रासपच्या विदर्भ कार्यकर्ता मेळाव्याला लक्षणीय उपस्थिती ! विरोधकांना दखल घेण्यास भाग पाडणारा यशस्वी मेळावा-आयोजक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नागपूर::-राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित विदर्भ कार्यकर्ता मेळावा नागपूर येथे मोठया थाटात संपन्न झाला या कार्यक्रमाला विदर्भातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, भाजपा नेते आमदार नरेंद्र पवार जिल्हा महामंत्री राजुभाऊ पा.तकर, रासप युवक आघडी अध्यक्ष राजे भाऊ फड, मुख्य महासचिव रासप बाळासाहेब दौडतले व रासपचे सर्व नेते मंडळी यांची ही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. मेळाव्यात पक्षाची पुढील वाटचाल याबाबत विचारमंथन करण्यात आले, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मेळाव्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरणासोबत विरोधकांनी दखल घेण्यास भाग पडावे असा हा मेळावा ठरल्याची चर्चा विदर्भ मराठवाड्यासहीत महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात होत आहे, या कार्यकर्ता मेळाव्या मध्ये शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अनेक गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी प्रा.सौ....