पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

इमेज
सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !          नासिक::- किरण रंगनाथ दराडे, कनिष्ठ लेखाधिकारी, वित्त विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, नाशिक, व सचिन प्रभाकर पाटील, कनिष्ठ सहाय्यक, (लेखा )वित्त विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांना ११०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.               यातील तक्रारदार हे शिक्षक असून त्यांचे व इतर १७ शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्याकरिता तक्रारदार यांनी त्यांच्या सेवा पुस्तकासह एकूण १८ सेवा पुस्तके लोकसेवक किरण दराडे यांच्याकडे जमा केली होते. सदर १८ शिक्षकांची वेतन पडताळणी करून सेवा पुस्तके लेखाधिकारी यांच्याकडे सादर करून त्यांच्याकडून  वेतन पडताळणी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पंच साक्षीदार यांच्या समक्ष सुरुवातीला प्रत्येक सेवा पुस्तकाचे ७००/-रुपये याप्रमाणे १८ सेवा पुस्तकांचे १२६००/- रुपयांची मागणी करून,  तडजोडीअंती  ११०००/- रुपयांची मागणी करून सदर लाचेची रक्कम लोकसेवक किरण दराडे यांच्या सांगण्