प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, अध्यक्षपदी खासदार भास्कर भगरे तर कार्याध्यक्षपदी के.के अहिरे यांची निवड
              नाशिक( प्रतिनिधी)::- शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटना एकत्र करून समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून खासदार भास्करराव भगरे तर कार्याध्यक्षपदी के.के.अहिरे यांची निवड करण्यात आली असून कार्यवाहपदी अरुण पवार यांची निवड करण्यात आली. या समितीचे मार्गदर्शक ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे, बाळासाहेब सूर्यवंशी, रविंद्र मोरे, दौलतराव मोगल, साहेबराव कुटे, संजय चव्हाण, एस.के.शिंदे, अशोक दुधारे, यांची निवड करण्यात आली. तसेच सर्व संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून पुढीलप्रमाणे समन्वय समिती कार्यकारिणी ठरवण्यात आली. यात समन्वय समितीचे अध्यक्षपदी खासदार भास्कर भगरे  यांनी स्वीकारावं, अशी विनंती सर्वानुमते करण्यात आली. त्यांनी सर्वांच्या विनंतीला मान देवून अध्यक्षपद स्वीकारले त्यांनी त्यांच्या मनोगतात इथून पुढे शिक्षकांचे जे काही प्रश्न असतील ते समन्वय समितीच्या वतीने सोडवण्यात येतील असे सांगितले. 

         सर्वानुमते पुढीलप्रमाणे 
कार्यकारणी घोषित करण्यात आली. बैठकीस सर्व संघटनाचे एकूण ५० प्रतिनिधी उपस्थित होते.
अध्यक्ष - खासदार भास्कर भगरे, 
कार्याध्यक्ष- के. के. अहिरे कार्यवाह - अरुण पवार 
उपाध्यक्ष - बाळासाहेब ढोबळे, सी.पी. कुशारे, एस बी शिरसाठ, संजय देसले, राजेंद्र लोंढे, किशोर जाधव, निलेश ठाकूर, मनोज शिरसाठ 
सहकार्यवाह - पुरुषोत्तम रकीबे, संग्राम करंजकर, संजय मगर, विकास सोनवणे 
कोषाध्यक्ष - भाऊसाहेब शिरसाठ
महिला आघाडी- पल्लवी चव्हाणके, ज्योत्सना शिंदे, सीमा सोनवणे, पल्लवी जाधव, मनीषा विसपुते
समिती सदस्य- अनिल निकम, टी.एम.डोंगरे, दिनेश अहिरे, महेश रहाळकर, प्रभाकर कासार, जिभाऊ शिंदे, सचिन सुर्यवंशी, सोमनाथ मत्सागर, रामराव बनकर, विजय पाटील, लोकेश पाटील, प्र.दा.पगार, शशांक मदाने, समीर जाधव, हिरामण शिंदे, दशरथ जारस, किशोर शिंदे, विशाल अहिरे, संजय पाटील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

१०० खाटांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण ! महिला व बाल रुग्णालयात आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणार-पालकमंत्री दादाजी भुसे

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,