की मी काय केले आणि काय करणार  आहे. कोणी सांगितले की मी काय करणार  आहे. सर्वच आश्वासनं......विश्वास तरी कोणावर  ठेवायचा. आज पंधरा दिवसात लोकांनी पाहिलं की सारेच राजकीय पक्ष आपल्या दाराशी  आले. कच-यावर  बसले. त्यांना घाण वाटली नाही,आपणही त्यांना चांगले  वाटलो. कितीही वाईट असलो  तरी. आपल्याला लुभावण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपल्याला गरळ घातली.        आपल्याला राज्याचा विकास करायचा  आहे. त्याचबरोबर आपलाही. केवळ राज्याचा विकास करुन चालणार नाही तर आपलेही हितसंबंध सरकारने जोपासले पाहिजे यासाठी आपल्याला मतदान  करायचे. जर राज्याचा विकास होत असेल, पण आपला जर जीव जात असेल तर ते राज्य त्या हिटलरच्या कोंबडीसारखे होईल जी कोंबडी हिटलरने पाळली  होती. एका कोंबड...

आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा चंग बांधला आहे का ? अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ! जिल्हा हिवताप अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महेंद्र बबनराव देवळीकर, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय नाशिक, यांना १५,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना अटक नासिक::- यातील तक्रारदार यांचे सन-१९८६ ते १९९२ या कालावधीमधील एक वेतनवाढ कमी दिली गेल्याचे तक्रारदार यांचे सेवानिवृत्तीचे वेळी सन २०१३ मध्ये झालेल्या वेतन पडताळणीमध्ये निर्देशन वेतन फरकाचे बील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय नाशिक येथे मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांनी सादर केले होते. सदर बील मंजुर करण्यासाठी आलोसे महेद्र बबनराव देवळीकर, जिल्हा हिवताप अधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडे २०,०००/-रू.लाचेची मागणी केल्याने, तक्रारदार यानी आज दि.१६/१०/२०१९ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिल्यामुळे सदर तक्रारीची ला.प्र.वि.नाशिक पथकाने सापळापुर्व पडताळणी केली असता पड़नाळणी दरम्यान आलोसे महेंद्र बबनराव देवळीकर यांनी तकारदार यांचेकडे २०,०००/-रू लाचेची मागणी करत त्यापैकी पहिला हप्ता म्हणून १५,०००/-रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम जिल्हा हिंवताप अधिकारी कार्यालय नाशिक येथे स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

कसं काय पाटील बरं हाय का ? पितृपक्ष संपला, आता कोण कुणाचे "कारणं" खाऊन "राज" करणार ! फड रंगतोय नासिकचा, आज कोलांटउड्या खाणारे कालचे खरे निष्ठावंत ! सविस्तर एक-दोन रिश्टर स्केल चे धक्के अर्थात किरकोळ भूकंपांबद्दल वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
कसं काय पाटील बरं हाय का ! निवडणुकीच्या  काळात  उमेदवारांच्या कोलांटउड्या या आता जनतेला नवीन राहिलेल्या नाहीत. पक्षनिष्ठा आणि भाऊंचे  नेतृत्व भाऊंना आणि कार्यकर्त्यांना कुठे घेऊन जाईन याबाबत अनेक चर्चा निवडणुकीच्या काळात झडत असतात. विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या राजकीय पटलावरही अनेक भुकंप, इच्छूकांच्या कोलांटउड्या, कार्यक़र्त्यांशी सल्लामसलत  आणि सुरु झाल्या आहेत याचा परिणाम आपल्याला दिसेलच. उमेदवारी अर्ज दाखल करायला आज आणि उद्या अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे आता या दोन दिवसांत काय उलथापालक्ष घडते ते बघणे रंजक ठरणार आहे. मनाला न पटणार्‍या आणि स्वप्नातील देखील विचार करता येणार नाही अशा खबरी निवडणुक काळात इच्छुकांच्या आणि विद्यमानांच्या बाबतीत येऊ लागल्याने काय सांगतो भाऊ ! खरंच की काय...? अशा शब्दांत चर्चा कार्यकर्त्यांमध्ये घडतांना दिसत आहे. नाशिकचा विचार करता मध्य, पूर्व,पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या मध्य आणि पश्चिमची उमदेवारी भाजपाकडून जाहीर झाल्याने येथील अनेक इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. त्यामुळे त्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरल्याचे वृत्त...

