शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !
शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,,
सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !
नाशिक(प्रतिनिधी)::- जीएसटी च्या दरात वाढ होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात घरांच्या किमती मध्ये वाढ होऊ शकते. यामुळे सध्याच्या कमी असलेल्या दरातच आपली गृह स्वप्नपूर्ती व्हावी यासाठी आज नाशिक करांची गर्दी उसळली. उद्या दिनांक २२ रविवार सुट्टी चे औचित्य साधून अनेक साईट विझिट चे देखील नियोजन अनेकांनी केले आहे.
क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील पी. टी .सी समोरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर -2024 या गृहप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज २१ रोजी प्रदर्शनाचा दुसरा दिवस होता .
क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले की स्वतःचे घर असणे हे अनेकांचे स्वप्न आहे आणि ते वास्तवात येण्यासाठी येथे एका छताखाली घरांचे विविध पर्याय जसे १५ लाखापासून ५ कोटी पर्यंत घरे, दुकाने, प्लॉट, फार्म हाऊस, ऑफिस, गोडाऊन, शेत जमीन, औद्योगिक प्लॉट यांचे असंख्य पर्याय तसेच इंटेरियर, बांधकाम साहित्य, नाविन्य पूर्ण तंत्रज्ञान, सुरक्षा साहित्य, गृह कर्ज असे अनेक स्टॉल उपलब्ध आहेत, प्रगतीपथावर असणाऱ्या नाशिक मध्ये रियल इस्टेट मधील आज केलेली गुंतवणूक ही भविष्यात निश्चितच फायदेशीर ठरेल असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
बांधकाम व्यावसायिकांचे शहराच्या जडणघडणीमध्ये मोलाचे स्थान असते. यासोबतच शहराचे अर्थकारण व प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगार हे बांधकाम व्यावसायिकांतर्फे मोठ्या प्रमाणात दिला जातो. दर दोन वर्षांनी भरणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे गृहप्रदर्शन असलेल्या शेल्टरकडे शहराचा उत्सव म्हणून बघितले जात असल्याचे शेल्टर -2024 चे समन्वयक गौरव ठक्कर म्हणाले.
प्रदर्शनासाठी नाशिक सोबतच मालेगाव ,धुळे मनमाड, जळगाव, ठाणे व मुंबई येथून देखील नागरिक येत असून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे सातत्याने नाशिक ब्रँडिंग साठी केलेल्या प्रयत्नामुळे हे शक्य होत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले
रियल इस्टेट मधील आजची गुंतवणूक म्हणजे फायदे का सौदा .
नाशिक शहर हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, कृषीपूरक व्यवसाय, निर्यात तसेच इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात वाढत असलेल्या नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. या सोबतच गेल्या काही वर्षात रस्ते, हवाई तसेच रेल्वे द्वारे नाशिक ची देशभरात कनेक्टीवीटी वाढली आहे. समृद्धी महामार्ग, चेन्नई - सुरत महामार्ग, प्रस्तावित नाशिक - पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे त्यामुळे आगामी काळात नाशिक चे महत्व अजूनच वाढणार आहे. त्यामुळे देखील बहुआयामी अशा नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात आज केलेली गुंतवणूक भविष्यात फायदे का सौदा ठरणार आहे असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया ची बैठक
नाशिक च्या सर्व समावेशक दृष्टिकोनामुळे नाशिकची वाटचाल क्वालिटी सिटी कडे होत असून, या प्रदर्शनाचे औचित्य साधून प्रदर्शन स्थळी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाची बैठक झाली. या मध्ये क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष जयेश शहा, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया नाशिकचे जितूभाई ठक्कर, नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अवेश पलोड तसेच शहरातील अनेक सामाजिक व व्यवसायिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते ..
शेल्टर -2024 चे मार्गदर्शक दीपक बागड म्हणाले की प्रदर्शना मुळे नाशिकमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संधींची माहिती मिळते. या मुळे जगभरातील अनेकांचा ओघ नाशिक कडे असल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले. क्रेडाई नाशिक मेट्रो हे नाशिकमधील गृहनिर्माण उद्योगास पुढील स्तरावर नेत असलेले एक व्यासपीठ असून, क्रेडाई नाशिक मेट्रोने नेहमीच पारदर्शकता आणि गुणवत्ता यावर भर दिला आहे. या मुळे खरेदीदार आणि विकसक परस्पर विश्वास निर्माण झाले असल्याचे देखील ते म्हणाले.
प्रदर्शना दरम्यान रोज संध्यकाळी ५ वाजता विविध विषयांवरील मार्गदर्शक सेमिनार चे देखील आयोजन करण्यात आले आहे. या श्रृंखला मध्ये आज २१ डिसेंबर रोजी ट्रेडमार्क कॉपीराइट्स व बौद्धिक संपदा अधिकार या वर ॲड. चेतना डुंगरवाल यांनी मार्गदर्शन केले.
वैशिष्ट्ये
१. १०० हून अधिक विकसकांचे ५०० हून अधिक पर्याय
२. दररोज दर ३ तासांनी लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे आणि बम्पर बक्षीस –टी.व्ही.एस दुचाकी
३. सहभागी विकसकांकडून विविध आकर्षक योजना जसे नोंदणी शुल्क माफ, नो जीएसटी व अन्य. सहभागी वित्तीय संस्थांकडून आकर्षक व्याज दर .
४. लहान मुलांसाठी फ्रावशी शाळेतर्फे विशेष प्ले एरिया
५. भविष्यातील नाशिक या विषयावर तज्ञांनी रेखाटलेले प्रदर्शन
६. मोफत पार्किंगची सुविधा. तसेच मोफत व्हॅले पार्किंग उपलब्ध
७. आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रदर्शनाचा लेआउट
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजॉय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋशिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिंवसरा, अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सह समन्वयक सुशांत गांगुर्डे, वृषाली महाजन, सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा