पोस्ट्स

रेडीमिक्स ची गुलाबी हवा ८ फेब्रुवारी पासून !!! एका दिवसात ३.५ लाखांहून अधिक लोकांची पसंती !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

इमेज
‘रेडीमिक्स’ची गुलाबी हवा ८ फेब्रुवारी पासून! एका दिवसात ट्रेलरला ३.५ लाखांहून अधिक लोकांची पसंती!! प्रेमाचं जाळ विणण्यासाठी ‘हिवाळा’ म्हणजे प्रेमवीरांसाठी समृद्धीचा काळ’ आणि त्यात सोनेपे सुहागा म्हणजे फेब्रुवारी मधला व्हेलेंटाईन डे! प्रेमाची कोरी पाटी असलेल्या प्रेमवीरांच्या यशकिर्तीचे नवनवे सोपान गाठण्याचा सुवर्णदिन. हे औचित्य साधून या वर्षी खास युथसाठी प्रस्तुतकर्ते अमेय विनोद खोपकर, निर्माते प्रशांत घैसास, सुनिल वसंत भोसले, ख्यातनाम लेखक शेखर ढवळीकर आणि दिग्दर्शक जालिंदर कुंभार‘रेडीमिक्स’चं वेड लावणार आहेत. आणि हे सरप्राईज म्हणजे लव्हरबॉय वैभव तत्ववादी, गुलाबी क्वीन प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांचा ट्रिपल ‘रेडीमिक्स’ धमाका. तरुणाईला झिंग लावणारी प्रार्थना आणि वैभव तत्ववादीच्या जोडीला नेहा जोशीची बिनधास्त अदाकारी व्हेलेंटाईन डेच्या एक आठवडा आधीपासूनच म्हणजे ८ फेब्रुवारी पासून सर्वांना एन्जॉय करता येणार आहे.            काही जण खूप विचार करून कृती करतात, पण विचार कुठे थांबवायचा आणि कृत...

शिलापूर येथील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब च्या भूमिपूजन समारंभास आलेल्या उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीत एकलहरा प्रकल्प होण्याचे मिळाले आश्र्वासन !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक औष्णिक विद्युत प्रकल्प येथे मंजूर असलेल्या  ६६० मेगावॅटच्या विद्युत प्रकल्पाचे काम सुरु करा- समीर भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ यांची ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी एकलहरा प्रकल्प होणार   ऊर्जा मंत्री बावनकुळे यांचे शिलापूर  सिपीआआय कार्यक्रमात आश्वासन. नाशिक, दि.३० जानेवारी :- नाशिक औष्णिक विद्युत प्रकल्प येथे मंजूर असलेल्या ६६० मेगावॅटच्या विद्युत प्रकल्पाचे काम सुरु करण्यात यावे अशी मागणी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याचे उर्जा नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शिलापूर येथील भूमिपूजन कार्यक्रमात केली. आज इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबच्या भूमिपूजन करण्यासाठी नाशिक दौऱ्यावर असलेल्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत पत्र दिले. यावेळी प्रकल्प होणार असे आश्वासन उर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले.        समीर भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक औष्णिक विद्युत केंद्रासाठी एकलहरे, ता. जि. नाशिक येथे ४७२ हेक्टर जागा संपादीत करून १९७० च्या दशकात १४० म...

शिक्षण आयुक्तांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर १ व २ फेब्रुवारी ला बैठक बोलावली, शालार्थ आयडी हा प्रमुख विषय असल्याचे संकेत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
शालार्थ आयडी चे काम युद्धपातळीवर        शालार्थ आय .डी. चे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी व शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे  यांनी सांगीतले. शिक्षण आयुक्त यांनी १ व २ फेबुवारी २०१९ रोजी नाशिक, जळगांव , धुळे , नंदुरबार या शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे . त्यात इतरही विषयां वर चर्चा होणार असून शालर्थ आय .डी. हा विषय अग्रक्रमाने घेतला जाणार आहे .१५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत सर्व काम पुर्ण होइल असे संकेत आयुक्तालयाकडून मिळत असल्याने शिक्षकांचे प्रलंबित शालार्थ आयडी चा विषय पूर्ण होणार असा आशावाद शिक्षक संघटना नेत्यांना आहे. संघटनेचा पाठपुरावा सूरूच राहणार आहे मात्र शिक्षकांकडून सहकाऱ्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

हार न माणणाऱ्या पोलीस अधिकारी व जिद्दी पत्रकाराची सत्याचा शोध घेणारी निर्व्याज प्रेम व निखळ मैत्रीची कथा ! अलिदा !! चंदा तलवारेंचा सत्कार !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिकच्या प्रख्यात लेखिका चंद्रा रमेश तलवारे यांच्या अलिदा या इंग्रजी कादंबरीला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जयपूर लिटररी फेस्टिव्हलमध्ये प्रकाशनाचा मान मिळाला आहे.जयपूर बुकमार्क तर्फे अशा प्रकारचा सन्मान मिळणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या लेखिका आहेत त्यांचा नासिक मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.       जयपूर लिटररी फेस्टिव्हल  २४ ते २८ जानेवारी या कालावधीत होत असून चंदा तलवारे यांना विशेष निमंत्रित करून २६ जानेवारीला त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. आस्ट्रेलिया येथील मेलबर्न लिटरेचर हे या सोहऴ्याचे सहभागीदार आहेत.        हार न मानणाऱ्या पोलीस अधिकारी व एका जिद्दी पत्रकाराची सत्याचा शोध घेणारी निर्व्याज प्रेम व निखळ मैत्रीची कथा आहे,  महोतत्सवात २०१८ मधील यशस्वी कथा म्हणून "अलिदा" ची आयोजकांच्या टीमवर्क आर्टतर्फे निवड करण्यात आली आहे. अँमेझानवर दोन आठवड्यातच विक्रीच्या टाँप फाईव्ह थाऊजंड मध्ये अलिदाने स्थान मिळविले आहे. संमेलनात २५० नावाजलेले वक्ते व लाखापेक्षा जास्त श्रोते यांची वर...

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाच्या भुजबळांविषयी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकाचा भुजबळ समर्थकाकडून जाहीर निषेध ! भाजपाच्या फुटकळ दलालांनी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये असे प्रत्युत्तर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
भाजपच्या फुटकळ दलालांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये-योगेश निसाळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तुषार जगतापांकडून छगन भुजबळ यांच्याविषयी केलेल्या पत्रकबाजीचा जाहिर निषेध                                                          नाशिक, दि.२२ जानेवारी :-स्वतःला मराठा समाजाचा नेता व मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक म्हणवणाऱ्या कथित आरोग्यदूत तुषार जगताप यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल प्रसिद्धी पत्रक काढून चुकीची माहिती पसविण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांचा बोलवता धनी वेगळा असल्याने कोणाच्या तरी सांगण्यावरून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी परिपत्रक काढून आरोप करण्याचा तुषार जगताप यांचा प्रयत्न असून मराठा समाज बांधव अशा पत्रकामुळे भुलणार नाही.भाजपच्या फुटकळ दलालांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू न...

मराठा द्वेषी भुजबळांना अनामत रक्कम वाचविण्याचे आव्हान !! मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाचे प्रसिद्धिपत्रक !! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
मराठा द्वेषी भुजबळांना अनामत रक्कम वाचविण्याचे आव्हान ! आरक्षणावर भुजबळ दुटप्पीःजगताप नाशिक/प्रतिनिधी सन २०१९ च्या लोकसभा विधानसभा निवडणूकीवर सामाजिक धुळवडीचा थेट परिणाम होणार असल्याचे थेट संकेत मिळू लागले असून विशेषतः मराठा आरक्षणाच्या मुद्यावर छगन भुजबळ यांची दुटप्पी भुमिका कळीचा मुद्दा ठरू शकते असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतलेल्या पविञ्यावरून दिसते. यासंदर्भात प्राप्त होत असलेल्या संकेतानुसार छगन भुजबळ यांचे मराठा आरक्षणासंदर्भात खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा आक्षेप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून घेतला जाऊ लागला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे एक समन्वयक तुषार जगताप यांनी एक प्रसिध्द करून छगन भुजबळ यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून त्यांच्यावर मराठा द्वेषी हा जुना आरोप पुन्हा लावला आहे.तुषार जगताप यांनी छगन भुजबळ यांच्यावर टिकास्ञ सोडतांना भुजबळांच्या वळचणीला असलेल्या मराठा बांधवांनाही सबुरीचा सल्ला दिला आहे. तुषार जगताप यांच्या मते भुजबळ परिवाराला मराठा समाजाने पदराखाली आश्रय दिल्यानेच ते राजकारणात आणि समाजकारणातही स्थिरावले.उपमुख्यमंञी झाले.आमदार...

सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज ! देशभरात सर्वात जास्त महाराष्ट्रात कचरा निर्माण होतो-प्रा.दिक्षित ! एचएएलचा सीएसआर निधी काही ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी मिळणार-डाँ.नरेश गिते !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नाशिक – स्वच्छ भारत अभियान राबविताना शौचालयाबरोबरच ‍सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज असून ग्रामीण भागात स्वच्छतेविषयक काम करताना यापुढे ‍सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनावर अधिक भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या ग्राम विकास आराखड्यातील निधीतून यासाठी खर्च करून स्वच्छ व सुंदर गाव तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने आज महिरावणी जवळील संदीप फाउंडेशन येथे गोदाकाठावरील ग्रामपंचायती व रूरबन प्रकल्पातील ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, उप अभियंता यांच्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेस आय.आय.टी. मुंबई येथील प्रा. इंद्र्कांत झा, प्रा. अनिल दीक्षित, प्रा. प्रशांत पाटील आदि उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ गिते यांनी सांडपाण्यामुळे गोदावरी नदी प्रदूषित होत असून ग्रामीण भागातील गोदाकाठावरील सर्व ग्रामपंचायतीमध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवून...

आज शिवजिजाऊ पुरस्कार वितरण ! खासदार उदयनराजे भोसले व नानासाहेब जावळे यांची प्रमुख उपस्थिती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

शिवजिजाऊ पुरस्कार व मराठामित्र सन्मान सोहळा!         नाशिक::---अखिल भारतीय छावा युवा संघटना यांच्यावतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व कोपर्डीच्या ताईसाठी लढणाऱ्या यु...

नासिकला रेल्वेच्या चाक निर्मिती व देखरेख कारखाण्याचे अनंत गिते व डाँ. सुभाष भामरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा साजरा ! खासदार हेमंत गोडसेंकडून वचनपूर्ती, ५३ कोटीच्या प्रस्तावास केंद्राच्या अर्थसंकल्पात मंजूरी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
           नासिक(१७)::--रेल्वेच्या व्हील निर्मिती (चाक निर्माण व देखरेख डेपो) कारखाना नाशिकमध्ये साकारण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार हेमंत गोडसे , तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व रेल्वेमंत्री पियुष गोयल, सचिव प्रविण गेडाम यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी केले.       रेल्वेच्या चाक निर्माण व देखरेख डेपोचे भूमिपूजन आज एकलहरे येथील कर्षण मशीन कारखाना येथे पार पडले. याप्रसंगी केंद्रीय अवजडउद्योग मंत्री अनंत गिते  बोलत होते. याप्रसंगी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे , खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.           यांवेळी अनंत गिते यांनी सांगीतले की, वर्षाला पाचशे रेल्वेचे चाके याठिकाणी बनणार आहेत. तसेच अनेक चाकांची दुरूस्ती व देखभाल होणार असल्याचेही ते म्हणाले. १९८१ मध्ये तत्कालिन रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी रेल्वे कर्षण म...

नासिकला रेल्वेच्या चाक निर्मिती व देखरेख कारखाण्याचे अनंत गिते व डाँ. सुभाष भामरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा साजरा ! खासदार हेमंत गोडसेंकडून वचनपूर्ती, ५३ कोटीच्या प्रस्तावास केंद्राच्या अर्थसंकल्पात मंजूरी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

                 नासिक::-रेल्वेच्या व्हील निर्मिती (चाक निर्माण व देखरेख डेपो) कारखाना नाशिकमध्ये साकारण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार हेमंत गोडसे , तत्कालीन रेल्...