ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिन्यानिमित्त एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर आयोजित पिंक मेलाया महिन्यात ९०% कमी खर्चात होणार मॅमोग्राफ चाचणी, पॅप स्मीअर आणि मोफत सल्ला

ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिन्यानिमित्त एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर आयोजित पिंक मेला

या महिन्यात ९०% कमी खर्चात होणार मॅमोग्राफ चाचणी,  पॅप स्मीअर  आणि मोफत सल्ला

 

नाशिक(२२)::नाशिक शहरातील प्रमुख कर्करोग विशेषता रुग्णालय एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरने कर्करोग जागरूकता महिन्यातील उपक्रमांचा भाग म्हणून २६ ऑक्टोंबर २०२४ रोजी पिंक मेला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्तन कर्करोगाच्या वाढत्या प्रकरणाबद्दल जागरूकता वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून या कार्यक्रमात २० वर्षांवरील महिलांना दिग्गज डॉक्टरांकडून मोफत सल्ला ही देण्यात येणार आहे.  यावेळी तज्ञ डॉक्टरांची एक टीम महिलांच्या वैद्यकीय इतिहासाची तपासणी करेल, ज्यामध्ये स्तन कर्करोग किंवा अन्य संबंधित स्थितींचा समावेश असेल, तसेच आवश्यक असल्यास शारीरिक तपासणी देखील करण्यात येईल. यासोबतच या महिन्यात रुग्णालयाकडून मॅमोग्राफी तपासणी फक्त ५५० रुपयांमध्ये करून देण्यात येणार आहे. सामान्य काळात मॅमोग्राफी तपासणी शुल्क ७१५० रुपये इतके असते.

                   


 भारतात महिलांमधील कर्करोगात ३० टक्के प्रमाण स्तन कर्करोगाचे आहे. यामुळे स्तन कर्करोग हा देशातील सर्वात सामान्य कर्करोग बनला आहे. वयोमानानुसार कर्करोगाचा धोका वाढतो. विशेषतः ५० ते ६० वयोगटातील महिलांना याचा सर्वाधिक धोका असतो. दुर्दैवाने, जागरूकतेचा आणि प्रारंभिक तपासणी अभावी अनेक प्रकरणे उशीराने सापडतात. “पिंक मेलाच्या माध्यमातून आम्ही स्तन कर्करोगाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्याचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल महिलांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पिंक मेलाला उपस्थित महिलांना त्यांच्या नियमित तपासण्यांपेक्षा तीन पट अधिक प्रमाणात उपयोग होतो. म्हणून मी शक्य तितक्या महिलांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करतो," असे HCG मानवता कॅन्सर सेंटर आणि हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्व्हिसेसचे प्रमुख डॉराज नगरकर यांनी सांगितले.

 


स्तन कर्करोग हा एक असा आजार आहे जो स्तनाच्या पेशींपासून सुरू होतो, जिथे त्या अनियंत्रितपणे वाढतात आणि एक गाठ तयार करतात. स्तन कर्करोग मुख्यत्वे महिलांना प्रभावित करतो, परंतु पुरुषांनाही तो होऊ शकतो. डॉ. राज नागरकर यांनी अलीकडेच जगातील पहिली रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निपल-स्पेअरिंग मॅस्टेक्टोमी ची शस्त्रक्रिया केली आहे. ही स्तन कर्करोगाच्या शस्त्रक्रिया क्षेत्रातील एक महत्त्वाची कामगिरी आहे.

 

उशीराने होणारी गर्भधारणा, कुटुंबातील इतिहास, हार्मोनल बदल, धूम्रपान आणि उच्च ताणासारखे जीवनशैलीतील घटक स्तन कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. याच्या वाढत्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन याबद्दल जागरूकता वाढवून नियमित तपासण्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. स्तन कर्करोगाचे प्रारंभिक काळात निदान झाल्यास जगण्याच्या शक्यता ८० टक्क्यांनी वाढतात.  पिंक मेलाच्या माध्यमातून स्तन कर्करोगाचा उच्च धोका असलेल्या महिलांसाठी प्रतिबंधात्मक काळजी आणि नियमित तपासण्यांद्वारे त्यांना सशक्त करण्याचा आमचा उद्देश असल्याचे डॉ. नागरकर यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।