एक पाऊल निरोगी आयुष्याच्या दिशेने महाराष्ट्र शासन - डॉ. अनुप कुमार यादव. कार्यशाळेच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नाशिक विभागीय आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यशाळा व बैठक संपन्न        दिनांक १ऑक्टोबर २०१९ रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथील सभागृहात सार्वजनिक आरोग्य नाशिक विभागा तर्फे विभागीय आरोग्यवर्धिनी केंद्र कामकाज कार्यशाळा व आढावा बैठक घेण्यात आली, सदर कार्यशाळा व आढावा बैठकीसाठी डॉ.अनुप कुमार यादव, आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक रा.आ.अभियान, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तसेच या बैठकीसाठी डॉ.अर्चना पाटील अति. संचालक आरोग्य सेवा. डॉ सतीश पवार अतिरिक्त अभियान संचालक रा.ना.आ.अभियान, डॉ. विजय कंदेवाड सहसंचालक (तं), डॉ.रत्ना रावखंडे, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ,नाशिक, आदी मान्यवर उपस्थित होते, तसेच कार्यशाळेला पाच जिल्ह्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी  मनपा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण व नागरी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यवर्धिनी केंद्राचे समुदाय वैद्यकीय अधिकारी या कार्यशाळेस उपस्थित होते.            कार्यशाळेचे उ...

औषध निर्माण अधिकारी संघटनेचा अनोखा फार्मसी दिवस उत्साहात साजरा ! आयोजकांतर्फे मनोरंजन गूरु यांच्या मनोरंजनाची खास मेजवानी !! जीपींकडून आलेल्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
औषध निर्माण अधिकारी संघटनेचा अनोखा फार्मसी दिवस उत्साहात साजरा !            नाशिक जिल्हा शासकीय औषध निर्माण अधिकारी संघटनेने शासकीय रुग्णालयीन औषध निर्माण अधिकारी यांचेसाठी हॉटेल साधना, गंगापूर रोड नाशिक येथे मनोरंजन गुरु यांचा अनोखा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.या कार्यक्रमात  उपस्थित औषध निर्माण अधिकारी बंधु भगिनी यांचे दैनंदिन कामा व्यतिरिक्त एक मनोरंजनात्मक कार्यक्रम घडवुन सर्वांना तीन ते चार तास मनोरंजन व हास्य विनोदात तल्लीन करुन टाकले होते. महिलांच्या व पुरुष अधिकारी यांच्या विविध खेळांतून मनोरंजन केले जात होते. कार्यक्रमाच्या मध्यानात विविध हिंदी गाण्यांवर नाचण्याचा ठेका धरुन उपस्थित औषध निर्माण अधिकारी बंधु भगिनी यांनी मनमुराद आनंद साजरा केला. विविध जुन्या गाण्यावर नाचण्याचा ठेका उपस्थित औषध निर्माण अधिकारी यांनी धरल्यावर मनोरंजन गुरु हेही सर्व उपस्थित यांचे बरोबर गाण्याच्या तालावर नाचत होते.               उपस्थित औषध निर्माण अधिकाऱ्यांमध्ये से...

  प्लॅटून वन फिल्म्स निर्मित मराठी चित्रपट पिकासो चा फर्स्ट लूक लाँच! दशावताराची कथा आणि व्यथा प्रथमच रूपेरी पडद्यावर !! न्यूज मसालाच्या रसिकांसाठी पिकासो बाबतचे महेश भट्ट यांचे ट्वीट !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
      'प्लॅटून वन फिल्म्स'निर्मित मराठी चित्रपट'पिकासो'चा फर्स्ट लूक लाँच! ·                 पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दशावताराची कथा आणि व्यथा! ·                 अभिनेता प्रसाद ओक यांचा विलक्षण भावमुद्राभिनय! ·                 ' पिकासो '   चे फर्स्ट लूक पोस्टर  जेष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केले ट्विट! मुंबई, २३ सप्टेंबर २०१९: 'बुटीक फिल्म स्टुडिओ' आणि 'प्लॅटून वन फिल्म्स' यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण होणाऱ्या'पिकासो' या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक आज खास प्रेक्षकांसाठी आज प्रदर्शित करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसाद ओक यांच्या दशावतारातील मोहक छबीचा फर्स्ट लुक पाहून प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची शिगेला पोहचली असून चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी विशेष...

