विधानसभा निवडणुक आढावा - केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन !

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि 

शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन

 

मुंबई::- महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा  आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे  मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या  शिष्टमंडळाचे रात्री  वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले.  महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन  स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णीअतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय जाधव उपस्थित होते.

       


   भारत निवडणूक आयोगाच्या या शिष्टमंडळात वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धमेंद्र शर्मा
वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश व्यासवरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्गउपनिवडणूक आयुक्त हिर्देश कुमारउपनिवडणूक आयुक्त अजित कुमारउपनिवडणूक आयुक्त मनोजकुमार साहूउपनिवडणूक आयुक्त संजय कुमारउपनिवडणूक आयुक्त त्याचबरोबर आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.दि

           २७ व २८ सप्टेंबर या दोन दिवसीय भेटी दरम्यान भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी हे  राजकीय पक्षांचे प्रतिनिधीमुख्य निवडणूक अधिकारीमुख्य सचिव यांच्यासह राज्यातील विविध अंमलबजावणी अधिकारी यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा  बैठक  घेणार आहेत.         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल