दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई होणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन ! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

पावसाने नाशिक महानगरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थे बाबत दोषी अधिकारी व संबंधीत कंत्राटदारांवर कारवाई व्हावी - मनसेचा आयुक्तांना इशारा. नाशिक : महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या पावसाने झालेल्या दुरावस्थेस दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई होणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. गत तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेने नाशिक महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून रस्त्यांच्या कामाच्या दर्ज्याबाबत समाजातील विविध स्तरांवरून अनेक तक्रारी येत आहेत. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते व तत्सम कामांसाठी असलेल्या व महानगरपालिकांसाठी बंधनकारक असलेल्या नियमावली प्रमाणे रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदारांनी ठराविक मुदती करीता (DLP) संबंधीत रस्त्यांची देखरेख ठेवणे बंधनकारक आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या व ठेकेदारांच्या संगनमतामुळे दरवर्षी पावसाळा संपल्यावर रस्ते दुरुस्तीच्या कामांची नव्याने निविदा काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या त...