माँ तुझे सलाम...... नाशिक (२२) :- 3 एप्रिल 2018 रोजी मातृभूमीचे रक्षण करतांना महाराष्ट्राचा सर्वात लहान तरूण, जवान शुभम मुस्तापुरे हा शहिद झाला. ही बातमी महाराष्ट्रात पसरताच अवघा महाराष्ट्र रडला होता. अवघ्या विसाव्या वर्षी मातृभूमीसाठी बलिदान देणा-या काळीमातीच्या वीरपुञाच्या मातापित्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पञकार महासंघ यांच्या वतीने नाशिक शहरातील गंजमाळ येथील रोटरी हाॅल येथे "माँ तुझे सलाम" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अवघ्या विसाव्या वर्षी बलिदान , भारत मातेचा पुञ देशासाठी कुर्बान,प्राणवाहुनी देशासाठी, देशासही अमर करे , वीर शहिद भारत सुपुत स्व.शुभम मुस्तापुरे... धन्य माता पिता ज्यांना पुञ असा लाभला, आणिक धन्य ताही जो देशार्थ वारला , प्राणवाहुनी देशासाठी, देशासही अमर करे , वीर शहिद भारत...