गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !
नाशिक- २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील पी.टी.सी. समोरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित शेल्टर -२०२४ या गृह प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून उद्या दिनांक २० रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात १५ लाखापासून ५ कोटी पर्यंत घरे, दुकाने, प्लॉट, फार्म हाऊस, ऑफिस, गोडाऊन, शेत जमीन, औद्योगिक प्लॉट यांचे असंख्य पर्याय तसेच इंटेरियर, बांधकाम साहित्य, नाविन्य पूर्ण तंत्रज्ञान, सुरक्षा साहित्य, गृह कर्ज असे अनेक स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली. उद्घाटन प्रसंगी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, एनएमआरडीएच्या आयुक्त मनीषा खत्री, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व राष्ट्रीय क्रेडाईचे माजी अध्यक्ष जक्शय शाह हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नाशिक शहर हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, कृषीपूरक व्यवसाय, निर्यात तसेच इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात वाढत असलेल्या नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. या सोबतच गेल्या काही वर्षात रस्ते, हवाई तसेच रेल्वे द्वारे नाशिकची देशभरात कनेक्टीवीटी वाढली आहे. समृद्धी महामार्ग, चेन्नई - सुरत महामार्ग, प्रस्तावित नाशिक - पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे त्यामुळे आगामी काळात नाशिक चे महत्व अजूनच वाढणार आहे. त्यामुळे देखील बहुआयामी अशा नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात आज केलेली गुंतवणूक भविष्यात "फायदे का सौदा" ठरणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
बांधकाम व्यावसायिकाचे कोणत्याही शहराच्या जडणघडणीमध्ये मोलाचे स्थान असते. यासोबतच शहराचे अर्थकारण व प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगार हे बांधकाम व्यावसायिकांतर्फे मोठ्या प्रमाण दिला जातो. दर दोन वर्षांनी भरणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे गृहप्रदर्शन असलेल्या शेल्टरकडे शहराचा उत्सव म्हणून बघितले जात असल्याचे शेल्टर -२०२४ चे समन्वयक गौरव ठक्कर म्हणाले. या प्रदर्शनाचे औचित्य साधून क्रेडाई जगभरात नाशिकचे ब्रॅन्डींग करत असते. यामध्ये नाशिकमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संधींची माहिती अनेकांना दिली जाते. या मुळे जगभरातील अनेकांचा ओघ नाशिक कडे असल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले. क्रेडाई नाशिक मेट्रो हे नाशिकमधील गृहनिर्माण उद्योगास पुढील स्तरावर नेत असलेले एक व्यासपीठ असून क्रेडाई नाशिक मेट्रोने नेहमीच पारदर्शकता आणि गुणवत्ता यावर भर दिला आहे. या मुळे खरेदीदार आणि विकसक परस्पर विश्वास निर्माण झाले असल्याचे देखील ते म्हणाले.
शेल्टर -२०२४ चे मार्गदर्शक दीपक बागड म्हणाले की, प्रदर्शना दरम्यान संध्यकाळी ५ वाजता विविध विषयांवरील मार्गदर्शक सेमिनार चे देखील आयोजन करण्यात आले असून त्याची माहिती---
२१ डिसेंबर : विषय- ट्रेडमार्क कॉपीराइट्स व बौद्धिक संपदा अधिकार. वक्ता – ॲड. चेतना डुंगरवाल
२२ डिसेंबर: विषय – आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास योजना/विकास आराखडा. वक्ता – प्रवीण गेडाम
२३ डिसेंबर: विषय- यशस्वी होण्यासाठी प्रतिमा व्यवस्थापन. वक्ता – निधी वैश्य
२४ डिसेंबर : दस्तऐवज आणि स्वाक्षरींचे प्रमाणीकरण. वक्ता – परेश चिटणीस
शेल्टर २०२४ मधील खास आकर्षण अशी -
* १०० हून अधिक विकसकांचे ५०० हून अधिक पर्याय
* दररोज दर ३ तासांनी लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे आणि बम्पर बक्षीस –टी.व्ही.एस दुचाकी
* सहभागी विकसकांकडून विविध आकर्षक योजना जसे नोंदणी शुल्क माफ, नो जीएसटी व अन्य
* लहान मुलांसाठी फ्रावशी शाळेतर्फे विशेष प्ले एरिया
* भविष्यातील नाशिक या विषयावर तज्ञांनी रेखाटलेले प्रदर्शन
* मोफत पार्किंगची सुविधा. तसेच मोफत व्हॅले पार्किंग उपलब्ध
* आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रदर्शनाचा लेआउट
* सुसज्ज फूड कोर्ट
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजॉय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋशिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिंवसरा, अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सह समन्वयक सुशांत गांगुर्डे, वृषाली महाजन, सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा