सेवानिवृत्त अधिकारी व त्यांच्या पत्नी वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

सेवानिवृत्त अधिकारी व त्यांच्या पत्नी वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

नासिक ::-तक्रारदार नितीन नारायण पाटील, पोलीस निरीक्षक, नेमणुक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी केलेल्या तक्रारीवरून सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी, महानगरपालिका, नासिक चे अनिल चुडामान महाजन व त्यांच्या पत्नी श्रीमती निशा अनिल महाजन यांच्या कडे असलेली अपसंपदा रक्कम  १,३१,४२,८६९/-रुपये  (एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये) कायदेशीर उत्पन्नापेक्षा ४२% इतकी अपसंपदा केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

            आलोसे अनिल चुडामान महाजन सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी महानगर पालिका नाशिक यांनी अग्निशमन महानगर पालिका येथे कार्यरत असतांना दिनांक २२/१०/१९८६ ते दिनांक ३१/०५/२०१८ दरम्यान सेवा कालावधीत कायदेशीर उत्पन्ना पेक्षा १,३१,४२,८६९/- (एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये ) कायदेशीर उत्पन्ना पेक्षा ४२% एवढी अपसंपदा केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याने, तसेच सदर अपसंपदा संपादित करणे कामी त्यांची पत्नी आरोपी यांनी प्रोत्साहन दिले म्हणून त्यांचे विरुद्ध मुंबई नाका पोलिस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर २३०/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे सन २०१८ सुधारणा पूर्वीचे कलम १३(१)(इ) व १२ प्रमाणे आज दिनांक ०८/०८/२०२४ रोजी दुपारनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

१०० खाटांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण ! महिला व बाल रुग्णालयात आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणार-पालकमंत्री दादाजी भुसे

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,