दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ] पाखी चित्रपटानंतर अभिनेता सुमित कांत कौलला लागले मराठी चित्रपट सृष्टीचे वेध! देव आनंद, प्राण यांसारख्या दिग्गज कलावंतांच्या चित्रपट सृष्टीतील पदार्पणासाठी कारणीभूत असणारे नामवंत निर्माते दिग्दर्शक यशवंत पेठकर यांचा नातू सुमित कांत कौल याचे लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण होणार आहे. आजोबांकडून मिळालेला वारसा व अभिनयाचे धडे गिरवत येत्या १० ऑगस्ट ला प्रदर्शित होणाऱ्या 'पाखी' या चित्रपटातून सुमित आपल्यासमोर येणार आहे. गेली पाच वर्षे नाटक, शॉर्ट फिल्म आणि वेब सिरीजमधून प्रियकर असो वा वृद्ध प्रत्येक भूमिका चोख पार पाडत, सुमित आता खलनायकाच्या नवीन भूमिकेत रुपेरी पडद्यावर आपणांस दिसून येणार आहे. सुमित कांत कौल याची घेतलेली खास मुलाखत : १० ऑगस्ट ला प्रदर्शित होणाऱ्या तुझ्या पहिल्यावहिल्या 'पाखी' या चित्रापटाबद्दल काय सांगशील? सुमित - " 'पाखी' हा लहान मुलांची तस्करी व बालविवाह या विषयांवर भाष्य करणारा सिनेमा आहे. आपल्या देशात दर आठ मिनिटांनी एखाद्या मुलाचे अपहरण होते तर, प्रत्येक एका तासात,एखाद्या बाळाचा अनैतिक व्...