लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !
नाशिक::- ततानी ता. बागलाण जि. नाशिक येथील शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक जितेंद्र खंडेराव सोनवणे यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत ताब्यात घेत असताना कार्यालयाच्या दुसऱ्या दरवाज्यातून पळून गेले.
तक्रारदार हे रोजंदारी शिक्षक असून त्यांचा घरघंटी असून धान्य दळून देण्याचं काम करतात. आश्रमशाळेला धान्य दळून दिल्याच्या कामाचे ८७८४०/- बॅंक खात्यावर जमा केल्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून ८०००/- रुपये व मार्च-२५, एप्रिल-२५ या महिन्याच्या दळण्याचे बिल मंजूर करून देण्यासाठी १३००/- रुपये अशी एकूण ९३००/- रुपये लाचेची मागणी करुन ८०००/- रुपये स्वीकारण्याची तयारी पंच नंबर १ यांचे उपस्थितीत केली. सदरची ८०००/- रुपये रक्कम यांनी त्यांचे कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली व लाचेची रक्कम मोजत असताना काहीतरी संशयाने त्यांनी लाचेची रक्कम टेबलवर ठेवून तक्रारदारही कार्यालयाचे बाहेर येऊन इशारा करण्यासाठी येत असताना सोनवणे यांनी कार्यालयाच्या बाहेरच्या दुसऱ्या घटने पळून गेले. सदरबाबत सोनवणे यांचे विरुद्ध सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Ok
उत्तर द्याहटवा