‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत : सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे
मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत,
१ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !
ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !
      नाशिक(प्रतिनिधी)::- मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाने गेल्या दोन वर्षांत ठेवी ७९ कोटींवरून १२४ कोटींपर्यंत वाढविल्या आहेत. म्हणजेच ४५ कोटींची वाढ झाली आहे. ३८ कोटी ३५ लाख कर्जपरतफेड केली आहे. याबरोबरच विनाअनुदानित तत्वावरील सेवकांना चालू वर्षात ३० कोटी रुपयांची पगारवाढ दिली आहे. ३१ कोटी ९३ लाख रुपये संस्थेच्या विविध शाखांतील इमारतींच्या बांधकामावर खर्च केले आहे. अशा पद्धतीने संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सरचिटणीस ॲड. डॉ. नितीन ठाकरे यांनी केले.

          मविप्र संस्थेच्या कै. तुकारामजी रौंदळ सभागृहात रविवारी (दि.०१) पार पडलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ११० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेप्रसंगी व्यासपीठावर सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, शिवाजी गडाख, ॲड. लक्ष्मण लांडगे, ॲड. आर. के. बच्छाव, ॲड. संदीप गुळवे, रवींद्र देवरे, रमेश पिंगळे, कृष्णाजी भगत, प्रविण जाधव, नंदकुमार बनकर, विजय पगार, डॉ. प्रसाद सोनवणे, अमित बोरसे, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, माजी आमदार ॲड. माणिकराव शिंदे, माजी अध्यक्ष अरविंद कारे, डॉ. तुषार शेवाळे, डॉ. अभिमन्यू पवार, अशोक पवार, भाऊसाहेब खातळे, डॉ. विलास बच्छाव, डॉ. विश्राम निकम, नारायण हिरे, विजय गडाख, पुंडलिक थेटे, अंबादास बनकर, सचिन पिंगळे, महिला सदस्य शोभा बोरस्ते, शालन सोनवणे, सेवक सदय प्रा. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे, जगन्नाथ निंबाळकर उपस्थित होते. 

         यावेळी विषय पत्रिकेचे वाचन शिक्षणाधिकारी प्रा. डी. डी. जाधव यांनी, सभेच्या इतिवृत्ताचे शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके यांनी केले. दुखवटा ठराव दिंडोरी तालुका संचालक प्रविण जाधव यांनी मांडला. यावेळी सर्वानुमते कार्यक्रम पत्रिकेतील विषयांना मंजुरी देण्यात आली. या विषयांमध्ये मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, सन २०२३-२४ चा वार्षिक अहवाल वाचून मंजूर करणे. उत्त्पन्न व ताळेबंद पत्रके यांना मंजुरी देणे. मध्यवर्ती कार्यालय व सर्व शाखांचे एकत्रित अंदाजपत्रकास मंजुरी देणे. हिशोब तपासणीसाची नेमणूक करणे, संस्थेच्या कामकाजात येणाऱ्या अडीअडचणींचा विचार करून विकासात्मक बाबींचा विचार करणे. संस्थेच्या धेय्य धोरणानुसार पुढील कार्याची दिशा ठरविणे, संस्थेच्या बोधचिन्हात संस्था स्थापना वर्षाचा समावेश करणे. तसेच अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे यांचा समावेश होता. आभार प्रदर्शन सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी मानले.

