नरेंद्र पाटील संपादक-न्यूज मसाला,नासिक विडंबनात्मक लिखाण पद्धत धर्तीवर हा लेख असुन कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.-संपादक नासिक::-नासिकचे पोलीस आयक्त रविंद्रकुमार सिंघल आजच्या परिस्थितीत हरलेत असे म्हटल्यास हि नासिककरांच्या भविष्यात डोकावल्यास संयुक्तिक वाटणार नाही. साहेब आपण हरलात ही बाब आपणांस रूचणार नाही व तशी मान्यही करायला नको या मताचा मीही आहे, आपले बालपण दिल्लीत गेले, तेथेच इंजिनियरींगची पदवी प्राप्त केली, मास कम्युनिकेशन मधील पदविका, मानवाधिकार यांत पदव्युत्तर शिक्षण व डाँक्टरेट मिळविली, या इतक्या मोठ्या शिक्षणाच्या जोरावर राबवित असलेले उपक्रमांबाबत थोडा वेगळा विचार केल्यास, का करताहेत जनहितासाठी कार्य जे आज कुणाला कौतुकास्पद वाटणार नाही, आज रामनवमीचा दिवस , प्रभु रामचंद्रानाही वनवास भोगावा लागला व यांच कारणामुळे त्यांचे पदस्पर्श नासिकला लागले तीच हि पुण्यनगरी तेथे आपणही यांवे व अफलातून कार्य करावे, फरक इतकाच की आपण वनवास भोगायला आला नाहीत पण वर्षानुवर्षे समाजातील काही घटक वनवास भोगत होते त्यांना पावण करण्याच्या शक्तीचा (बुद्धी) वापर करित आहात ...