सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !
सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली ! नाशिक(प्रतिनिधी)::- लाखोचे गृहस्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संघटना क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे येत्या २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर -२०२४ हे गृहप्रदर्शन आयोजित होत असून प्रदर्शन स्थळी डोम उभारणी चा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.. या प्रदर्शनात अगदी १० लाखापासून ५ कोटी पर्यंत घरे, दुकाने, प्लॉट, फार्म हाऊस, ऑफिस, गोडाऊन, शेत जमीन, औद्योगिक प्लॉट यांचे असंख्य पर्याय तसेच इंटेरियर, बांधकाम साहित्य, नाविन्य पूर्ण तंत्रज्ञान, सुरक्षा साहित्य, गृह कर्ज असे अनेक स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली. बांधकाम व्यावसायिकाचे कोणत्याही शहराच्या जडणघडणीम...