दीपालीनगर येथे उद्या आरोग्यशिबिराचे आयोजन !

नाशिक : श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, विनयनगर परिसर ज्येष्ठ नागरिक मंच,
सीतावल्लभ बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (सोमवारी ) हृदयरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कै. जयप्रकाश छाजेड उद्यान, दीपालीनगर, शर्मा मंगल कार्यालयासमोर, हॉटेल छान मागे येथे सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत होणाऱ्या या शिबिरात हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची विनामूल्य तपासणी करतील व साखर, ईसीजी इ. तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.

यावेळी माजी महापौर सतीश कुलकर्णी, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, नगरसेवक यशवन्त निकुळे, पंडितराव नेरे, साहेबराव सोनवणे, संजय गिते, ओंकार जगळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ संपन्न होत असून नागरिकांनी शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. सुनील औंधकर, डॉ. प्रतिभा औंधकर आणि रेडक्रॉस कार्यकारिणीने केले आहे. अधिक माहितीसाठी तुषार जाधव यांच्याशी ८२०८७८३४६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा