सांगली पूरग्रस्त गावांची छावा क्रांतीवीर सेनेकडून पाहणी ! संभाजीराजेंकडून करण गायकर व छावा क्रांतीवीर संघटनेचे कौतुक !! भीषणता-मुख्य रस्त्यापासून २५० मीटर वाहून जातो कंटेनर !!! नाईलाज-फेकून दिले पाण्यात भिजून सडलेले धान्य !!! शक्यता-आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार !!!! मदत-प्रशासनाच्या जोडीला स्वच्छतादूत व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे यायला हवे !!!!! बघायला हवेत छायाचित्र- न्यूज मसालाच्या नजरेतून, संपादक नरेंद्र पाटील, नासिक !!!!! छायाचित्र बघण्यासाठी व सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!!!
सांगली::- छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी काल सांगली जिल्ह्यातील आठ-दहा गावातील नागरिकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्या समस्या समजून घेत आणखी काय मदत करता येईल हे समजून घेत तशी कार्यवाही करण्यात येईल असा विश्वास पूरग्रस्त भागातील लोकांना दिला. गायकरांसोबत या दौऱ्यात मी, (नरेंद्र पाटील संपादक-न्यूज मसाला, नासिक ) माझ्या नजरेतून पूरग्रस्त भागातील जे चित्र पाहीले ते मन पिळवटून टाकणारे आहे, याचा छायाचित्र रूपाने आपल्याला बोध होईलच. छावा क्रांतीवीर सेनेच्या कार्यकर्त्यांनी दि. १३ आॅगस्ट रोजी चर्चा केली व तत्काळ निर्णय घेउन दि. १४ आॅगस्ट रोजी रात्री कोल्हापूर-सांगलीकडे मदतीचा ट्रक रवाना केला.असा २४ तासात झटपट निर्णय घेऊन योग्य ती मदत कोल्हापूर येथील सैनिक हाॅल मध्ये पोहोचविला याबाबत स्वता खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी आपल्या शब्दांनी गायकर व छावा संघटनेचे कौतुक केले. सांगली जिल्ह्यातील जुनी धामणी, सांगली शहर...