शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या काव्यसंग्रहाचे अनोखे प्रकाशन !

शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या काव्यसंग्रहाचे अनोखे प्रकाशन !
सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी हर्षा हिरा पाटील यांचा "हर्षधारा" पहिला काव्यसंग्रह !

       पालघर (गुरुदत्त वाकदेकर) : सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी हर्षा हिरा पाटील पंचायत समिती पालघर यांच्या "हर्षधारा" ह्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे अनोख्या पद्घतीने प्रकाशन करण्यात आले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कु. मोनिका कोदे, विशेष अतिथी निवेदिका कलाकार कवयित्री शिल्पा परुळेकर, कविवर्य संजय पाटील, हिरा जनार्दन पाटील तसेच मनिष पाटील यांच्यासोबत स्वत: हर्षा हिरा पाटील आदी उपस्थित होते. "हर्षधारा" ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आश्रमशाळा पडघे येथील मोनिका कोदे ह्या विद्यार्थिनीच्या हस्ते करण्यात आले.

               या अनोख्या प्रकाशन सोहळ्याबाबत हर्षा पाटील म्हणाल्या की, शिक्षण क्षेत्रात ४० वर्ष योगदान दिले, त्यावेळी आलेल्या शैक्षणिक, कौटुंबिक अडचणी, अनेक चांगले वाईट अनुभव यांचे प्रतिबिंब हर्षधारात शब्दबद्ध झाले आहे. माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचा हा क्षण विद्यार्थी अन् शिक्षकांसोबत घालवावा असं वाटलं. शाळेला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांसमवेत बसून हा आनंद घेतांना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि झालेला आनंद खूप काही सांगून गेला. जेव्हा हर्षधारा काव्यसंग्रहातून त्यांना आवडलेल्या कवितांचे विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण वाचन केले, तेव्हा माझ्या लिखाणाला निरागस, निर्व्याज पोचपावती मिळाली. काव्यसंग्रहाचे प्रकाशन इतरत्र करून प्रसिद्धी नक्कीच मिळाली असती. पण येथे मिळालेल्या आत्मिक समाधानाला मुकले असते. १५ वर्षांपासून 'वाचाल तर वाचाल' - विद्यार्थी, शिक्षक, वरिष्ठ, नातेवाईक यांना पुस्तक भेट देणं, प्लास्टिक निर्मूलन मोहिमेअंतर्गत कापडी पिशवी भेट देणं, वृक्षारोपणाचे महत्व विषद करताना रोप भेट देणं यासारखे उपक्रम अविरत सुरु आहेत आणि सुरू राहाणार आहेत.
                  प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून अध्यक्ष, पाहुणे आणि उपस्थितांचे स्वागत पुस्तक, रोप आणि कापडी पिशवी देऊन करण्यात आले. परिसरातील सारस्वत तसेच तु ल आश्रमशाळा पडघे, पालघरचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंदाने विशेषत्वाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश संखे यांनी केले. 
                गझलकार विजय जोशी यांची प्रस्तावना ह्या काव्यसंग्रहास लाभली आहे. तर गझलकार कमलाकर संखे तसेच साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांचे शुभेच्छा संदेश आणि शिल्पा परुळेकर, कवयित्री मानिनी महाजन या दिग्गजांचा आशीर्वाद "हर्षधारा" काव्यसंग्रहाला लाभलेला आहे.
                    आपल्या अख्यातारीत अनेक नामवंत शाळा असतांना देखील डोंगरालगत असणाऱ्या आमच्या आश्रमशाळा पडघेची निवड केल्याबद्दल हर्षा पाटील यांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी मनापासून आभार मानले आणि काव्यसंग्रहास भरभरून शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

१०० खाटांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण ! महिला व बाल रुग्णालयात आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणार-पालकमंत्री दादाजी भुसे

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,