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत चिमुकल्यांनी सादर केले पथनाट्य !मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी यांनी चिमुकल्यांचे कौतुक करून बक्षीसे दिली ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
    स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत चिमुकल्यांनी सादर केले पथनाट्य ! मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी यांनी चिमुकल्यांचे कौतुक करून बक्षीसे दिली !        नाशिक  – केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्हयात  स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत असून यानिमित्ताने विविध जनजागृतीपर उपक्रमांव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. आज देवळा तालुकयातील जिल्हा परिषदेच्या खालप फाटा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद आवारात पथनाटयाचे सादरीकरण केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सर्व चिमुकल्यांचे कौतूक करुन जिल्हयातील सर्व शाळांमध्ये अशाप्रकारचे उपक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले. केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्हयात  स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत असून जिल्हयातील ग्रामपंचायतींमध्ये याबाबत विशेष ग्रामसभा घेवून या मोहिमेचा शुभारंभ तसेच प्लास्टिक बंदीबाबत ठराव करण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत प्ल...

न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकाला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ! दिवाळी विशेषांक प्रकाशक अनेक संकटांचा सामना करीत लेखक कवी यांच्या सृजनशील शब्दांना समाजापर्यंत पोहचवितात - अॅड. बाळासाहेब तोरस्कर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
लोकराजा दिवाळी विशेषांकाला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान !     पुणे (२२)::- न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकाला नक्षत्रांचं देणं काव्यमंच, पुणे, या संस्थेकडून मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे जेष्ठ लेखक, समिक्षक अॅड बाळासाहेब तोरस्कर प्रसिद्ध कवी विलास शिंदे, यशस्वी उद्योजक अतुलशेठ परदेशी, वसई येथील सुप्रसिध्द डॉ, पल्लवी बनसोडे, रेखा रोशनी मुंबई, संस्थेचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे आदिंच्या उपस्थितीत अंकुशराव लांडगे सभागृहात येथे सोहळा संपन्न झाला.         पुणे येथील नक्षत्राचं देणं काव्यमंच ही संस्था गेली वीस वर्षे लेखक कवी यांना एक वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. लेखक कवी यांना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी दिवाळी अंक प्रकाशक मोठ्या कष्टाने व आर्थिक संकटातून प्रयत्नशील असतात त्यांचा सत्कार करणे व त्यांना सामाजिक पाठबळ मिळावे या हेतूने तेरा वर्षांपासून राज्यभरातील दिवाळी विशेषांकातून दरवर्षी तीन उत्कृष्ट अंकांना  गौरविण्यात येत आहे, या वर्षी न...

जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून अज्ञात आरोपीकडून बनावट धनादेशाद्वारे दोन कोटी ष्याऐशी लाख गायब ! ऐतिहासिक भास्कर वाघ प्रकरणाला उजाळा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून अज्ञात आरोपीकडून बनावट धनादेशाद्वारे दोन कोटी ष्याऐशी लाख गायब !                       जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून आजही अशी अफरातफर होते व प्रशासनाला उशिराने जाग येते, काही वर्षांपूर्वी धुळे जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून कोट्यावधी रुपयांची अफरातफर केली गेली होती, सदर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती, "भास्कर वाघ" हे नाव न राहता एक वाक्प्रचार रूढ झाला होता, आजही आहे. फरक इतकाच आहे की तेव्हा धनादेशावर शून्य वाढविला जात असे आता सरळ धनादेश व त्यावरील स्वाक्षऱ्याच बनावट करून तब्बल दोन कोटी ष्याऐशी लाख रुपये गडचिरोली जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे युनियन बँक खात्यातून काढून नेल्याची घटना घडली आहे. मात्र मुळ धनादेश आजही जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडे असताना बनावट धनादेश आरोपीने बनवलाच कसा, त्याला सदर माहिती कशी मिळाली, कव्हरींग नोट व सह्यांचा नमुना कसा प्राप्त झाला असे प्रश्र्न उपस्थित होत आहेत.    ...