औषध निर्माण अधिकारी संघटनेचा अनोखा फार्मसी दिवस उत्साहात साजरा ! आयोजकांतर्फे मनोरंजन गूरु यांच्या मनोरंजनाची खास मेजवानी !! जीपींकडून आलेल्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
औषध निर्माण अधिकारी संघटनेचा अनोखा फार्मसी दिवस उत्साहात साजरा ! नाशिक जिल्हा शासकीय औषध निर्माण अधिकारी संघटनेने शासकीय रुग्णालयीन औषध निर्माण अधिकारी यांचेसाठी हॉटेल साधना, गंगापूर रोड नाशिक येथे मनोरंजन गुरु यांचा अनोखा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.या कार्यक्रमात उपस्थित औषध निर्माण अधिकारी बंधु भगिनी यांचे दैनंदिन कामा व्यतिरिक्त एक मनोरंजनात्मक कार्यक्रम घडवुन सर्वांना तीन ते चार तास मनोरंजन व हास्य विनोदात तल्लीन करुन टाकले होते. महिलांच्या व पुरुष अधिकारी यांच्या विविध खेळांतून मनोरंजन केले जात होते. कार्यक्रमाच्या मध्यानात विविध हिंदी गाण्यांवर नाचण्याचा ठेका धरुन उपस्थित औषध निर्माण अधिकारी बंधु भगिनी यांनी मनमुराद आनंद साजरा केला. विविध जुन्या गाण्यावर नाचण्याचा ठेका उपस्थित औषध निर्माण अधिकारी यांनी धरल्यावर मनोरंजन गुरु हेही सर्व उपस्थित यांचे बरोबर गाण्याच्या तालावर नाचत होते. उपस्थित औषध निर्माण अधिकाऱ्यांमध्ये से...