   यावेळी संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी प्रास्ताविकात पीपीटीद्वारे वर्षभरातील कामकाजाचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी  बदलत्या काळाबरोबर विद्यार्थ्यांना अद्यावत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, त्यांना करिअरच्या नव्या दिशा मिळाव्यात, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, म्हणून संस्थेने केंद्र सरकारची संस्था असलेल्या IISER या संस्थेबरोबर संस्थेतील विज्ञान आणि गणित शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी एक सामंजस्य करार केलेला आहे. त्या अंतर्गत संस्थेतील शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. या वर्षात संस्थेने सात नवीन शाखा सुरू केल्या असून, त्यात एक इंग्रजी माध्यम होरायझन पूर्व प्राथमिक शाळा (पिंपळगाव ब.), दोन आरोग्य केंद्र (मालेगाव व नांदगाव), एक तेरा मजली अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह, प्रज्ञा बौद्धिक संपदा केंद्र, प्रतिभा संपादन कक्ष (टॅलेंट ॲक्क्विझीशन सेल), सेंटर फॉर कोलॅबरेशन अँड एक्सलन्स यांचा समावेश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी, संशोधनाला गती, शिक्षकांचे प्रशिक्षण, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राची सांगड, तंत्रज्ञान, रोजगार संधी आणि कौशल्यांचा शोध या उद्देशांच्या पूर्तीसाठी या शाखा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेत प्रज्ञा बौद्धिक संपदा केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. या माध्यमातून विद्यार्थी व प्राध्यापक यांनी लावलेले शोध व केलेली निर्मिती यासंदर्भात पेटंटसाठी येणाऱ्या खर्चातील ५० टक्के वाटा मविप्र संस्था उचलत आहे. यामुळे संशोधनाला मोठी गती मिळणार आहे.
        काळाबरोबर होत असलेले बदल स्वीकारण्याच्या दृष्टीने संस्थेच्या पाठपुराव्यामुळे कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयास स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. याशिवाय एमबीबीएस विषयाच्या प्रवेश क्षमतेत १३० वरून १५० वाढ करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. जेएनपीए कडून ३८ लाखांचा निधी संस्थेने मिळविला आहे. मानव संसाधन विकास केंद्राच्या वतीने केजी टू पीजी  शिक्षक व शिक्षकेतर  यांचेसाठी कौशल्य वृद्धीसाठी आजपावेतो ३०० कार्यशाळा घेण्यात आल्या आहे. अनेक नवीन शिक्षणक्रम मान्यता व  प्रवेशक्षमता वाढ झाल्याचे सांगितले. सामाजिक उत्तरदायीत्वातून NAB या संस्थेसाठी अंधनिधी म्हणून १० लाखांची मदत तसेच संस्थेचा माजी विद्यार्थी ऑलिम्पिकपटू सर्वेश कुशारे याला संस्थेच्या वतीने १ लाख रु.चे बक्षीस दिल्याचे सांगितले. 

मविप्रचे अंदाजपत्रक १ हजार ८७ कोटींचे 
मविप्र संस्थेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक १ हजार ८७ कोटी ५८ लाखांचे आहे. या आर्थिक वर्षात युजीसीकडून १ कोटी ६४ लाख अनुदान मिळाले आहे.
ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (IISER), MSFDA व मविप्र संस्था यांच्यादरम्यान विज्ञान व गणित विषयाच्या शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार झालेला आहे. NIMS, आयुका, सेबी, लायलोनेट (जपान) व एमकेसीएल, नाशिक इंजिनिरिंग क्लस्टर यांच्यासोबत प्रशिक्षण करार  झाला आहे. दोन महिन्यात ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत भाषा व संवादकौशल्य वृद्धीसाठी करार केला जाणार असल्याचे ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.
तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट
संस्थेच्या विविध शाखांमध्ये होणाऱ्या कॅम्पस रिक्रूटमेंट अंतर्गत एकाच वर्षात तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांना विविध कंपन्या, संस्थांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. 
१६० कोटींच्या उलाढालीला बळ
मविप्र व मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या मराठा उद्योजक मार्गदर्शन संस्था अंतर्गत दर बुधवारी मविप्रच्या राजर्षी शाहू तंत्रनिकेतनमध्ये उद्योजकांची बैठक होते. यामध्ये उद्योग व व्यवसाय या विषयांवर चर्चा होते. स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या तरुणांना तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन केले जाते. यातूनच तरुण उद्योजकांनी तब्बल १६० कोटींची उलाढाल केली आहे. 
मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम
सटाणा येथे संस्थेच्या वतीने ज्येष्ठ सभासदांसाठी निसर्गधाम नावाने वृद्धाश्रम सुरु करण्याचा संस्थेचा मानस आहे. 
भविष्यातील योजना
संस्था लवकरच मविप्र स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ, कन्व्हेन्शन सेंटर, होमिओपॅथी महाविद्यालय, फूड टेक्नोलॉजी, आयुर्वेद महाविद्यालय, दंत वैद्यक महाविद्यालय, पशुवैद्यक महाविद्यालय, मिल्ट्री प्रीपेटरी स्कूल, कौशल्य विकास विद्यापीठ, बी.एस्सी एव्हीएशन अभ्यासक्रम लवकरच सुरू केल्या जाणार आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,